पेटवला कचरा पण जळाली हायटेन्शन केबल; नागपुरातील घटना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 12, 2018 01:15 PM2018-04-12T13:15:12+5:302018-04-12T13:15:26+5:30

शहरातील जगनाडे चौक या परिसरात असलेल्या नागनदीच्या पुलाखालील कचरा अज्ञात इसमाने पेटवून दिल्याने तेथून जाणारी हायटेन्शन केबल जळून खाक झाल्याची घटना गुरुवारी सकाळी येथे घडली.

Burned waste but burnt burn cable; Events in Nagpur | पेटवला कचरा पण जळाली हायटेन्शन केबल; नागपुरातील घटना

पेटवला कचरा पण जळाली हायटेन्शन केबल; नागपुरातील घटना

Next
ठळक मुद्देकचरा उचलणाऱ्यांनी पेटवले पेंटचे डब्बेनागनदीच्या पुलाखाली होती केबलपरिसरातील नागरिकांना विद्युत खंडितचा फटका

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर: शहरातील जगनाडे चौक या परिसरात असलेल्या नागनदीच्या पुलाखालील कचरा अज्ञात इसमाने पेटवून दिल्याने तेथून जाणारी हायटेन्शन केबल जळून खाक झाल्याची घटना गुरुवारी सकाळी येथे घडली. या पुलाखाली असलेल्या भंगार कचऱ्यातून कामाच्या वस्तू गोळा करणाऱ्यांची येथे नेहमीच वर्दळ असते. त्यातील कोणीतरी या कचऱ्यातील पेंटचे डब्बे पेटवून दिले. ही आग पाहता पाहता वाढली आणि तिने वरून चाललेल्या हायटेन्शन केबलला आपल्या विळख्यात ओढले. पुलाखालून मोठा धूर निघत असल्याचे पाहून काही नागरिकांनी जाऊन पाहिले असता त्यांना केबल जळत असल्याचे दिसले. त्यांनी तात्काळ संबंधित कार्यालयाला कळवले मात्र तोपर्यंत ती केबल बरीच जळून गेली होती. या पुलाजवळच मोठे हॉस्पीटल व एक हॉटेल आहे. तसेच हा मोठा वर्दळीचा भाग असल्याने येथे मोठ्या अपघाताची शक्यता टळल्याची नागरिकांत चर्चा होती.

Web Title: Burned waste but burnt burn cable; Events in Nagpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.