नागपूर दुर्गा महोत्सवाचा प्रारंभ : आदिशक्तीची थाटात स्थापना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 10, 2018 11:52 PM2018-10-10T23:52:32+5:302018-10-10T23:54:05+5:30

मावळतीला लखलखणारे लक्षावधी सोनेरी दिवे... चौफेर दरवळणारा धूपबत्तीचा स्वर्गीय गंध... भगव्या पताका उंचावत निनादणारे ढोलताशांचे वादन.... आणि ‘सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके। शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते...’च्या अखंड गजरात बुधवारी संध्याकाळी लक्ष्मीनगरात आदिशक्तीची थाटात स्थापना झाली. यानिमित्त लोकमत व राणी लक्ष्मीबाई दुर्गा उत्सव मंडळातर्फे आयोजित नागपूर दुर्गा महोत्सवाला प्रारंभ झाला. राणी लक्ष्मीबाई दुर्गा उत्सव मंडळाचे हे १३ वे वर्ष आहे हे विशेष.

The beginning of Nagpur Durga Mahotsav: Establishment of Adashakti | नागपूर दुर्गा महोत्सवाचा प्रारंभ : आदिशक्तीची थाटात स्थापना

नागपूर दुर्गा महोत्सवाचा प्रारंभ : आदिशक्तीची थाटात स्थापना

googlenewsNext
ठळक मुद्दे‘लोकमत’ व राणी लक्ष्मीबाई दुर्गा उत्सव मंडळाचे आयोजन

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : मावळतीला लखलखणारे लक्षावधी सोनेरी दिवे... चौफेर दरवळणारा धूपबत्तीचा स्वर्गीय गंध... भगव्या पताका उंचावत निनादणारे ढोलताशांचे वादन.... आणि ‘सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके। शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते...’च्या अखंड गजरात बुधवारी संध्याकाळी लक्ष्मीनगरात आदिशक्तीची थाटात स्थापना झाली. यानिमित्त लोकमत व राणी लक्ष्मीबाई दुर्गा उत्सव मंडळातर्फे आयोजित नागपूर दुर्गा महोत्सवाला प्रारंभ झाला. राणी लक्ष्मीबाई दुर्गा उत्सव मंडळाचे हे १३ वे वर्ष आहे हे विशेष.
आदिशक्तीच्या पहिल्या आरतीचा मान राष्ट्रसेविका समितीच्या प्रमुख संचालिका शांताक्का पोलीस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय, नागपूरच्या महापौर नंदा जिचकार, खासदार डॉ. विकास महात्मे यांना मिळाला. यावेळी राष्ट्रसेविका समितीच्या माजी प्रमुख संचालिका प्रमिलताई मेढे, पोलीस उपायुक्त विवेक मासाळ, लोकमतचे निवासी संपादक गजानन जानभोर, मंडळाचे अध्यक्ष प्रसन्न मोहिले, हॉटेल अशोकाचे संचालक संजय गुप्ता आदी उपस्थित होते. यावेळी ऊर्जामंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, हायकोर्ट बार असोसिएशनचे अध्यक्ष अ‍ॅड. अनिल किलोर यांनीही मातेचे दर्शन घेतले. लक्ष्मीनगर व्हॉलिबॉल मैदानात जगत्जननी-आदिशक्ती असलेल्या देवी दुर्गेची थाटात अधिष्ठापना करण्यात आली. या अधिष्ठापनेसोबतच मध्य भारतातील सर्वात मोठ्या अशा नागपूर दुर्गोत्सवालाही प्रारंभ झाला आहे. त्याचबरोबर झाशीची राणी लक्ष्मीबाई यांच्या जीवनपटावर आधारीत दुर्मिळ छायाचित्रांच्या प्रदर्शनाचेसुद्धा यावेळी उद्घाटन करण्यात आले. धार्मिक, सांस्कृतिक व बौद्धिक कार्यक्रमांची रेलचेल येत्या दहा दिवस राहणार आहे.
यंदाच्या दुर्गोत्सवाचे मुख्य आकर्षण भव्य ‘पाणबुडी’ आहे. या पाणबुडीतून प्रवास करून समुद्राच्या आतील गुहेत प्रवेश करायचा आहे. या गुहेत मातेची स्थापना करण्यात आली आहे. मातेच्या घटस्थापनेला आलेल्या पाहुण्यांनी हा सर्व अनुभव घेतलेल्यानंतर मंडळाचे कौतुक केले. आर्ट डायरेक्टर लीलधर सावंत यांच्या मार्गदर्शनात हा सेट तयार करण्यात आला. यावेळी मंडळाचे संस्थापक अध्यक्ष प्रसन्न मोहिले व त्यांच्या सहकाऱ्यांनी उपस्थित पाहुण्यांना स्मृतिचिन्ह देऊन त्यांचा गौरव केला.

 समाधानाची भावना आहे
बॉलिवृडचे प्रसिद्ध आर्ट डायरेक्टर १७७ सिनेमात आर्ट डायरेक्शन केलेले लीलाधर सावंत यांनी पहिल्यांदा विदर्भात नागपूर दुर्गा महोत्सवाच्या सेटची निर्मिती केली आहे. गेल्या दोन महिन्यापासून दिवस-रात्र सावंत यांनी स्वत: मेहनत घेतली आहे. त्यांच्या मार्गदर्शनात मातेचा भव्य दरबार सजला आहे. मातेचे दर्शन घेतल्यानंतर अनेकांच्या चेहºयांवर त्याचे भाव झळकले आहे. त्याचा मला आनंद आहे. बºयाच दिवसानंतर हाती घेतलेले काम यशस्वी झाल्याचे समाधान लीलाधर सावंत यांनी व्यक्त केले.

मंडळाची कार्यकारिणी व्यवस्थेत व्यस्त
अध्यक्ष : प्रसन्न मोहिले, उपाध्यक्ष : वैभव पुनतांबेकर, अमोल जोशी, शशांक चौबे, वैभव गांजापुरे, सचिव : आनंद कसगीकर, कोषाध्यक्ष : अमोल अन्वीकर सदस्य : कार्तिक बांडे, अर्पित मंगरुळकर, नीरज दोंतुलवार, साहिल कोठारी, संकेत चंदनखेडे, समृद्धी पुनतांबेकर, अंकिता पतरंगे, मयूर लक्षणे, सुदीप्ता चौबे.

धार्मिक व सामाजिक भावनांचा संगम
खा.डॉ.विकास महात्मे यांनी राणी लक्ष्मीबाई दुर्गा उत्सव मंडळाला भेट दिली. दुर्गा उत्सव मंडळाच्या माध्यमातून केवळ धार्मिक आयोजनच होत आहे असे नाही, तर येथे सामाजिक भावनांचादेखील जागर होतो आहे. समाजाच्या समग्र विकासासाठी सर्वांनी हीच भावना ठेवून नि:स्वार्थ वृत्तीने काम करण्याची गरज असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.

ऊर्जा देणारे स्थळ
गेल्या एका तपापासून राणी लक्ष्मीबाई दुर्गा उत्सव मंडळाच्या माध्यमातून आदिशक्तीची आराधना करण्याची संधी मिळते आहे. दरवर्षी असणारा आकर्षक व नाविन्यपूर्ण देखावा, सामाजिक उपक्रमांची जोड व सांस्कृतिक कार्यक्रमांचा दर्जा यामुळे येथे आपसूकच पावले वळतात. सर्वार्थाने ऊर्जा देणारे हे स्थळ आहे, असे मत महापौर नंदा जिचकार यांनी व्यक्त केले.

समाजात बंधूभाव वाढविणारा उपक्रम
राणी लक्ष्मीबाई दुर्गा उत्सव मंडळाच्या माध्यमातून राबविण्यात येणारे उपक्रम, कार्यक्रम हे सर्वांसाठी खुले आहेत. येथे कुठलाही भेदभाव नाही आणि सर्वांना सोबत घेऊन चालण्याची भावना दिसून येते. समाजात बंधूभाव वाढविणारी ही बाब असून, येथील उपक्रमांमुळे नागरिकांमध्ये सामाजिक कर्तव्यभावनादेखील नक्कीच वाढीस लागेल, असा विश्वास पोलीस आयुक्त डॉ. भूषण कुमार उपाध्याय यांनी व्यक्त केला.

चौफेर निनादले ‘शिवसंस्कृती’चे वादन
या महोत्सवाचा प्रारंभ ‘शिवसंस्कृती’ ढोलताशा पथकाच्या वादनाने झाला. इंजिनिअर, मॅनेजमेंट, अभियांत्रिकी शिक्षण घेणाºया तरुणांसोबतच बँकिंग, व्यवसाय व इतर क्षेत्रात असलेल्या 'यंगस्टर्स'चा या पथकात समावेश होता. उत्सुकता, जल्लोष, वादकांचा हुरूप, लोकांचा उदंड प्रतिसाद अशा उत्साहाच्या वातावरणात मराठी संस्कृतीचा बाणा जपत 'शिवसंस्कृती'ने केलेले वादन चौफेर निनादले.

नागपुरात होणार ‘फिल्मसिटी’
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक, जहाजबांधणी, जलसंपदा मंत्री नितीन गडकरी यांचा विदर्भात ‘फिल्मसिटी’ निर्माण करण्याचा मानस आहे. त्यादृष्टीने त्यांनी वेळोवेळी सूचनादेखील केल्या आहेत. यासंदर्भात प्रशासकीय हालचालीदेखील सुरू झाल्या आहेत. राज्याचे ऊर्जामंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी पारशिवनी तालुक्याची पाहणी करण्याचा निर्धार केला आहे. गुरुवारी बावनकुळे प्रख्यात दिग्दर्शक नागराज मंजुळे यांच्यासोबत प्रत्यक्ष प्रस्तावित स्थानावर जाऊन सखोल पाहणी करणार आहेत.
बुधवारी राणी लक्ष्मीबाई दुर्गा उत्सव मंडळाला बावनकुळे यांनी भेट दिली. यावेळी ‘आर्ट डायरेक्टर’ लीलाधर सावंत यांच्या मार्गदर्शनात येथे उभारण्यात आलेल्या देखाव्यामुळे ते प्रभावित झाले. नागपुरातदेखील ‘फिल्मसिटी’ उभारण्याची आवश्यकता असून, त्यादृष्टीने हालचालीदेखील सुरू झाल्या असल्याची माहिती त्यांनी दिली. नागपूरसह विदर्भातील तरुणांमध्ये प्रचंड क्षमता आहे. या ‘फिल्मसिटी’च्या माध्यमातून त्यांना एक हक्काचा मंच मिळेल. ‘फिल्मसिटी’साठी पारशिवनी तालुक्यातील कुवारा-भिवसेन येथील ४० एकरची जागा प्रस्तावित आहे. या जागेची पाहणी करण्यासाठी आम्ही गुरुवारी जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. 

Web Title: The beginning of Nagpur Durga Mahotsav: Establishment of Adashakti

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.