नागपुरात कृषी विद्यापीठाच्या परिसरात शेतकऱ्यांनी पेटविले धान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 6, 2018 09:48 PM2018-12-06T21:48:36+5:302018-12-06T21:50:43+5:30

जिल्ह्यातील धान उत्पादक शेतकऱ्यांना हक्काचे धरणातील पाणी न मिळाल्यामुळे पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. त्यातूनही कसेबसे शेतकऱ्यांच्या हातात पीक आले असताना शासनाने धानाचे भाव पाडल्याने शेतकरी पुरता खचलेला आहे. आपल्या व्यथा शासनापुढे मांडण्यासाठी रामटेक व पारशिवनी तालुक्यातील काही शेतकऱ्यांनी कृषी विद्यापीठाच्या परिसरात धान जाळले. काही शेतकऱ्यांनी तर आपल्या शेतात धान जाळले.

In the area of ​​Nagpur Agricultural University farmers burnt paddy, | नागपुरात कृषी विद्यापीठाच्या परिसरात शेतकऱ्यांनी पेटविले धान

नागपुरात कृषी विद्यापीठाच्या परिसरात शेतकऱ्यांनी पेटविले धान

Next
ठळक मुद्देपडलेल्या भावामुळे शेतकरी चिंतेत : खर्चही निघाला नसल्याची ओरड

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : जिल्ह्यातील धान उत्पादक शेतकऱ्यांना हक्काचे धरणातील पाणी न मिळाल्यामुळे पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. त्यातूनही कसेबसे शेतकऱ्यांच्या हातात पीक आले असताना शासनाने धानाचे भाव पाडल्याने शेतकरी पुरता खचलेला आहे. आपल्या व्यथा शासनापुढे मांडण्यासाठी रामटेक व पारशिवनी तालुक्यातील काही शेतकऱ्यांनी कृषी विद्यापीठाच्या परिसरात धान जाळले. काही शेतकऱ्यांनी तर आपल्या शेतात धान जाळले.
सहा वर्षाआधी ३८०० रुपये विकलेल्या धानाला आज ३००० ते ३२०० भावाने शेतकऱ्यांना विकावे लागत आहे. त्यामुळे लागलेली लागत सुद्धा शेतकऱ्यांना मिळाली नसल्याची ओरड होत आहे. त्यामुळे हतबल आणि संतप्त झालेल्या टेकाडी येथील भगवानदास यादव या शेतकऱ्याने आपल्या शेतात धान पिक पेटवून सरकारचा विरोधात संताप नोंदविला आहे. सरकारने शेतकऱ्यांना मोठमोठे आश्वासन दिले आणि सत्ता मिळवली. आता मात्र सर्व काही फोल ठरत आहे. शेतकरी नेते संजय सत्यकार यांनी जिल्ह्यातील धानपट्ट्यात सरकार विरोधात आंदोलन सुरू केले आहे. सरकारला शेतकऱ्यांची थोडी तरी फिकर असेल तर लवकरत लवकर झालेल्या नुकसानीची भरपाई जाहीर करावी व धानाच्या पडलेल्या भावाबद्दल भूमिका ठरवावी, अन्यथा आता शेतकरी शांत बसणार नाही आता थेट मुख्यमंत्राच्या बंगल्यासमोर आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. नागपुरात पोहचून गुरुवारी काही शेतकऱ्यांनी कृषी विद्यापीठाच्या परिसरात धान जाळून आपल्या संतप्त भावना व्यक्त केल्या.

Web Title: In the area of ​​Nagpur Agricultural University farmers burnt paddy,

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.