नागपुरात ‘आपली बस’ धावणार सीएनजीवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 17, 2018 09:59 PM2018-11-17T21:59:57+5:302018-11-17T22:05:33+5:30

शहरातील वाढते प्रदूषण रोखण्यासाठी महापालिकेतर्फे संचालित होणारी ‘आपली बस’ आता सीएनजीवर परावर्तित करण्याचा निर्णय परिवहन समितीने घेतला आहे. शनिवारी परिवहन समितीच्या बैठकीत यावर शिक्कामोर्तब करण्यात आले.

'Apali Bus' will run on CNG in Nagpur | नागपुरात ‘आपली बस’ धावणार सीएनजीवर

नागपुरात ‘आपली बस’ धावणार सीएनजीवर

googlenewsNext
ठळक मुद्देप्रायोगिक तत्त्वावर ५० बस परावर्तित करणार वाढत्या प्रदूषणाला बसणार आळा

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : शहरातील वाढते प्रदूषण रोखण्यासाठी महापालिकेतर्फे संचालित होणारी ‘आपली बस’ आता सीएनजीवर परावर्तित करण्याचा निर्णय परिवहन समितीने घेतला आहे. शनिवारी परिवहन समितीच्या बैठकीत यावर शिक्कामोर्तब करण्यात आले.
येत्या २६ जानेवारीपासून महापालिकेच्या मालकीच्या ५० बसेस सीएनजी गॅसवर धावणार आहेत. यामुळे शहरातील प्रदूषण कमी होईल. यासोबतच मनपाचा आर्थिक भार कमी होणार आहे. सद्यस्थितीत वाढत्या डिझेलचे दर बघता महापालिकेने हा निर्णय घेतला आहे. महापालिकेतर्फे शहर बसच्या संचालनासाठी २०१० मध्ये जेएनएनयूआरएमअंतर्गत तीन डिझेल बस आॅपरेटर यांना प्रत्येकी ७९ बसेस दिलेल्या होत्या. यात महापालिकेचा कुठलाही आर्थिक खर्च वाढणार नसल्याची माहिती सभापती बंटी कुकडे यांनी दिली.
बैठकीला स्थायी समिती सभापती वीरेंद्र कुकरेजा, परिवहन समिती सभापती बंटी कुकडे, उपसभापती प्रवीण भिसीकर, सदस्य नितीन साठवणे, नरेंद्र वालदे, सदस्या अभिरुची राजगिरे, उज्ज्वला शर्मा, विद्या मडावी, वैशाली रोहणकर, अर्चना पाठक, कल्पना कुंभलकर, निगम सचिव हरीश दुबे, परिवहन व्यवस्थापक शिवाजी जगताप, वरिष्ठ लेखाधिकारी कावळे, प्रशासकीय अधिकारी रवींद्र पागे, अरुण पिपरुडे, रामराव मातकर, सुकीर सोनटक्के, विनय भारद्वाज प्रामुख्याने उपस्थित होते.

भंगार बसचा लिलाव डिसेंबरपर्यंत
 बैठकीमध्ये भंगार बसच्या लिलावासंदर्भात चर्चा करण्यात आली. डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात लिलाव प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे. डिसेंबर अखेरपर्यंत ही प्रक्रिया पूर्ण करण्यात येणार असल्याचे सभापती कुकडे यांनी स्पष्ट केले.

Web Title: 'Apali Bus' will run on CNG in Nagpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.