वाढीव पेन्शनच्या मागणीसाठी आंध्र प्रदेश ते दिल्ली स्कूटर वारी 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 12, 2018 09:26 PM2018-03-12T21:26:33+5:302018-03-12T21:26:48+5:30

Andhra Pradesh to Delhi Scooter Wari for demand for increased pensions | वाढीव पेन्शनच्या मागणीसाठी आंध्र प्रदेश ते दिल्ली स्कूटर वारी 

वाढीव पेन्शनच्या मागणीसाठी आंध्र प्रदेश ते दिल्ली स्कूटर वारी 

googlenewsNext
ठळक मुद्देसेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा  पुढाकार : ईपीएस-९५ अंतर्गत शासनाला निवेदन

लोकमत न्यूज नेटवर्क 
नागपूर : ईपीएस-९५ अंतर्गत वाढीव पेन्शन व वैद्यकीय सुविधा मिळाव्यात या मागणीसाठी जनजागृती करीत केंद्र सरकारने दाद द्यावी यासाठी गुंटूर आंध्र प्रदेश येथील सेवानिवृत्त कर्मचाऱ्याने पुढाकार घेत आंध्र प्रदेश ते दिल्ली अशी स्कूटरवारी केली.
एल. मुरलीकृष्ण असे या सेवानिवृत्त कर्मचाऱ्याचे नाव आहे. ते आंध्र प्रदेश स्टेट रोड ट्रान्सपोर्टर्स विजयवाडा या विभागातून सेवानिवृत्त झाले. ईपीएस-९५ अंतर्गत शासनाकडून मिळणारी पेन्शन अतिशय तुटपुंजी आहे. ही पेन्शन वाढवण्यात यावी, किमान ७५०० ते १५ हजार रुपये पेन्शन मिळावी तसेच कर्मचाऱ्यांना वैद्यकीय सुविधा मिळाव्यात, यासाठी आॅल इंडिया ईपीएस-९५ संघर्ष समिती शासनाशी लढा देत आहे. यासंदर्भात न्यायालयानेही सकारात्मक निर्णय दिला आहे. परंतु शासन तो निर्णय लागू करण्यास मागे पुढे पाहात आहे. देशभरातील कर्मचारी या संघर्ष समितीशी जुळले आहे. एल. मुरलीकृष्ण हे सुद्धा या संघर्ष समितीचे सदस्य आहेत. ईपीएस-९५ योजने अंतर्गत वाढील पेन्शन व वैद्यकीय सुविधा मिळाव्या, यासाठी त्यांनी स्कूटरने दिल्ली जाण्याचा निर्णय घेतला. त्यांच्याकडे अ‍ॅक्टिव्हा गाडी आहे. या अ‍ॅक्टिव्हा गाडीने ते गेल्या गुरुवारी गुंटूरवरून निघाले. नागपूरसह विविध शहरांमधून ते नवी दिल्लीला पोहोचले. रविवारी दिल्लीतील संघर्ष समितीच्या सहकाऱ्यांसोबत मिळून त्यांनी केंद्रीय कामगार मंत्र्यांना मागणीचे निवेदन सादर केले. यादरम्यान शहरात विविध ठिकाणी त्यांचे स्वागत करण्यात आले. आपल्या मागण्यांबाबत दिल्लीपर्यंत पोहोचत त्यांनी जनजागृती केली.
नागपुरात स्वागत
गुरुवारी ते गुंटूरवरून निघाले. शुक्रवारी ते नागपुरात पोहोचले. येथे आॅल इंडिया ईपीएस-९५ संघर्ष समितीचे नागपूर जिल्हा अध्यक्ष यशवंत गायकवाड यांनी त्यांचे स्वागत केले. सहकारी कार्यकर्त्यांशीही त्यांनी संवाद साधला.

Web Title: Andhra Pradesh to Delhi Scooter Wari for demand for increased pensions

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.