राज्यभरातील पोलीस कर्मचाऱयांना  मिळणार आहारभत्ता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 13, 2017 07:08 PM2017-12-13T19:08:03+5:302017-12-13T19:09:48+5:30

पोलीस आयुक्त, बृहन्मुंबई आयुक्तालयांतर्गत तसेच काही जिल्ह्यात आठ तास कर्तव्य प्रायोगिक तत्त्वावर सुरू करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे २४ तासाच्या कालावधीत सतत १० तासांच्यावर बंदोबस्त ड्युटी किंवा इतर कामासाठी हजर राहावे लागल्यास संबंधित पोलीस कर्मचारी व अधिकाऱयांना अतिकालिक(आहार)भत्ता देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी विधान परिषदेत प्रश्नाच्या लेखी उत्तरात दिली.

Alpohar bhatta can get police personnel all over the state | राज्यभरातील पोलीस कर्मचाऱयांना  मिळणार आहारभत्ता

राज्यभरातील पोलीस कर्मचाऱयांना  मिळणार आहारभत्ता

googlenewsNext
ठळक मुद्देविधान परिषद मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली माहिती

आॅनलाईन लोकमत
नागपूर : पोलीस आयुक्त, बृहन्मुंबई आयुक्तालयांतर्गत तसेच काही जिल्ह्यात आठ तास कर्तव्य प्रायोगिक तत्त्वावर सुरू करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे २४ तासाच्या कालावधीत सतत १० तासांच्यावर बंदोबस्त ड्युटी किंवा इतर कामासाठी हजर राहावे लागल्यास संबंधित पोलीस कर्मचारी व अधिकाऱयांना अतिकालिक(आहार)भत्ता देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी विधान परिषदेत प्रश्नाच्या लेखी उत्तरात दिली.
पोलीस उपनिरीक्षक, सहायक पोलीस उपनिरीक्षक, फोटोग्राफर यांना प्रतिमाह १५०० रुपये तर पोलीस हवालदार, पोलीस नाईक, पोलीस शिपाई आदींना प्रतिमाह १३५० रुपयेप्रमाणे १ डिसेंबर २०१७ पासून आहारभत्ता मंजूर करण्यात आला आहे. तसेच पोलीस अधिकारी व कर्मचाऱयांच्या साप्ताहिक सुटी अतिशय महत्त्वाच्या कामाव्यतिरिक्त रद्द करण्यात येऊ नयेत, अशा सूचना विभागाला देण्यात आल्या आहेत. साप्ताहिक सुटी रद्द केल्यास संबंधित पोलीस कर्मचाऱ्यास  साप्ताहिक सुटीच्या मोबदल्यात एक दिवसाचे वेतन व दैनिक भत्ता म्हणून देण्याचे आदेश देण्यात आले आहे.
पोलीस कर्मचाऱ्यांवर कामाचा अतिताण येऊ नये याकरिता पोलीस मुख्यालयात ताणतणाव मुक्तता शिबिरे घेतली जातात. तज्ज्ञांकडून योगाचे प्रशिक्षण दिले जाते. तसेच पोलीस कर्मचाकर्मचाऱ्यांना स्वमालकीची घरे विकत घेता यावीत यासाठी घर बांधकाम अग्रीम मंजूर करण्यात येते, अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली.

Web Title: Alpohar bhatta can get police personnel all over the state

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.