एअर एशिया इंडियातर्फे दोन गंतव्य स्थळात वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 5, 2018 11:36 PM2018-03-05T23:36:23+5:302018-03-05T23:36:53+5:30

एअर एशिया इंडियाने त्यांच्या ६ व्या एअरक्राफ्टच्या समावेशाची आणि गंतव्य स्थळांच्या यादीत नागपूर व इंदोरच्या समावेशाची घोषणा केली आहे.

Air Asia India has exted two destinations | एअर एशिया इंडियातर्फे दोन गंतव्य स्थळात वाढ

एअर एशिया इंडियातर्फे दोन गंतव्य स्थळात वाढ

googlenewsNext
ठळक मुद्देगंतव्य स्थळांच्या यादीत नागपूर व इंदूर

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : एअर एशिया इंडियाने त्यांच्या ६ व्या एअरक्राफ्टच्या समावेशाची आणि गंतव्य स्थळांच्या यादीत नागपूर व इंदोरच्या समावेशाची घोषणा केली आहे. कंपनीने बेंगळुरू व कोलकाता आणि इंदोर ते बेंगळुरू व गोवा या ठिकाणांना जोडत नवीन मार्गांचा समावेश केला आहे. एअर एशिया इंडियाकडून ही घोषणा २०१८ च्या पहिल्या तीन महिन्यात करण्यात आली असून, प्रत्येकाला विमान प्रवासाचा आनंद देण्याच्या त्यांच्या बांधिलकीचा हा एक भाग आहे. इंदोर, नागपूर, कोलकाता व बेंगळुरू येथील प्रवाशांमध्ये विद्यार्थी, व्यापारी आणि कॉर्पोरेट्स असा विविध प्रकारच्या प्रवाशांचा समावेश आहे. एअर एशिया इंडिया किफायतशीर दरात जलद प्रवास करण्यासाठी त्यांना सक्षम बनवत आहे. या विकासाबाबत बोलताना एअर एशिया इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी अमर अबरोल म्हणाले, २०१८ हे वर्ष आमच्यासाठी चांगले सिद्ध झाले आहे. आम्ही वर्षाच्या पहिल्या तिमाहीत आमच्या दुसºया एअरक्राफ्टचा समावेश केला आहे. इंदोर व नागपूरच्या समावेशासह आम्ही भारताच्या कानाकोपºयाला जोडत आहोत. आमचे २६ टक्के प्रवासी पहिल्यांदा प्रवास करणारे असल्याने प्रादेशिक जोडणी आमच्यासाठी प्राधान्यक्रमावर आहे. आम्ही कार्यरत असलेल्या बाजारपेठांमध्ये विमान प्रवासामध्ये क्रांती करण्याचे आमचे ध्येय आहे.’ प्रवासी वेबसाईटवर किंवा एअर एशिया मोबाईल अ‍ॅपवर त्यांच्या फ्लाईट बुक करू शकतात. बेंगळुरू ते नागपूर १९९९ रुपये, बेंगळुरू ते इंदोर १९९९, इंदोर ते गोवा २४९९ आणि नागपूर ते कोलकाता १९९९ अशा कमीतकमी दरांचा लाभ प्रवासी घेऊ शकतात. नवीन विभागांकरीता बुकिंग २७ फेब्रुवारीपासून उपलब्ध आहे.

Web Title: Air Asia India has exted two destinations

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.