नागपुरात वॉकाथानद्वारे वकिलांनी दिला आरोग्याचा संदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 28, 2018 12:34 AM2018-01-28T00:34:46+5:302018-01-28T00:39:51+5:30

नागपूर हायकोेर्ट बार असोसिएशनतर्फे शुक्रवारी २६ जानेवारी रोजी वॉकाथान काढण्यात आले. या उपक्रमात सुमारे सहाशे ते सातशे वकिलांनी सहभागी होऊन सुदृढ आरोग्याचा संदेश दिला.

Advocates gave health message by Wakathan in Nagpur | नागपुरात वॉकाथानद्वारे वकिलांनी दिला आरोग्याचा संदेश

नागपुरात वॉकाथानद्वारे वकिलांनी दिला आरोग्याचा संदेश

Next
ठळक मुद्देसातशे वकिलांचा सहभाग : हायकोेर्टाच्या पूर्व प्रवेशद्वारापासून झाला प्रारंभ

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : नागपूर हायकोेर्ट बार असोसिएशनतर्फे शुक्रवारी २६ जानेवारी रोजी वॉकाथान काढण्यात आले. या उपक्रमात सुमारे सहाशे ते सातशे वकिलांनी सहभागी होऊन सुदृढ आरोग्याचा संदेश दिला. या वॉकाथानमध्ये न्यायमूर्ती रवी देशपांडे, अ‍ॅड. सुनील शुक्रे, न्या. झेड ए. हक, न्या. विनय देशपांडे, न्या. रोहित देव हेसुद्धा सहभागी झाले होते. हायकोर्ट बार असोसिएशनचे अध्यक्ष अ‍ॅड. अनिल किलोर यांच्यासह कार्यकारी समितीचे उपाध्यक्ष पुरुषोत्तम पाटील, गौरी व्यंकटरमण, सचिव प्रफुल खुबलकर, लायब्रेरी इन्चार्ज उमेश बिसेन, कोषाध्यक्ष प्रीती राणे, सदस्य कौस्तुभ देवगडे, मीर अली व अनेक ज्येष्ठ वकील, हायकोर्टाचे कर्मचारी यांनीही उत्साहाने या वॉकाथानमध्ये आपला सहभाग नोंदविला. सकाळी ८ वाजता वॉकाथानला सुरुवात झाली. हायकोेर्टाच्या पूर्व प्रवेशद्वारापासून वॉकाथानला प्रारंभ झाला. जपानी गार्डन, ज्योती बिल्डिंग, रामगिरी आणि पोलीस आयुक्त कार्यालयामार्गे परत, असा या वॉकाथानचा प्रवास झाला.

Web Title: Advocates gave health message by Wakathan in Nagpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.