अकोल्यात शस्त्रसाठय़ासह आरोपी गजाआड

By Admin | Published: August 30, 2014 01:35 AM2014-08-30T01:35:14+5:302014-08-30T01:37:46+5:30

अकोल्यात शस्त्रसाठय़ासह आरोपी गजाआड; घरात लपवून ठेवल्या होत्या १२ तलवारी, चाकू व खंजीर

The accused accused along with arms and ammunition in Akola | अकोल्यात शस्त्रसाठय़ासह आरोपी गजाआड

अकोल्यात शस्त्रसाठय़ासह आरोपी गजाआड

googlenewsNext

अकोला : गणेशोत्सवाच्या पूर्वसंध्येवर खदान पोलिसांनी शुक्रवारी रात्री आदर्श कॉलनीतील एका घरामधून शस्त्रसाठय़ासह आरोपीस अटक केली.
खदान पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक छगनराव इंगळे व त्यांच्या पथकाला आदर्शनगरातील घरामध्ये शस्त्रसाठा लपवून ठेवला असल्याची माहिती मिळाली. माहितीनुसार पोलिसांनी आदर्श कॉलनीतील मनपा शाळा क्र. १६ लगतच्या घरामध्ये छापा घातला. पोलिसांनी युसूफअली खदानमध्ये राहणारा उमरावसिंह प्रेमसिंह बावरी (६५) व त्याचा मुलगा रणजितसिंह बावरी या दोघांना अटक केली. त्यांच्याकडून पोलिसांनी १२ धारदार तलवारी, ३ अँटोमेटिक चाकू, ३ लोखंडी खंजीर आणि ५ फायटर जप्त केले. आरोपी उमरावसिंह बावरी याने महिनाभरापूर्वी आदर्श कॉलनीमध्ये पाटील नामक इसमाचे घर भाड्याने घेतले होते. या घराचा वापर बावरी हा तयार केलेल्या तलवारी, चाकू आदी शस्त्रसाठा ठेवण्यासाठी करीत होता. ही कारवाई अतिरिक्त पोलिस अधीक्षक निकेश खाटमोडे पाटील यांच्या मार्गदर्शनात पीएसआय टिकाराम थाटकर, अनिल धनभर, अजय गाडगे, पोकाँ किशोर सोनोने, सागर भारस्कर, एएसआय मुमताज खान पठाण यांच्या पथकाने केली. शनिवारी आरोपीला न्यायालयात हजर केले जाणार आहे.

Web Title: The accused accused along with arms and ammunition in Akola

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.