दिवाळीच्या तोंडावर कुटुंबावर काळाचा घाला, लाकडी कपाट अंगावर पडून चार वर्षीय चिमुरडीचा मृत्यू

By योगेश पांडे | Published: November 7, 2023 06:26 PM2023-11-07T18:26:03+5:302023-11-07T18:26:38+5:30

दिवाळीच्या आधीची साफसफाई करत असताना घडला प्रकार

A four-year-old girl died after a wooden shelf fell on the family on the eve of Diwali | दिवाळीच्या तोंडावर कुटुंबावर काळाचा घाला, लाकडी कपाट अंगावर पडून चार वर्षीय चिमुरडीचा मृत्यू

दिवाळीच्या तोंडावर कुटुंबावर काळाचा घाला, लाकडी कपाट अंगावर पडून चार वर्षीय चिमुरडीचा मृत्यू

योगेश पांडे,लोकमत न्यूज नेटवर्क,नागपूर : सध्या दिवाळीचा सण हा जवळ आला आहे.त्यामुळे प्रत्येक घरामध्ये सर्वजण साफसफाई तसेच घरातील सजावटीमध्ये  दंग झाले आहेत.परंतु नंदूरबबारमध्ये या सणाची तयारी करताना एका कुटूंबावर काळाने घाला घातला.प्रकाशपर्वाचे स्वागत करण्यासाठी घराची साफसफाई करणे एका कुटुंबियासाठी काळ्याकुट्ट अंधाराकडे नेणारे ठरले. आनंदाच्या दिवसांमध्ये या कुटूंबावर दुखाचा डोंगर कोसळला आहे.अंगावर लाकडाचे कपाट पडून खेळणाऱ्या-बागडणाऱ्या त्यांच्या अवघ्या चार वर्षीय चिमुकलीचा मृत्यू झाला. या घटनेमुळे केवळ नातेवाईकच नव्हे तर परिसरातील नागरिकांना मोठा धक्का बसला आहे. सगळ्यांशी बोबडे बोल बोलणारी चिमुकली नेहमीसाठी शांत झाल्याने संपूर्ण शहरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. नागपूर एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे.

ईकविरा राजेश गहलोत (४, रंजना हिल्स, माधवनगरी, ईसासनी) असे मृतक मुलीचे नाव आहे. साधारणत रविवारी सकाळच्या सुमारास दिवाळीच्या निमित्ताने तिच्या पालकांनी घराची साफसफाई करण्याचं ठरविण्यात आले.त्यामुळे घरातील काही सामान अंगणात काढून ठेवण्यात आले . त्यात जोडे चपला ठेवण्याच्या वापरण्यात येणाऱ्या जुन्या लाकडाच्या कपाटाचा देखील समावेश होता.

 वजनाने भारी-भक्कम असलेले हे कपाट या चिमुकळीच्या अंगावर कोसळले. घरातील सगळे साफसफाईच्या कामात व्यस्त असताना त्यानेळी ईकविरा ही सामानाजवळ खेळत होती.कोणाचेही   ईकविराकडे लक्ष नव्हते.अचानक ते कपाट लहान ईकविराच्या अंगावर पडले. त्याखाली कपाटाखाली ही ४ वर्षांची चिमुरडी दबली गेली. तिचा आक्रोश ऐकून तिचे पालक धावले. कापाटाचा मार लागल्याने ही लहान मुलगी गंभीर जखमी झाली होती. तिला उपचारासाठी एका रुग्णालयात नेले असता उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. 

या घटनेमुळे तिच्या ईकविराच्या पालकांच्या पायाखालची जमीनच निसटली. काही वेळाअगोदर हसत खेळत असणारी ईकविरा अचानक गेल्याचा त्यांना विश्वासच बसत नव्हता. .या चिमुरडीच्या जाण्याने तिच्या आईचा आक्रोश थांबत नव्हता.हे गहलोत कुटुंब मुळचे राजस्थान येथील आहे. परंतू पोटासाठी कामानिमित्त ते नागपुरात राहत होते.  एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

Web Title: A four-year-old girl died after a wooden shelf fell on the family on the eve of Diwali

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.