राज्यात सहा महिन्यांत २९६५ अल्पवयीन मुली बेपत्ता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2018 11:53 AM2018-01-13T11:53:31+5:302018-01-13T11:55:22+5:30

अवघ्या सहा महिन्यांच्या काळात महाराष्ट्रात दहा-वीस नव्हे तर तब्बल दोन हजार ९६५ अल्पवयीन मुली बेपत्ता झाल्याची धक्कादायक आकडेवारी गृह खात्याच्या अहवालातून पुढे आली आहे.

2965 missing minor girls in six months in state | राज्यात सहा महिन्यांत २९६५ अल्पवयीन मुली बेपत्ता

राज्यात सहा महिन्यांत २९६५ अल्पवयीन मुली बेपत्ता

Next
ठळक मुद्देटोळी सक्रिय असल्याचा संशय देहव्यापार, आखाती देशात नेल्याचा कयास

राजेश निस्ताने ।
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : अवघ्या सहा महिन्यांच्या काळात महाराष्ट्रात दहा-वीस नव्हे तर तब्बल दोन हजार ९६५ अल्पवयीन मुली बेपत्ता झाल्याची धक्कादायक आकडेवारी गृह खात्याच्या अहवालातून पुढे आली आहे. हा आकडा पाहता अपहरण करणाऱ्या टोळ्याच राज्यात सक्रिय असाव्या, असा संशय व्यक्त केला जात आहे.
राज्यात रोज कोणत्या ना कोणत्या पोलीस ठाण्यात अल्पवयीन मुलीच्या अपहरणाची तक्रार प्राप्त होते. अनेकदा लग्नाचे आमिष देऊन मुलीला पळविले गेले असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न होते. पुढे अशा मुलींचा शोध घेऊन एक तर त्यांना पालकांच्या ताब्यात दिले जाते किंवा सुधारगृहात पाठविले जाते. परंतु अशी प्रकरणे फारच कमी असतात. बहुतांश प्रकरणात अल्पवयीन मुलीचा थांगपत्ताच लागत नाही. मुलींचा शोध घ्यावा म्हणून त्यांचे नातेवाईक पोलीस ठाण्यापासूून महासंचालक कार्यालय व गृह मंत्रालयापर्यंत पत्रव्यवहार करतात. परंतु ‘शोध सुरू आहे’, एवढेच ठेवणीतील उत्तर मिळते. आर्थिकदृष्ट्या सक्षम असतील तर अनेकदा नातेवाईक स्वबळावर शोध घेण्याचाही प्रयत्न करतात. परंतु त्यांना यश येतेच असे नाही.
जानेवारी ते जून २०१७ या सहा महिन्यात राज्यात तब्बल दोन हजार ९६५ अल्पवयीन मुली बेपत्ता झाल्याची नोंद पोलीस दप्तरी आहे. २०१६ मध्ये जानेवारी ते जूनचा हा आकडा दोन हजार ८८१ एवढा होता. अर्थात गेल्या वर्षीच्या तुलनेत २०१७ मध्ये अल्पवयीन मुली बेपत्ता होण्याचे प्रमाण ८४ ने वाढले आहे. अशा मुलींना भुलवून पळवून नेणारी टोळी राज्यात सक्रिय असावी, या मुलींचा देहव्यापार, लव्हजिहाद, आखाती देशातील वेश्या व्यवसाय, परप्रांतातील विवाह, घरकाम
यासाठी वापर केला जात असावा, असा संशय आहे.
टोळी सक्रिय असण्याची शक्यता मात्र गृह खात्याकडून फेटाळण्यात आली आहे. अशा घटना टाळण्यासाठी अनैतिक व्यापार प्रतिबंध कक्ष, थेट अपहाराचा गुन्हा, स्वतंत्र पथक, प्रबोधन-जनजागृती आदी विविध उपाययोजना व जनजागृती केली जात असल्याचे शासनाकडून सांगितले जाते.
परंतु अल्पवयीन मुलींच्या बेपत्ता होण्याचा वाढता आकडा
लक्षात घेता या उपाययोजना थिट्या ठरत आहेत.

‘आॅपरेशन’द्वारे शोधाशोध
हरविलेल्या बालकांच्या शोधार्थ आॅपरेशन मुस्कान, आॅपरेशन स्माईल राबविले जाते. २०१६ मध्ये या आॅपरेशनमधून हरविलेल्या एक हजार ६१३ तर २०१७ मध्ये ६४५ बालकांचा शोध लावण्यात आला आहे.

Web Title: 2965 missing minor girls in six months in state

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Kidnappingअपहरण