सहा दिवसात २४ टिप्पर पकडले : रेती माफियांमध्ये खळबळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 5, 2019 10:53 PM2019-06-05T22:53:37+5:302019-06-05T22:54:16+5:30

रेती माफियाविरुद्ध चालविण्यात आलेल्या विशेष अभियानांतर्गत वाहतूक पोलिसांनी कळमन्यातील चिखली चौकात पाच वाहनांना पकडले. पोलिसांनी वाहन व रेतीसह ७६ लाखाचा माल जप्त केला. वाहतूक पोलिसांनी रेती माफियाविरुद्ध सुरू केलेल्या या मोहिमेंतर्गत गेल्या ६ दिवसात २४ रेतीचे ट्रक पकडले आहेत. त्यामुळे रेती माफियांमध्ये खळबळ उडाली आहे.

24 tippers seized in six days: Sensation in Sand Mafia | सहा दिवसात २४ टिप्पर पकडले : रेती माफियांमध्ये खळबळ

सहा दिवसात २४ टिप्पर पकडले : रेती माफियांमध्ये खळबळ

Next
ठळक मुद्देचिखलीमध्ये रेती तस्करांवर कारवाई

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : रेती माफियाविरुद्ध चालविण्यात आलेल्या विशेष अभियानांतर्गत वाहतूक पोलिसांनी कळमन्यातील चिखली चौकात पाच वाहनांना पकडले. पोलिसांनी वाहन व रेतीसह ७६ लाखाचा माल जप्त केला. वाहतूक पोलिसांनी रेती माफियाविरुद्ध सुरू केलेल्या या मोहिमेंतर्गत गेल्या ६ दिवसात २४ रेतीचे ट्रक पकडले आहेत. त्यामुळे रेती माफियांमध्ये खळबळ उडाली आहे.
वाहतूक पोलीस आतापर्यंत सकाळच्या वेळी कारवाई करीत असत. ही कारवाई लक्षात घेता रेती चोरी करणाऱ्या वाहनचालकांनी आपला वेळ व मार्गही बदलवून घेतला होता. ते सायंकाळच्या सुमारास रेतीचे ट्रक घेऊन जाऊ लागले होते. याबाबत माहिती मिळताच वाहतूक पोलिसांनी मंगळवारी सायंकाळी चिखली चौकात अभियान राबवले. यात पोलिसांनी सतीश बाजीराव वाघाडे (२९) कोंडणगड, भंडारा येथील टिप्पर क्रमांक एमएच/२९/एम/५५८, ज्ञानेश्वर श्रीहरी पंदरे (३०) रावणवाडी, भंडारातील टिप्पर क्रमांक एमएच/३६/एफ/३०७५, विजय लक्ष्मण शेंद्रे (२४) पालगाव, भंडारातील टिप्पर क्रमांक एमएच ३६/एफ/१२५४, शेख वसीम शेख बाबू (२८) कमसुरी बाजार, कामठी टिप्पर क्रमांक एमएच ४०/बीजी/४१९७ आणि पुरुषोत्तम गोरेलाल चव्हाण (३०) भवानी नगर, पारडी येथील टिप्पर क्रमांक एमएच/४०/एके/४३८९ ला रोखले. एकाही वाहन चालकाकडे रेतीच्या रॉयल्टीचे दस्तावेज नव्हते. पोलिसांनी वाहन व रेती जप्त केली. वाहतूक पोलिसांनी तहसीलदार आणि परिवहन विभागाला पत्र पाठवून कारवाईची सविस्तर माहिती दिली आहे. त्यांच्या तपासाच्या आधारावर गुन्हा दाखल केला होईल. यापूर्वी हुडकेश्वर हद्दीत १६ आणि प्रतापनगर परिसरात ३ वाहनांना पकडण्यात आले होते. या कारवाईमुळे रेती माफियांमध्ये खळबळ उडाली आहे. पहिल्यांदा वाहतूक पोलिसांनी याप्रकारची मोहीम राबविली आहे. ही मोहीम पुढेही सुरु राहणार आहे. ही कारवाई पोलीस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय, सहआयुक्त रवींद्र कदम यांच्या मार्गदर्शनात वाहतूक विभागाचे डीसीपी गजानन राजमाने, सीताबर्डी विभागाचे एपीआय ओम सोनटक्के, कामठी विभागाचे पीएसआय मोटे आणि सक्करदरा विभागाचे पीएसआय आगरकर यांनी केली.

 

 

Web Title: 24 tippers seized in six days: Sensation in Sand Mafia

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.