नागपूर विद्यापीठाच्या १०४ व्या दीक्षांत समारंभात १६९ गुणवंतांचा सत्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 30, 2017 09:32 PM2017-11-30T21:32:23+5:302017-11-30T21:43:29+5:30

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचा १०४ वा दीक्षांत समारंभ रविवार ३ डिसेंबर रोजी आयोजित करण्यात आला आहे. या दीक्षांत समारंभात जी.एच.रायसोनी विधी महाविद्यालयाचा विद्यार्थी साहिल श्याम देवानी याला सर्वाधिक २० पदके व पारितोषिकांनी सन्मानित करण्यात येणार आहे.

169 scholars will be Honors at the 104th Convocation of Nagpur University | नागपूर विद्यापीठाच्या १०४ व्या दीक्षांत समारंभात १६९ गुणवंतांचा सत्कार

नागपूर विद्यापीठाच्या १०४ व्या दीक्षांत समारंभात १६९ गुणवंतांचा सत्कार

Next
ठळक मुद्दे३ डिसेंबर रोजी आयोजनसाहिल देवानी याला सर्वाधिक २० पुरस्कार

आॅनलाईन लोकमत
नागपूर :राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचा १०४ वा दीक्षांत समारंभ रविवार ३ डिसेंबर रोजी आयोजित करण्यात आला आहे. या दीक्षांत समारंभात जी.एच.रायसोनी विधी महाविद्यालयाचा विद्यार्थी साहिल श्याम देवानी याला सर्वाधिक २० पदके व पारितोषिकांनी सन्मानित करण्यात येणार आहे.
३ डिसेंबर रोजी कविवर्य सुरेश भट सांस्कृतिक सभागृहात होणाऱ्या  दीक्षांत समारंभाला अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेचे अध्यक्ष डॉ.अनिल सहस्रबुद्धे हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. यावेळी विविध विद्याशाखांमधील विद्यार्थ्यांना पदके व पारितोषिकांचे वाटप करण्यात येणार आहे. दीक्षांत समारंभात २०१६ च्या उन्हाळी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना स्नातक व स्नातकोत्तर पदव्या प्रदान केल्या जाणार आहेत.

विधी शाखेचा वरचष्मा
१०३ व्या दीक्षांत समारंभात विधी शाखेच्या विद्यार्थ्यांचाच वरचष्मा दिसून येणार आहे. जी.एच.रायसोनी महाविद्यालयाचा साहिल श्याम देवानी याचा ‘एलएलबी’मध्ये (५ वर्षीय अभ्यासक्रम) सर्वात जास्त ‘सीजीपीए’ मिळविल्याबद्दल २० पदके व पारितोषिकांनी सन्मान होणार आहे. धोटे बंधू विज्ञान महाविद्यालय, गोंदिया येथील विद्यार्थिनी निशा देवानंद खोटेले हिला ‘बीएसस्सी’मध्ये सर्वाधिक गुण प्राप्त केल्याबद्दल १६ पदके व पारितोषिके प्रदान करण्यात येतील. तर नागपूर विद्यापीठाद्वारे संचालित डॉ.बाबासाहेब आंबेडकर विधी महाविद्यालयाच्या शहर शाखेतील विद्यार्थिनी शीतल कौशिदास वासनिक हिला ‘एलएलबी’त (३ वर्षीय अभ्यासक्रम) सर्वात जास्त गुण सरासरी प्राप्त केल्याबद्दल १४ पदके व पारितोषिकांनी गौरविण्यात येईल.

यंदा दोन ‘डी.लिट.’
दरम्यान, यंदाच्या दीक्षांत समारंभात दोन ‘डी.लिट.’ प्रदान करण्यात येणार आहेत. गोंदिया येथील आर.एम.पटेल महाविद्यालयातील सेवानिवृत्त विभागप्रमुख डॉ.कादेरा तालीब शेख (जुल्फी)यांना मराठी भाषेतील संशोधनासाठी तर नागपूर विद्यापीठाच्या पाली-प्राकृत विभागप्रमुख डॉ.मालती साखरे यांना पाली भाषेतील संशोधनासाठी ही पदवी देण्यात येईल. पाली भाषेतील नागपूर विद्यापीठातील ही पहिली ‘डी.लिट.’ राहणार आहे हे विशेष.

यंंदा पदवीधर घटले
यंदाच्या दीक्षांत समारंभात पदवीधरांची एकूण संख्या घटल्याचे दिसून येत असून ‘पीएचडी’ मिळणाºयांचे प्रमाणदेखील कमी झाले आहे. दीक्षांत समारंभात २०१६ च्या उन्हाळी व हिवाळी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या ५७ हजार २५९ विद्यार्थ्यांना स्नातक व स्नातकोत्तर पदव्या प्रदान केल्या जाणार आहेत. तसेच विविध परीक्षांमधील १६९ प्राविण्यप्राप्त विद्यार्थ्यांना २९६ सुवर्ण पदके, ४२ रौप्य पदके, १०० पारितोषिके अशी एकूण ४३८ पदके आणि पारितोषिके प्रदान करण्यात येणार आहेत.
मागील चार दीक्षांत समारंभांच्या तुलनेत यंदा पदवीधरांचे प्रमाण घटले आहे. मागील वर्षी पदवीधरांची संख्या ६४ हजार ४५९ इतकी होती. यंदा त्यात ७ हजार २०० म्हणजेच १०.८६ टक्के घट झाली आहे. मागील दीक्षांत समारंभात ८४२ विद्यार्थ्यांना ‘पीएचडी’ पदवी प्रदान करण्यात आली होती. या वर्षी हाच आकडा ७६९ इतका झाला आहे.

 

Web Title: 169 scholars will be Honors at the 104th Convocation of Nagpur University

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.