१०० कोटींच्या खरेदीची ‘गुढी’

By admin | Published: April 7, 2016 03:00 AM2016-04-07T03:00:38+5:302016-04-07T03:00:38+5:30

साडेतीन मुहूर्तापैकी एक समजल्या जाणाऱ्या गुढीपाडव्यानिमित्त नागपुरात विविध बाजारपेठांमध्ये विभिन्न आॅफर्सची रेलचेल आहे.

100 crore purchase of 'Gudi' | १०० कोटींच्या खरेदीची ‘गुढी’

१०० कोटींच्या खरेदीची ‘गुढी’

Next

बाजार हाऊसफुल्ल : दुचाकी, कार व इलेक्ट्रॉनिक्स उपकरणांना मागणी
नागपूर : साडेतीन मुहूर्तापैकी एक समजल्या जाणाऱ्या गुढीपाडव्यानिमित्त नागपुरात विविध बाजारपेठांमध्ये विभिन्न आॅफर्सची रेलचेल आहे. एक ग्रॅम सोन्यापासून ते स्वप्नातील घर, गृहोपयोगी वस्तू, दुचाकी, चारचाकी वाहने आणि इलेक्ट्रॉनिक्स वस्तू खरेदीसाठी ग्राहकांमध्ये प्रचंड उत्साह आहे. शुभमुहूर्तावर बाजारपेठांमध्ये एकत्रित १०० कोटींपेक्षा जास्त उलाढाल होईल, अशी माहिती आहे.
इलेक्ट्रॉनिक्स बाजारपेठेत उत्साह
महागाई असतानाही ग्राहक खरेदीसाठी उत्सुक आहेत. गुढीपाडव्यासाठी विविध बाजारपेठांमध्ये उत्साह आहे. व्यापाऱ्यांनी शोरूमही पारंपरिक पद्धतीने सजविल्या आहेत. घर खरेदीचे नियोजन करणाऱ्या ग्राहकांसाठी बुकिंगवर आकर्षक आॅफर्स दिल्या जात आहेत. याशिवाय सोनी, सॅमसंग, एलजी, गोदरेज, आयएफबी, नोकिया, हिताची, एस्सर, डेल, एचपी, लिनोव्ह, आसूस, इलेक्ट्रोलक्स या कंपन्याची उपकरणे खरेदीवर ग्राहकांना आकर्षक भेटवस्तू मिळणार आहे.
एलईडी, वॉशिंग मशीन, रेफ्रिजरेटर, एअर कंडिशनर, मायक्रोवेव्ह ओव्हन, लॅपटॉप, कॅमेरा, हॅण्डीकॅम, स्मार्टफोन इंडक्शन शेगडी, लॅपटॉप आदींवर केवळ गुढीपाडव्यापर्यंतच आॅफर देण्यात येत आहेत. नामांकित कंपन्यांच्या लॅपटॉपवर अधिक आॅफर्स आहेत.
दुचाकी व चारचाकी खरेदी
मारुती, टाटा, टोयोटा, आॅडी, होंडा, जनरल मोटर्स, ह्युंडई, रेनॉल्ट, फोर्ड, फिएट, अशोक लेलँड, शेवरले या नामांकित कंपन्यांच्या प्रवासी आणि व्यावसायिक वाहनांवर आर्थिक बचतीच्या आकर्षक आॅफर्स आहेत.
इंटरनेटवर खरेदी वाढली
इंटरनेटमुळे या खरेदीचा ट्रेंडच बदलला आहे. आता घरबसल्याही खरेदी करण्यात येते. त्यामुळे दुकानांमध्ये जाऊन तासन्तास घालविण्यापेक्षा इंटरनेटवर काही वेळेतच खरेदी केली जाते. हा ट्रेंड आता चांगलाच रुजू लागला आहे. बाहेर जाऊन फिरण्याचा वेळ व पेट्रोल वाचते. तसेच घरबसल्या लॅपटॉपवर सर्व प्रकारच्या वस्तू पहावयास मिळतात. त्यामुळे घरी बसून आॅनलाईन शॉपिंगचा फंडा सध्या जोरात आहे. आॅनलाईन खरेदी केल्यानंतर वस्तू घरपोच मिळते. तसेच वस्तू खराब असेल तर महिनाभरात परतही करता येते. त्यामुळे फसवणूक होण्याची शक्यता कमीच असते. गुढीपाडव्याला खरेदी शुभ मानण्यात येत असल्याने बाजारपेठांमध्ये उत्साह असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले.

Web Title: 100 crore purchase of 'Gudi'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.