तंबाखू

By admin | Published: April 12, 2015 06:05 PM2015-04-12T18:05:24+5:302015-04-12T18:05:24+5:30

सिगारेटच्या पाकिटांवरले ‘वैधानिक’ इशारे, तंबाखूच्या गोळ्या ठेवून फाटलेल्या गालांचे भीषण फोटो आणि सिनेमाआधी फुफ्फुसं पिळून काळ्या डांबराचा चिकटा पाडणा-या ‘माहितीपटा’चा आग्रह महत्त्वाचा, पण पुरेसा नाही!

Tobacco | तंबाखू

तंबाखू

Next

सिगारेटची पाकीटं आणि एकूणच तंबाखू उत्पादनांच्या वेष्टनावरची किती टक्के जागा ‘धोक्याचा इशारा’ छापण्यासाठी वापरावी याची चर्चा चालू आहे. तंबाखूच्या व्यसनाविरोधातल्या मोहिमांसमोर खरं आव्हान आहे प्रतिमाभंजनाचं!!

सिगारेटच्या पाकिटांवरले ‘वैधानिक’ इशारे, तंबाखूच्या गोळ्या ठेवून फाटलेल्या गालांचे भीषण
फोटो आणि सिनेमाआधी फुफ्फुसं पिळून काळ्या डांबराचा चिकटा पाडणा-या ‘माहितीपटा’चा आग्रह
महत्त्वाचा, पण पुरेसा नाही!
---------------
डॉ. अभय बंग

तंबाखूच्या संदर्भात दोन मुख्य प्रश्न.
- तंबाखूनं खरंच काही हानी होते का?
- आणि हानी होत असेल तर त्यावर नियंत्रण कसं मिळवायचं?
यासंदर्भातली दोन चित्रं आपल्यासमोर आहेत.
चित्र एक- संसदीय समितीचे अध्यक्ष व काही खासदारांनी अलीकडेच जाहीरपणो सांगितलं, तंबाखूमुळे कॅन्सर किंवा हानी होण्याचा कोणताच पुरावा नाही, उलट वैद्यकीयदृष्टय़ा तंबाखू फायदेशीरच आहे!
चित्र दोन- आपल्याच महाराष्ट्रातले दोन नेते.  आर. आर. आबा पाटील आणि शरद पवार.
आर. आर. पाटील यांनी मृत्युशय्येवरूनही अतिशय कळकळीनं आणि तळमळीनं सांगितलं, ‘‘गुटखा आणि तंबाखूचं व्यसन मी सोडू शकलो नाही. त्यामुळेच माझी ही अवस्था झाली. कृपा करून या व्यसनाला बळी पडू नका.’’
दहा  वर्षापूर्वी अजित पवारांनी आबांना तंबाखू खाण्याबद्दल जाहीरपणो फटकारलं होतं. त्यांनीही तंबाखू सोडण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला, अगदी मानसोपचारतज्ज्ञाचीही मदत घेतली, पण आर. आर. पाटील हे व्यसन सोडू शकले नाहीत आणि महाराष्ट्र एका चांगल्या आणि गुणी नेत्याला मुकला.
दुसरीकडे शरद पवार यांनी नुकतंच, पहिल्यांदाच जाहीरपणो सांगितलं, गुटख्याच्या सवयीमुळेच मला तोंडाचा कॅन्सर झाला, माङो सगळे दात काढून टाकावे लागले.
महाराष्ट्रातल्या या दोन मोठय़ा नेत्यांच्या प्रत्यक्ष अनुभवानंतर ‘तंबाखूमुळे कॅन्सर होत नाही’ असा मुद्दा कोणी उपस्थित करू नये.
तंबाखूमुळे तोंड, घसा, अन्ननलिका, फुफ्फुस तसेच स्त्रियांना स्तनांचा कॅन्सर होऊ शकतो. एवढंच नव्हे, हृदयरोग, लकवा, दमा, टीबीचं प्रमाण खूपच मोठय़ा प्रमाणावर वाढतं. भारतात दरवर्षी तब्बल आठ लक्ष मृत्यू एकटय़ा तंबाखूमुळे होतात.
गेल्या वर्षी ‘ग्लोबल बर्डन ऑफ डिसीज’ हा अभ्यास प्रसिद्ध झाला. जगातील मृत्यूच्या प्रमुख कारणांचा शोध या अभ्यासातून घेण्यात आला. त्याच्या निष्कर्षानुसार भारतातील मृत्यूंच्या चार सर्वात प्रमुख कारणांपैकी एक तंबाखू आहे!
भारतात तंबाखूमुळे दरवर्षी किमान आठ लक्ष मृत्यू आणि एक हजार अब्ज रुपये एवढं नुकसान होत असावं.
‘नॅशनल अॅडल्ट टोबॅको’ सव्र्हे. त्यांच्या अभ्यासानुसार भारतातले 35 टक्के प्रौढ एकतर तंबाखू खातात किंवा धूम्रपान करतात.
आमच्या गडचिरोलीच्या सव्र्हेत हेच प्रमाण आम्हाला तब्बल साठ टक्के इतकं आढळलं. आदिवासी, गरीब, मागास समाजात हे प्रमाण अधिक आहे. सहा वर्षापूर्वीच्या आमच्या सर्वेक्षणानुसार गडचिरोलीचे लोक तंबाखूवर दरवर्षी 73 कोटी रुपये खर्च करत होते! या जिल्ह्याचं त्यावेळचं आरोग्यावरचं वार्षिक बजेट दहा कोटी रुपये, कुपोषणाचं बजेट 14 कोटी रुपये आणि मनरेगावरचं बजेट 22 कोटी रुपये!
गडचिरोलीच्या नागरिकांचा तंबाखूवरचा आताचा खर्च आहे दरवर्षी दोनशे कोटी रुपये!
याचाच अर्थ तंबाखू केवळ रोग आणि मृत्यूलाच कारण होत नाही, तर तंबाखू हे गरिबीचं एक महत्त्वाचं कारण आहे. विकासाच्या मार्गातला तो एक महत्त्वाचा अडथळा आहे.
तंबाखू जीवघेणी आहे हे माहीत असूनही तिचा प्रसार होतो तरी कसा?
त्याचं कारण प्रतिमा. सर्वसामान्यांना ज्याची भुरळ पडू शकेल अशा प्रतिमा आपल्या मनात निर्माण केल्या, ठसवल्या की पुढचं गणित मग एकदमच सोपं होतं.
चित्रपटांचं आणि आपल्या राजकीय नेत्यांचंच उदाहरण.
अगदी अलीकडच्या काळार्पयत चित्रपटांचे नायक, खलनायक यांचा चित्रपटांत अखंड धूम्रयज्ञ सुरू असायचा. मला आठवतंय, माङया लहानपणात, तरुणपणात जे नायक मला पडद्यावर दिसायचे; राज कपूर, देव आनंद, अशोक कुमार. या सा:यांच्या हातात सतत सिगारेट असायची.
विन्स्टन चर्चिल आणि महाराष्ट्राचे माजी दिवंगत मुख्यमंत्री वसंतराव नाईकांसारखे राजकीय नेते. सिगार, पाइपसह माध्यमांमध्ये झळकलेले त्यांचे फोटो कित्येकांनी कित्येक वेळा पाहिले असतील.
समाजात ज्यांना काहीएक स्थान आहे, ज्यांच्याविषयी लोकांना आकर्षण, आदर आहे अशा लोकांची उदाहरणं आपल्यासमोर असली तर त्याचा परिणाम होतोच.
मग पुढचा प्रश्न निर्माण होतो, तंबाखूमुळे जर इतकं प्रचंड नुकसान होतं, तंबाखू जर इतकी घातक आहे, तर मग तंबाखूचा वापर थांबवणं इतकं अवघड का आहे?
- कारण तंबाखूच्या व्यवसायात गुंतलेले व्यापक हितसंबंध! तंबाखूची शेती करणा:यांच्या गटापासून ते गुटखा, खर्रा, नस, विडी, सिगारेटचे उत्पादक आणि तेंदूपत्त्याच्या व्यापा:यांर्पयत पसरलेली तगडी आर्थिक, राजकीय लॉबी आपल्या हितसंबंधांना बाधा येऊ लागली की पूर्ण शक्तीनिशी विरोध करते! शिवाय तंबाखू व्यवसायाचे हात वर्पयत पोहोचलेले आहेत. तंबाखू खावी की नाही, तंबाखूपासून धोका आहे की नाही याचा निर्णय स्वत:च घेण्याइतकी ही लॉबी पॉवरफूल आहे! संसदीय समितीच्या रूपात आपण नुकताच तो प्रभाव प्रत्यक्ष पाहिला.
चाळीस वर्षापूर्वीचं उदाहरण. अमेरिकेतलं. तेव्हा अमेरिकेत स्त्रियांच्या धूम्रपानाचं प्रमाण अत्यंत कमी होतं.
माध्यमांच्या कव्हरपेजवर एक मोठ्ठा फोटो प्रसिद्ध झाला. न्यू यॉर्कच्या जगप्रसिद्ध मेडिसन स्क्वेअरवरचा. या फोटोत चार स्त्रिया होत्या. जवळजवळ निर्वस्त्र आणि या चारही स्त्रियांच्या हातात सिगारेट होती!
या जाहिरातीचं टायटल होतं, ‘दिज विमेन आर लिबरेटेड!’ - या महिला मुक्त आहेत!
म्हणजे स्त्रीमुक्तीची कल्पना काय, जी सिगारेट ओढते, विवस्त्र फिरू शकते, ती स्वतंत्र विचारांची, आधुनिक स्त्री!
तंबाखू लॉबीनं अशा प्रकारच्या प्रतिमा जगभर निर्माण केल्या आणि लोकांमधलं सिगारेटच्या वापराचं  प्रमाण वाढवलं.
स्त्रियांच्या धूम्रपानाचं आणि स्त्रियांच्या फुफ्फुसाच्या कॅन्सरचं अमेरिकेत तेव्हापासून वाढलेलं प्रमाण अजूनही आटोक्यात आलेलं नाही.
काय ‘कूल’ आहे, काय ‘इन’ आहे, कुणी कसं वागावं याच्या  ‘जगन्मान्य’ प्रतिमा ही लॉबी तयार करते.
सिगारेटच्या जगातल्या सर्वाधिक खपाचा ‘मार्लबोरो’ हा ब्रॅँड. त्यांनी खूप शोधून एक रांगडा, घोडय़ावर बसलेला, हॅट घातलेला, काऊबॉयसारखा तगडा माणूस शोधून काढला. ‘जो खरा मर्द आहे, तो मार्लबरो ओढतो’ अशी जाहिरात, प्रतिमा तयार केली. 3क्-4क् र्वष जगातल्या सगळ्या भागात त्याचा फोटो कोटय़वधी वेळा छापला गेला. दुर्दैवानं तो माणूस सिगारेटमुळे, कर्करोगानंच मेला!
अशावेळी साहजिकच विचार करावा लागतो, अशा घातक प्रतिमांची निर्मिती कशी होते? त्याचा परिणाम कसा होतो?.
तरुण वयात जवळजवळ प्रत्येकालाच वाटत असतं, आपण भारी, आकर्षक दिसावं,  मर्द, तगडा, डॅशिंग म्हणून आपल्याला इतरांनी ओळखावं, स्त्रियांना आपलं आकर्षण वाटावं. सिंहाला जशी आयाळ असते तसं धूम्रवलय म्हणजे जणू काही तेजोवलय आपल्याभोवती लहरत असावं..
जाणीवपूर्वक तयार केलेल्या अशा प्रतिमांचा विशेषत: किशोरांवर, तरुणांवर मोठा परिणाम होतो. नंतर हळूहळू समाजजीवनाचा तो एक अविभाज्य भाग बनून जातो.
आमच्या गडचिरोलीत मी ब:याचदा पाहतो, कोणी भेटल्यावर आपण जसं ‘रामराम’, ‘नमस्कार’ करतो, तसं इथे ब:याचदा आता गुटखा, खर्राच्या पुडय़ा पुढे केल्या जातात! म्हणजे तुम्हाला कोणाची ओळख करून घ्यायची असेल, मैत्री करायची असेल तर गुटखा, तंबाखूच्या माध्यमातून जवळीक निर्माण करा!
तंबाखूमधलं निकोटीन हे लवकर व्यसन निर्माण करणारं अत्यंत घातक असं रसायन आहे. हेरॉइनपेक्षाही घातक आहे. सलग तीन दिवस जर निकोटीन घेतलं तर चौथ्या दिवशी आपलं शरीर आणि मनच ते मागायला लागतं. म्हणजे चौथ्या दिवशी व्यसनाला सुरुवात होऊन जाते!
संस्कृती आणि समाजजीवनाचा तो भाग बनला की आपोआपच हे व्यसन सर्वव्यापी होतं.
शास्त्र, विज्ञान सांगतं, हे व्यसन सोडणं अतिशय अवघड आहे.
गडचिरोलीत सहा हजार स्त्रियांचा आम्ही अभ्यास केला. अथक प्रयत्न केल्यानंतर त्यातल्या दहा टक्के स्त्रियांचं व्यसन सुटलं, तर नव्वद टक्के स्त्रियांचं व्यसन कायम राहिलं. व्यसनमुक्ती हा अतिशय कठीण आणि दूरचा उपाय आहे. या व्यसनाची लागलेली लत सुटता सुटत नाही.
प्रसिद्ध विनोदी लेखक मार्क ट्वेनचा एक मार्मिक विनोद. तो म्हणाला, ‘सिगारेट सोडणं खूप सोपं आहे. कारण यापूर्वी कित्येकदा मी ती सोडली आहे!’
- व्यक्तिगत स्तरावर या व्यसनापासून दूर राहणं अगर त्याच्या तावडीतून सुटणं हे दोन्हीही टोकाच्या आत्मसंयमनाची आणि दृढ निश्चयाची मागणी करणारं आहे. या व्यसनाच्या उच्चाटनासाठी, निदान त्याला आळा घालण्यासाठी सार्वजनिक धोरणात्मक निर्णयाची आणि कार्यवाहीची गरज आहे, ती म्हणूनच!
सिगरेटच्या (अन्यही तंबाखू उत्पादनांच्या) पाकिटावरल्या दर्शनी जागेचा किती टक्के भाग तंबाखू सेवनाचे दुष्परिणाम सांगणा:या इशा:यांसाठी वापरला जावा, हा विषय सध्या चर्चेत आहे. याबरोबरच (किंवा त्याहीआधी) करता येतील असे अनेक महत्त्वाचे उपाय सुचवता येतील. (सोबतची स्वतंत्र चौकट पाहा)
तंबाखू खाणं, ओढणं, त्यासंदर्भाची दृष्य चित्रपटांतून दाखवणं हे आमचं व्यक्तिस्वातंत्र्य आहे आणि त्यावर बंधनं आणणं हा आमच्या स्वातंत्र्यावरचा घाला आहे असा मुद्दा काही जण मांडतात, पण हा युक्तिवाद भ्रामक आहे.
- मुळात तंबाखू, धूम्रपानाची इच्छा होणं, तुम्ही त्याचे गुलाम होणं हेच स्वातंत्र्य गमावणं आहे.. आणि या गुलामीतून मुक्त होणं हे खरं स्वातंत्र्य. तंबाखू खाण्यात स्वातंत्र्य नाही, न खाण्यात आहे..

काय करता येईल?

सुरुवातीचाच ‘अंत’

तंबाखूचं व्यसन ज्यांना अद्याप लागलेलं नाही, त्यांना त्यापासून दूर ठेवायला हवं आणि ज्यांची नुकतीच सुरुवात आहे त्यांचं व्यसन सोडवण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न केले जावेत. देशातल्या तंबाखूविरोधी प्रचारमोहिमेचा तोच मुख्य लक्ष्यगट असला पाहिजे.

‘प्रतिमा’बदल

तंबाखूच्या संदर्भातली सर्वसामान्यांच्या मनातली प्रतिमा, संस्कृती बदलवणं ही अतिशय महत्त्वाची प्राथमिकता असली पाहिजे. वेगवेगळी माध्यमं, जाहिराती याचा प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष परिणाम समाजमनावर होत असतो. अशा सरोगेट अॅडव्हर्टायङिांगवर बारकाईनं लक्ष हवं आणि त्याबद्दल हरकतही घेतली जायला हवी.

किंमतवाढ, विडीवर कर

तंबाखूजन्य पदार्थाच्या किमतीत वाढ करणं हा सरकारी पातळीवरचा प्रभावी उपाय आहे. गेल्या वीस वर्षात सिगारेटच्या किमतीत ब:यापैकी वाढ झाली आहे; मात्र सिगारेटवर कर लादताना ‘विडी ओढणा:या गरिबावर कर नको’ हा तर्क विकृत आहे. शेतकरी आणि गरिबांना विडीच्या विळख्यातून वाचवण्यासाठी आधी विडीवर कर लावणं आणि किंमत वाढवणं आवश्यक आहे. कर, किमती वाढल्या की त्या वस्तूचा वापर कमी होतो याचे यथार्थ पुरावे उपलब्ध आहेत.

सेल पॉइंट कमी करणं

गडचिरोलीत दर 125 लोकांमागे तंबाखूविक्रीचं एक दुकान, ठिकाण आहे. म्हणजेच दर हजार लोकांमागे किमान आठ ठिकाणी तंबाखूचे सेल पॉइंट्स आहेत. म्हणजे पिण्याच्या पाण्यासाठी विहिरी नाहीत, धान्याची दुकानं नाहीत, पण तंबाखूविक्रीची ठिकाणं मात्र आहेत. तंबाखूची उपलब्धी जितक्या सहज, ती तुमच्या जितक्या जवळ, तितक्या पटकन तंबाखू विकली जाते आणि वापरली जाते.

प्रतिष्ठा ते लाज

आजच्या कायद्यानुसार सार्वजनिक ठिकाणी धूम्रपानावर बंदी आहे. परदेशात काही ठिकाणी घरात सिगारेट पिण्यावरही बंदी आहे. कुणाला सिगारेट ओढायचीच असेल, तर वेगळ्या, बंद खोलीत ओढा, असा आग्रह अनेक देशांमध्ये वाढतो आहे. एखादी गोष्ट अशी
चोरून-लपून करावी लागत असेल तर त्याची सामाजिक स्वीकृती कमी होत जाते.

धोक्याचे इशारे

आजकाल सगळ्याच देशांत तंबाखूविरोधी धोक्याचे इशारे त्या-त्या उत्पादनावर छापले जातात. या इशा:यांचा आकार वाढवण्याला तंबाखू लॉबीनं कायम विरोध केला आहे. कारण त्यामुळे आपल्या खपावर परिणाम होतो हे त्यांना माहीत आहे. तंबाखूच्या व्यसनात खोलवर अडकलेल्यांवर अशा इशा:यांचा फारसा परिणाम होणार नाही; पण जे तंबाखू खात नाहीत त्यांच्यावर या इशा:यांचा चांगला परिणाम होतो हे सिद्ध झालेलं आहे.

उत्पादक, विक्रेत्यांवर खटले

तंबाखूमुळे मृत्यू झालेल्यांचे कुटुंबीय किंवा त्यांच्या वतीनं सामाजिक संघटनांनी तंबाखू उत्पादक, विक्रेत्यांवर खटले भरायला हवेत. अमेरिकेत असे खटले मोठय़ा प्रमाणात दाखल केले जातात आणि बाधितांना अगदी अब्ज-अब्ज रुपयांर्पयत नुकसानभरपाईही कोर्टानं मिळवून दिली आहे. त्यामुळे अनेक तंबाखू उत्पादक कंपन्यांनी परदेशांतून गाशा गुंडाळायला सुरुवात केली आहे आणि भारत व चीनला आपलं टार्गेट केलं आहे.

उपचार, समुपदेशन

तंबाखूची सवय लागल्यावर ती सोडवणं अशक्य नाही, पण ते कठीण जरूर आहे. त्याला वेळ फार लागतो आणि त्यावरचे उपचारही अत्यंत महागडे आहेत. पण तरीही असे उपचार सहजपणो उपलब्ध असावेत, व्यसनाधीनांचं वारंवार समुपदेशन व्हायला हवं.

बंदीचं मोजमाप

जी आणि ज्या मार्गाने बंदी लादली जाईल, त्याच्या प्रत्यक्ष अंमलबजावणीचं निरंतर मोजमाप व्हायला हवं. नुसती कागदावरची बंदी काहीच उपयोगी नाही.

आनंदी जीवनशैली

अनेकजण निरस जीवनात आनंद शोधण्यासाठी, न पेलवणारा ताण सैल करण्यासाठी तंबाखूसारख्या गोष्टींकडे वळतात आणि त्याचे गुलाम होतात. खरं तर आपल्या जीवनशैलीतच आनंद, निवांतपणा, विरंगुळा असावा, ताण असल्यास त्याचा निचरा व्हावा म्हणजे अशा गोष्टींकडे वळण्याची अपरिहार्यता निदान कमी होईल.

एकाच वेळी एकत्रित प्रयत्न

तंबाखूमुक्तीसाठी एकाच वेळी अनेक उपायांचा अवलंब झाला पाहिजे. शासकीय नीती, समाज-संस्कृतीची जबाबदारी, स्वत:चं आचरण आणि व्यसनमुक्तीसाठीचे उपचार व समुपदेशन. तंबाखूसंदर्भातील समाजसंस्कृती बदलण्याचा प्रयत्न केला तर चांगला परिणाम दिसून येऊ शकेल.

(लेखक सर्च या विख्यात संस्थेचे संस्थापक, संशोधक आणि आरोग्याच्या क्षेत्रात जागतिक स्तरावर गौरवलेले तज्ज्ञ आहेत. )

शब्दांकन : समीर मराठे

 

Web Title: Tobacco

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.