... म्हणून लिव्ह इन रिलेशन फेल होतंय; नातेसंबंधात अनेक कंगोरे

By ऑनलाइन लोकमत | Published: September 10, 2023 07:57 AM2023-09-10T07:57:07+5:302023-09-10T07:58:37+5:30

या नातेसंबंधात अनेकदा नाजूक कंगोरे असतात. त्यामुळेच ‘लिव्ह इन’ प्रत्येकवेळी यशस्वी होतातच असे नाही.

... So the live in relationship is failing; Many kangaroos in a relationship | ... म्हणून लिव्ह इन रिलेशन फेल होतंय; नातेसंबंधात अनेक कंगोरे

... म्हणून लिव्ह इन रिलेशन फेल होतंय; नातेसंबंधात अनेक कंगोरे

googlenewsNext

लग्नापेक्षा ‘लिव्ह इन...’ बरे असे अनेकांना वाटते. मात्र, या वाटेवरही अनेक काटे आहेत याची जाणीव किती जणांना असते, हा संशोधनाचा विषय. ‘लिव्ह इन’च्या नात्याचा डोलारा विश्वासाच्या पायावर उभा असतो. हा पायाच डळमळीत झाला तर नाते क्षणभंगुर ठरते. या नातेसंबंधात अनेकदा नाजूक कंगोरे असतात. त्यामुळेच ‘लिव्ह इन’ प्रत्येकवेळी यशस्वी होतातच असे नाही.

डॉ. शुभांगी पारकर, मानसोपचार तज्ज्ञ

आजच्या आधुनिक जीवनशैलीमध्ये लग्नापेक्षा लिव्ह इन रिलेशनशिप निवडणाऱ्या जोडप्यांची संख्या हळूहळू वाढत आहे. शहरी लोकांमध्ये डेटिंगच्या तुलनेत, लिव्ह-इन रिलेशनशिप तशी अपारंपरिक मानली जाते. जोडप्यांना मोकळेपणाने जगायचे आहे आणि त्यांना खांद्यावर जबाबदारीचे कोणतेही ओझे नको आहे. या प्रकारच्या व्यवस्थेमध्ये, दोन व्यक्ती अविवाहित मार्गाने, दीर्घकाळ, विवाहसदृश्य पद्धतीने; परंतु विवाहाच्या कोणत्याही कायदेशीर बंधनाशिवाय एकत्र राहण्याचा निर्णय घेतात. या प्रकारच्या नात्याद्वारे जोडपे लग्नाच्या जबाबदाऱ्या टाळतात.

हळूहळू जोडीदाराच्या अपेक्षा बदलू शकतात. कारण ते ‘आपल्या दोघांना काय हवे आहे’ ऐवजी ‘मला काय हवे आहे’, याला महत्त्व देतात. वैवाहिक नात्यांसारखेच या नात्याबाबत तुमच्या जोडीदाराच्या बाबतीत तुमचे वेगवेगळे प्राधान्यक्रम आणि अपेक्षा आहेत. दाम्पत्यासाठी एक रोमॅण्टिक नातेसंबंध म्हणा किंवा वचनबद्ध नाते, जीवनाचा एक पैलू आहे. तरीही जीवनाचे इतर असे अनेक पैलू आहेत जे प्रत्येकाच्या दृष्टिकोनातून उच्च प्राधान्य देण्यालायक असू शकतात. हे स्वयंकेंद्रित पैलू जेव्हा डोकं वर काढतात तेव्हा कायदा किंवा सामाजिक बांधिलकी नसलेले नातं सहज विभक्त होऊ शकते.

पुरुषप्रधान संस्कृतीमुळे 
काय होते
शिक्षण, आर्थिक सुरक्षितता, स्वतंत्र निर्णयक्षमता आणि समतावादी मानसिकता पारंपरिक विवाहापेक्षा लिव्ह इन संबंध निवडण्यात महिलांना प्रेरणादायी वाटते; पण पुढे या गोष्टी पुरुषप्रधान संस्कृतीत तग धरीत नाहीत. 
अनेकवेळा सांस्कृतिक विवाद उद्भवतात. लिव्ह इन नात्यांत ‘मुक्ततेचा विचार’ एका साथीदाराच्या डोक्यात पक्का बसलेला असतो, ते दुसऱ्याला जमत किंवा परवडत नाही. 
दारू, सिगारेटची सवय स्त्रियांना पटेलच, असे नाही. आंतरधर्मीय जोड्यांमध्ये धार्मिक रीतिरिवाजांमुळे द्वंद्व होते.

आर्थिक वाद, ब्रेकअपचे कारण
आर्थिक वाद हे अनेकवेळा लिव्ह इन नात्यात वादाचे मुख्य कारण ठरू शकते. यामध्ये पैशांची देवाणघेवाण किंवा वाटणी बरोबर नसतात. एका पार्टनरची सतत पिळवणूक होत असते, फसवाफसवीची प्रकरणे असतात. म्हणून पैशांबद्दल किंवा कोणत्याही समस्येबद्दलच्या संघर्षादरम्यान एकाने दुसऱ्याशी कसे वागावे, हे ओळखणे महत्त्वाचे आहे. 

...मग नाती वैवाहिक 
असो की, लिव्ह इन
तुमचा जोडीदार तुमचा आदर करतो का? तुमचा जोडीदार तुमचा 
अपमान करतो आणि तुमच्याशी अत्यंत तुच्छतेने वागतो का? एकमेकांबद्दल आदर नसल्याची ही लक्षणे आहेत. अशी नाती वैवाहिक असो व लिव्ह इन असो ती कोलमडतातच. इतर लिव्ह-इन जोडीदाराकडून बेपर्वाही, विवाहबाह्य संबंध किंवा अनैतिकतेचा आरोप लावण्यास वाव नाही. 

लिव्ह-इन पार्टनरची 
निर्घृण हत्या आणि...
अलीकडे ऐकलेल्या भीषण घटनांमध्ये, प्रियकरांनी आपल्या लिव्ह-इन पार्टनरची निर्घृण हत्या करून या नात्यांमधील हिंसा आणि क्रूरपणाचे परिणाम दाखवून दिले होते. मुळात लिव्ह इनमध्ये प्रत्येकाचे स्वातंत्र्य, निष्ठा आणि जबाबदारी याची व्यवस्थित गुंफण जमली नाही तर नातं टिकणार नाही.

Web Title: ... So the live in relationship is failing; Many kangaroos in a relationship

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.