शिदू

By admin | Published: November 15, 2015 06:51 PM2015-11-15T18:51:49+5:302015-11-15T18:51:49+5:30

एकीकडे जगाशी स्पर्धा करायची होती, तर दुसरीकडे लोकसंख्येला चाप लावायचा होता. त्यासाठी चीनने आणलं ‘वन चाइल्ड’ धोरण!

Shigu | शिदू

शिदू

Next
>ओंकार करंबेळकर
 
एकीकडे जगाशी स्पर्धा करायची होती, तर दुसरीकडे लोकसंख्येला चाप लावायचा होता. त्यासाठी चीनने आणलं ‘वन चाइल्ड’ धोरण! यामुळे 40 कोटी जन्म रोखण्यात आले, पण त्याचे आत्यंतिक प्रतिकूल परिणामही झाले. मुलाच्या हव्यासापोटी गर्भातल्या मुली नष्ट झाल्या, ‘हरवलेल्या’ मुली कागदावरूनही गायब झाल्या, ‘म्हाता:यांच्या’ देशाकडे वाटचाल झाली आणि एकच मूल तेही ‘अपघाता’नं गमावलेल्या पालकांची तर नवी जमातच निर्माण झाली! लोकांमध्ये असंतोषाचा भडका पसरला.
-------------------------------
एकुलता एक मुलगा. ऐन तारुण्यातला, पण अचानक एखाद्या अपघातात त्याचा मृत्यू.
कुठेतरी भूकंप होतो. आणि अनेक तरुणांचा बळी जातो.
हाताशी आलेल्या पंचविशीतील मुलाचे अचानक निधन.
ध्यानीमनी नसताना अशा बातम्या जेव्हा अचानक कानावर येतात, तेव्हा या मुलांच्या पालकांचं दु:ख शब्दांत कसं सांगता येणार आणि त्यांचं सांत्वन तरी कसं करणार?
एका जोडप्याला केवळ एकच मूल किंवा चीनने जगभर प्रसिद्ध केलेली ‘वन चाईल्ड पॉलिसी’ हे या दु:खाचे प्रमुख कारण! 
पन्नाशीत पोहोचलेल्या या दुर्दैवी पालकांना आयुष्याच्या या टप्प्यावर नवे मूल जन्मास घालता येत नाही की मूल दत्तक घेण्याची क्षमता त्यांच्यात उरलेली नसते. 
आपले एकमेव मूल मृत्यू पावल्यावर शोक करणो आणि सरकारच्या धोरणाचा निषेध करणो या पलीकडे त्यांच्या हातात काहीही नसते. असे लक्षावधी पालक आजवर शोक व्यक्त करण्यापलीकडे दुसरं काहीही करू शकले नाहीत. 
या पालकांची संख्या चीनमध्ये इतकी आहे की त्यांना शिदू नावाची एक संज्ञाच देण्यात आली आहे. चीनच्या शहरांमध्ये अशा दु:खात बुडालेल्या शिदूंची उदाहरणो पाहायला मिळतात. 197क् च्या दशकाचा उत्तरार्ध. इतर जगाप्रमाणो विशेषत: पश्चिमेकडील औद्योगिकीकरण झालेल्या देशांशी स्पर्धा करण्यासाठी जागतिक स्पर्धेत इतर देशांप्रमाणो चीनही उतरला होता. वेगाने वाढणारी लोकसंख्या आणि तिचा साधनसंपत्तीवर येणारा ताण लक्षात घेता त्यासाठी काहीतरी करणो गरजेचे होते. माओच्या निधनानंतर पुढे वाटचाल करण्याचे आव्हान, लोकसंख्येच्या ताणामुळे एक दिवस देशातील सर्व साधने आणि पर्यावरण नष्ट होईल अशी भीती यामुळे लवकरात लवकर लोकसंख्या आटोक्यात आणण्याची गरज चीनला वाटू लागली. असे काहीतरी करावे म्हणजे, लोकसंख्यावाढीला कमी काळात मोठी खीळ बसेल यासाठी मंथन सुरू झाले. त्यातूनच ‘वन चाइल्ड’ धोरणाचा अवलंब करण्यात आला आणि अखेर 1979 मध्ये हे धोरण लागू करण्यात आले. यावेळेस डेंग ङिाओपिंग यांचा नेतृत्वाचा कालावधी सुरू झाला होता. माओच्या सांस्कृतिक क्रांतीपेक्षाही ‘वन चाइल्ड’ पॉलिसीचे परिणाम दूरगामी झाल्याचे मत तज्ज्ञ व्यक्त करतात. याच धोरणामुळे लोकसंख्येचा ढाचा कोसळला. वय आणि लिंग गुणोत्तर यांच्यात पराकोटीचा बदल झाला. यासाठी या धोरणाला ते दोषी ठरवितात. 
1979 नंतर ‘वन चाइल्ड’ अधिक कठोरपणो राबविण्यासाठी तितक्याच कठोर उपाययोजना करण्यात आल्या. सामूहिक नसबंदी योजना, गर्भपात अशा मोहिमाच काढण्यात आल्या. 
मात्र चीन हा त्यावेळेस भारताप्रमाणोच ग्रामीण लोकसंख्येचा देश असल्याने या ताठर धोरणाबद्दल तीव्र नापसंती व्यक्त होऊ लागली. त्यामुळे ग्रामीण भागामध्ये हे धोरण शिथिल करण्यात आले, तर प्रांतांनुसार हे धोरण कितपत शिथिल करायचे याचे स्वातंत्र्य देण्यात आले. विरोधाचे सूर उमटत असले तरी एखाद्या जबरदस्त कठोर भूमिकेशिवाय लोकसंख्या आटोक्यात येणार नाही असे मत बाळगणारे विचारवंतही होतेच. मात्र गेल्या साडेतीन दशकांमध्ये लोकसंख्यावाढ ताब्यात ठेवण्याच्या गणितात आणि आकडेवारीत थोडे यश मिळाले असले तरी या धोरणाने चीनच्या समाजात गंभीर प्रश्न तयार केले आहेत. त्याचे परिणाम याच ‘वन चाइल्ड’ धोरणात जन्मास आलेल्या मुलांना दुर्दैवाने भोगावे लागणार आहेत. 
वन चाइल्ड धोरणामुळे चीनने 4क् कोटी जन्म रोखण्यात यश आले असा दावा केला जातो. या धोरणामुळे जन्मदर तर कमी झाला, पण लोकांमध्ये मोठय़ा प्रमाणात असंतोषही पसरला. केवळ जन्मदर कमी केल्याने लोक समाधानी होऊ शकत नाहीत हे समीकरण चीनी नियोजनकारांच्या लक्षात आले नाही. 197क् साली प्रतिमहिलेमागे 2.8 म्हणजेच तीन 
 
मुलांच्या जवळ जाणारा जन्मदर 2क्1क् मध्ये 1.5 इतका कमी करण्याचे ध्येय साध्य करण्यात चीनला यश आले. पण लोक कमी संख्येने जन्मास आले म्हणजे समस्या थांबायच्या राहत नाही. जन्मदराबरोबर मृत्युदरही तितक्याच किंवा त्याच्या कित्येकपट वेगाने याच काळात खाली येत होता. 1949 साली प्रती हजार व्यक्तींमागे चीनमध्ये 227 मृत्यू होत असत. केवळ तीन दशकांमध्ये म्हणजे 1981 मध्ये तो प्रतिहजार व्यक्तींमागे 53 इतका घसरला. नवी औषधे, पाश्चिमात्य संशोधन, उत्तम आरोग्य सुविधा तसेच राहणीमानाचा कमालीचा वाढलेला दर्जा यामुळे मृत्युदरात लक्षणीय घट झाली. इथेच ‘वन चाइल्ड’ धोरणाला खरे आव्हान तयार झाले. 
जन्मावर आलेले बंधन आणि कमी झालेला मृत्युदर यामुळे एका अधांतरी समाजाची निर्मिती चीनमध्ये होऊ लागली. काम करणा:या हातांची संख्या रोडावली आणि त्यांच्यावर काम करू न शकणा:या समाजाचा मोठा भार पडू लागला. साधारणत: वयाच्या 6क् किंवा 64 वर्षार्पयत मनुष्य काम करू शकतो असे मानले जाते. चीनमध्ये याच साठपेक्षा जास्त वयोगटातील लोकांची संख्या झपाटय़ाने वाढत आहे. संयुक्त राष्ट्राच्या आकडेवारीने या वयोगटाची लोकसंख्या 2क्4क् र्पयत 28 टक्के इतकी होईल, तर 2क्5क् साली एक तृतीयांशपेक्षाही जास्त लोकसंख्या या गटात जाईल आणि त्यांची काळजी घेण्यासही कोणी नसेल असे चिंताजनक भविष्य वर्तविले आहे. सध्या काम करणा:या लोकांमधील 6.7 कोटी लोकांचे हात 2क्3क् र्पयत थांबलेले असतील. त्यामुळे काम करणा:या आणि मध्यभागी अडकलेल्या पिढीचा आकार दिवसेंदिवस आकसत चालल्याची काळजीही आहेच. कमी खर्चात उपलब्ध होणारे मनुष्यबळ आणि अत्यल्प उत्पादन खर्चासाठी जगभरात प्रसिद्ध असण्याचे स्थान चीन गमावत चालला आहे. जे उद्योग देशात व बाहेर उभे केले आहेत ते करण्यासाठी, ते सुरू ठेवण्यासाठी तितक्याच मनुष्यबळाची गरज असते. मजूर, कष्टक:यांची संख्या कमी आणि त्यांच्यावर अवलंबून असणारी जनता मोठी यामुळे हा देश वृद्धांचा देश म्हणून किताब मिळविण्याच्या दिशेने वाटचाल करू लागला आहे.
या ‘वन चाइल्ड’ पॉलिसीची छाया चीनच्या समाजावर अत्यंत विचित्र पद्धतीने पाहायला मिळते. वंशाचा दिवा लावायला मुलगाच पाहिजे हा समज बांबूच्या पडद्याआडही आहे आणि चिनी लोकांनी तो हट्टाने पाळलाही आहे. अशा मानसिकतेत एकच मूल कुटुंबात हवे तर मग तो मुलगाच पाहिजे असा विचार लोकांच्या मनात न येता तरच नवल. 
मग सुरू झाली मुलगाच जन्मास घालण्याची पद्धती. गर्भात मुलगी असल्याचे दिसताच तो तत्काळ नष्ट करणो किंवा मुलगी जन्मास आली तर तिला लगेच संपवून टाकण्याचे मागर्ही अवलंबले. कित्येकांनी मुलींना जन्म दिल्यावर त्यांचे काय झाले याची माहिती आजही उपलब्ध नाही. हजारो हरविलेल्या मुलींचा शोध कागदांवरदेखील आला नाही. मुलगाच हवा असण्याची ही हाव येताना नवे संकट घेऊनच येत होती. त्यामुळेच सध्या चीनमध्ये 1क्क् स्त्रियांमागे 1क्6 पुरुष आहेत, तर नुकत्याच जन्मलेल्या बाळांमध्ये 1क्क् मुलींमागे 12क् मुलगे जन्मास येण्याची काळजी करायला लावणारी स्थिती निर्माण झाली आहे. लाडाकोडात वाढलेल्या या राजकुमारांना माळ घालायला भविष्यात कोणतीही मुलगी मिळणार नाही अशी भीती निर्माण झाली आहे. 
हे दुष्परिणाम असले तरी काही बाबतींमध्ये नागरिकांना सूट देण्यात आली होती. काही प्रांतांनी याचे नियम शिथिल केले आहेत. कुटुंबात एकटेच मूल असणा:या पती-पत्नीस दुसरे मूल जन्मास घालण्याची सूट देण्यात आली, तर काही ठिकाणी जर पहिले मूल शारीरिक किंवा मानसिकदृष्टय़ा अपंग असेल तर त्यांनाही दुस:या मुलासाठी संधी देण्यात येते. पहिल्या विवाहामध्ये मूल नसणा:या व्यक्तींनी केलेल्या पुनर्विवाहात आणि वांशिकदृष्टय़ा अल्पसंख्य असणा:या गटाच्या नागरिकांना दोन मुले जन्मास घालण्याची परवानगी काही प्रांतांनी दिलेली आहे.
गेल्या पन्नास वर्षामध्ये चीनच्या अर्थव्यवस्थेने वेगाने पावले टाकली आहेत. हिंदी महासागर, प्रशांत महासागरातील लहान-मोठे देश यांच्याशी चांगले संबंध ठेवून तेथे गुंतवणूक, रस्ते, रेल्वे आणि बंदर बांधण्यास मदत करत आहे. 
पाकिस्तानला ग्वादर बंदर बांधून देणो, श्रीलंका, मालदिवमध्ये राजनैतिक, आर्थिक संबंध वाढविणो अशा हालचाली चीन सतत करतच असतो. आफ्रिकेत तर चीनने एक हक्काची बाजारपेठच तयार केली आहे. तेथील नैसर्गिक साधनसंपत्तीचे उत्खनन, तेथे ऊर्जा प्रकल्प बांधणो वगैरे गुंतवणुकीतून भारतासह पाश्चिमात्य देशांना स्पर्धा निर्माण केली आहे. चीनच्या शब्दाला त्यामुळेच जगभरात वजन मिळू लागले आहे. संयुक्त राष्ट्राच्या आमसभेच्या वेळेस चीनचे राष्ट्राध्यक्ष क्षी जिनपिंग यांनी अमेरिकेचा केलेला आठवडय़ाभराचा दौरा, तर त्यानंतर इंग्लंडमध्ये त्यांना मिळालेली राजेशाही वागणूक हे सर्व त्याचेच द्योतक आहे. पण हे सर्व असताना घरामध्ये काम करण्यासाठी माणसेच उपलब्ध नसणो चीनला परवडणारे नाही. चीनने केलेल्या भरभराटीमागे वन चाइल्ड पॉलिसी असल्याचे काही विचारवंत मांडणी करतात, मात्र ते तितकेसे खरे नाही. जी प्रगती गेल्या तीन दशकांमध्ये चीनने केली आहे ती हे धोरण लागू होण्याच्या आधी जन्मलेल्या लोकांच्या जोरावर. 
196क् आणि 7क् च्या दशकात जन्मलेल्या मनुष्यबळाचा यामध्ये वाटा सर्वाधिक आहे. चिनी बाजारपेठेला स्थिर ठेवण्यासाठी ‘वन चाइल्ड’ धोरण़ावर नव्याने विचार करायलाच हवा असे मत मांडले जाऊ लागले आहे. याच वर्षी ऑक्टोबर महिन्यात या धोरणावर पुनर्विचार केला जाईल असे संकेत चिनी वृत्तसंस्था ङिान्हुआने दिले. मार्च 
2क्16 मध्ये होणा:या नॅशनल पीपल्स काँग्रेसमध्ये त्याचे भवितव्य ठरेल. त्यामुळे कदाचित आज 
त्रिकोणी कुटुंबातील बाळांना शिदू होण्याच्या दुर्दैवापासून वाचविता येईल. अर्थात सहा ते सात महिन्यांचे गर्भ पाडणो, दोन मुले असणा:या लोकांना आपली गावे, घरे सोडून पळून जावे लागणो, सरकारी नियमांचा जाच आणि तोंड उघडायची भीती असे या धोरणाने चिनी समाजावर काढलेले ओरखडे लगेच पुसले जाणार नाहीत.
 
श्रीमंत म्हातारी
जन्मदरामध्ये आणि अर्भकमृत्यूंमध्ये लक्षणीयरीत्या घट होते आणि काम करू शकणा:या मनुष्यबळाची वाढ होते अशा साधारणत: वीस ते तीस वर्षाच्या कालावधीस डेमोग्राफिक डिव्हिडंड म्हणतात. 15 ते 64 ही काम करू शकणारी जनता जास्त असल्यामुळे त्या देशाची आर्थिक प्रगतीदेखील तितक्याच वेगाने होऊ शकते. मात्र काम करणा:या लोकांवर अवलंबून असणा:या लोकांची संख्या वाढली की हे गणित बिघडते. अशावेळेस ही स्थिती त्या देशावर ओङो बनून राहते. जपानमध्ये ही स्थिती आल्यामुळे तो वृद्धांचा देश म्हणून ओळखला जाऊ लागला. चीनची तीच गत होऊ लागली आहे. 2क्3क् मध्ये चीन अधिक म्हातारा होऊन युरोपला मागे टाकेल. आजच चीनमध्ये एकाकी वृद्धांच्या समस्यांनी तोंड वर काढल्याचे दिसून येते. वृद्धाश्रम किंवा वृद्धांसाठी कम्युनिटी सेंटर्स अशा सुविधा निर्माण होत आहेत. शिक्षण, आरोग्यसेवा यामुळे आयुर्मान सरासरी 7क् र्पयत पोहोचले. पण ‘वन चाइल्ड’ धोरणामुळे त्यांच्या आयुष्यातील संध्याकाळ एकाकी किंवा निरस काढावी लागत आहे. वृद्ध लोकसंख्या आणि विकसित होत चाललेली अर्थव्यवस्था यामुळे सगळा देशच श्रीमंत म्हातारी होतो की काय, असे मत तज्ज्ञ व्यक्त करत आहेत.
 
‘ब्लॅक चाइल्ड’
हायहायझी याचा शब्दश: अर्थ ‘ब्लॅक चाइल्ड’ असा होतो. जी मुले वन चाइल्ड धोरणाला चुकवून जन्माला आली म्हणजेच नियम मोडून जन्मास आलेले दुसरे अपत्य ‘ब्लॅक चाइल्ड’ होय. या मुलांइतके अभागी कदाचित दुसरे कोणीच नसावे. त्यांच्या अस्तित्वाची दखल घेणारी कोणतीही नोंद चीन घेत नाही. त्यांचे कायदेशीर अस्तित्वच नाकारले जाते. सर्व सरकारी, सार्वजनिक सेवा, शिक्षण, आरोग्यसेवा आणि कायद्याचे संरक्षण त्यांना लाभत नाही. कोणताही दोष नसताना ही मुले नकोशीचा शिक्का स्वत:च्या कपाळावर मारूनच जगामध्ये येतात. त्यामुळे दुसरे मूल जन्माला घालण्यासाठी अनेक पळवाटाही शोधल्या जाऊ लागल्या. परदेशात जाऊन मुलांना जन्म घालण्याचा मार्ग काही श्रीमंत मातांनी जवळ केला, पण त्यांना चीनचे नागरिकत्व मिळत नाही. ब:याचशा मातांनी हाँगकाँगमध्ये मुलांना जन्म देण्याचा निर्णय घेतला. हाँगकाँगमध्ये काही प्रमाणात असणा:या स्वायत्ततेचा त्यांना लाभ घेता आला.
 
लिटल एम्परर सिंड्रोम
एकच मूल जन्मास घालण्याच्या नियमामुळे चिनी दांपत्ये मुलाला चांगलाच जीव लावतात. त्याला लागणा:या सर्व गोष्टी, सुखे त्याच्या पायाशी आणून घालण्यास धडपडतात. मात्र बहीण आणि भाऊ नसणा:या या पोरांना त्याची लहानपणापासून सवय लागते. आई-बाबांचे सर्व लक्ष आपल्यावर केंद्रित होतंय म्हटल्यावर एखाद्या युवराजाप्रमाणो ही पोरं वाढतात. त्याला ‘लिटल एम्परर’ असे म्हटले जाते. अतिरेकी लाड, नियमांचा अभाव आणि राजासारखी वागणूक यामुळे जी मानसिकता तयार होते त्यास लिटल एम्परर सिंड्रोम अशी संज्ञाच आहे. त्याला फोर-टू-वन सिंड्रोम असेही म्हणतात. दोन आजी-आजोबांच्या जोडय़ा म्हणजे चार लोक, आणि आई-बाबा यांचा सर्व विचारांचा केंद्रबिंदू तो मुलगा होतो आणि आत्ममग्न, कोणतीही वस्तू, सुविधा शेअर न करू शकणा:या मानसिकतेचा होतो. याबरोबरच सँडविच जनरेशन नावाची संज्ञाही चीनमध्ये झपाटय़ाने लागू होते आहे. आपल्या मुलांची आणि वृद्ध माता-पित्यांची एकाच वेळेस काळजी घेण्याची जबाबदारी यांच्यावर असते. चीनच्या सांस्कृतिक क्रांतीला तोंड दिलेले वृद्ध माता-पिता आणि ‘वन चाइल्ड’चे परिणाम भोगणारी मध्येच अडकलेली पिढी यामुळेही ताण निर्माण होत आहेत.
 
(लेखक ‘लोकमत’च्या मुंबई आवृत्तीत उपसंपादक आहेत.)
 
onkar2@gmail.com 

Web Title: Shigu

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.