पाकिस्तानी लेखिका फहमिदा रियाझ का सांगत होत्या, मेरी गुजारीश है, आप संभालिए!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 23, 2018 12:37 PM2018-11-23T12:37:28+5:302018-11-23T12:44:49+5:30

कडव्या धार्मिक अतिरेकाच्या घटनांनी व्यथित झालेल्या भारतीय नागरिकांच्या मनातल्या भयाला शब्द देणारी एक नज्म, भारतातल्या बदलत्या वास्तवाने व्यथित झालेल्या फहमिदा रियाज या ज्येष्ठ पाकिस्तानी लेखिकेची ही जुनी नज्म! तुम बिल्कुल हम जैसे निकले! ती व्हायरल झाली तेव्हा कराचीत वास्तव्याला असलेल्या सत्तर वर्षीय फहमिदा आपांशी ‘लोकमत’ने संपर्क केला, तेव्हा त्या जे म्हणाल्या, तोच हा निरोप. सरहदपारहून आलेला! पाकिस्तानातल्या या उदारमतवादी बंडखोर लेखिकेने २२ नोव्हेंबर २०१८ रोजी जगाचा निरोप घेतला

Pakistani writer Fahmida Riyaz was telling, I'm guessing, you handle! | पाकिस्तानी लेखिका फहमिदा रियाझ का सांगत होत्या, मेरी गुजारीश है, आप संभालिए!

पाकिस्तानी लेखिका फहमिदा रियाझ का सांगत होत्या, मेरी गुजारीश है, आप संभालिए!

Next
ठळक मुद्देइंडिया हमारे लिए एक जिंदा मिसाल है, कम्युनल हार्मनी और खुलेपन की! पण आता मी ऐकते, की माहौल खराब होतो आहे. लेखक-विचारवंतांचे खून पडताहेत, लिहिण्याबोलण्यावर पाबंदी येते आहे, - हा धोक्याचा इशारा ओळखा! हा असा माहौल घातक आहे. जिसकी शुरुआत आपके मुल्क में हो रही है, उसका अंजाम हम भुगत रहे है!

मुलाखत आणि शब्दांकन- मेघना ढोके

 

बहोत साल पहले मैने एक नज्म लिखी थी. 

तुम बिल्कुल हम जैसे निकले, अब तक कहां छुपे थे भाई?

वह मूरखता, वह घामड़पन जिसमें हमने सदी गंवाई

आखिर पहुंची द्वार तुम्हारे,  अरे बधाई, बहुत बधाई

फिर तुम लोग पहुंच जाओगे, बस परलोक पहुंच जाओगे!

हम तो हैं पहले से वहां पर, तुम भी समय निकालते रहना,

अब जिस नरक में जाओ, वहां से चिट्ठी-विट्ठी डालते रहना.

- भारतातल्या बदलत्या वातावरणाने व्यथित होऊन कित्येक वर्षापूर्वी मी लिहिले होते हे शब्द! ज्या खड्डय़ात माझा प्रिय देश कधीचा खितपत पडला आहे, त्याच दिशेने चालत येणारी शेजा:याची पावलं बघताना यातना होत होत्या मला, त्याच उतरल्या होत्या त्यावेळच्या शब्दांत. आणि हल्ली अचानकच मला माझे भारत-पाकिस्तानातले मित्र सांगायला लागले, आपकी नज्म हिंदुस्थान में आजकल काफी मशहूर हो रही है. बहौत चर्चे हे उसके!मैं पुछती हूं, भाई क्यूं?  क्यूं ये नज्म मशहूर हो रही है?  क्यूं इंटरनेट पे चक्कर खा रही है? खुशी नहीं है मुङो इस बात की; मेरे लिए तो यह बहौत ही दिल दुखाने वाली बात है. अगर आप कहते की, आपकी नज्म तो किसी जमाने की बात करती है, अब वो जमानाही नहीं रहा, आज की तारीख में इस नज्म के कोई मायने ही नहीं है; तो जादा खुशी होती मुझे...

बदनसिबी हीच की, तसं झालेलं नाही. 1996 सालची ही कविता, आजच्या काळातल्या भारतातही ती तितकीच ताजी असेल, तर ती लिहिणाऱ्या  व्यक्तीला  सरहदपार काय यातना होतात, काय सांगू? ब्रिटिश इंडियाच्या काळातल्या भारतात माझा जन्म झाला. मैं पैदाही उस मिट्टी से हुई हूं, ज्या उर्दू भाषेत लिहिते, ती भाषाही तुमच्याच मातीत जन्मली, वाढली. उर्दू साहित्याची कल्पनाही कुणी भारतातल्या उर्दू साहित्याशिवाय करूच शकत नाही. हे सारं सोबत घेऊन मी ‘पाकिस्तानात’ जगले तेव्हा भारताविषयी  अप्रूप आणि पोटात माया असणं यात गैर काही नाही, नव्हतंही!  आजही माझ्यावर इथं लोक आक्षेप घेतात, सवाल विचारतात की, भारतात जे चाललंय किंवा चालत होतं, त्याविषयी तू कशाला बोलतेस? लिहितेस? इंडिया की बात में आप क्यूं दखल दे रही है?

मी विचारते, का नाही?

इकडचे गुंडमवाली तिकडच्यांशी संधान साधून असतात. इकडचे धर्माध आणि तिकडचे धर्माध सारखीच भाषा बोलतात. मग इकडच्या-तिकडच्या लेखकांनी, कलावंतांनी, पत्रकारांनी जर एकमेकांच्या भूमिकेचं समर्थन केलं, मानवी विचार मांडत शांतता आणि सौहार्दासाठी एकमेकांच्या मागे उभं राहिलं तर काय बिघडतं? इथं राहणा:या कुणाही सामान्य पाकिस्तानी माणसाला विचारा, माङयासारख्या लिहित्या माणसांना, शासन आणि धर्माधांविरुद्ध आवाज उठवणा:या व्यक्तींना विचारा, आम्ही सतत उदाहरण देतो भारताचं! इंडिया हमारे लिए एक जिंदा मिसाल है, कम्युनकल हार्मोनी और खुलेपन की! आम्ही नेहमी सांगतो की, बघा जरा, एकाच वेळी स्वतंत्र देश म्हणून आपण प्रवास सुरू केला. भारत कुठं पोहचला, कुठं आहोत आपण? कुठं जातोय? कुठल्या दिशेनं प्रवास करतोय? आपल्या शेजारी जगातली सगळ्यात मोठी लोकशाही आहे. मानवी हक्क, नागरी स्वातंत्र्य, व्यक्तिस्वातंत्र्य, मोकळा श्वास घ्यायची आझादी तिथल्या प्रत्येक माणसाला आहे. जगात असा एकमेव देश असावा जिथं अनेक धर्माच्या माणसांची मोठी लोकसंख्या आहे. त्या-त्या धर्मात जाती-पोटजाती आहेत. अनेक वंश-रंग-भाषा घेऊन जगणारी माणसं मोकळेपणानं जगतात, सर्व प्रकारचं स्वातंत्र्य उपभोगतात. दंगली होतात, झाल्या आहेत, पण त्यांचं खुलेआम समर्थन कुणी करत नाही. शरमेची गोष्ट म्हणून या दंगलीकडे पाहिलं जातं, आणि त्या जखमा पोटात घेऊनही हा देश प्रगती करतो आहे. जे भारताला जमतं ते आपल्या देशात का जमू नये? पण माझ्यासारख्यांचे असे आवाज आमच्या देशात  ‘हिंदुस्थानप्रेमी’ म्हणून दडपले तरी गेले आणि व्यक्तिस्वातंत्र्यासह आझाद जगण्याची मागणी करणाऱ्यांची  देशनिकाली तरी झाली! देशनिकालीची ही अवस्था मी जगले आहे. माझ्याच  देशातून हद्दपार होत दोन लहान मुलांना घेऊन दिल्लीतच राहिले होते. पण ‘पाकिस्तानी मुसलमान’ म्हणून मला तिथं कुणी परकेपणाची वागणूक दिली नाही. भारताच्या मातीतच माणसांना सामावून घेण्याचा अद्भुत गुण आहे.  आमच्या देशातल्या मातीत जो द्वेष, जो विखार उगवला तो सुदैवानं तुमच्या देशातल्या मातीत रुजला नाही, ही भारताची मोठी ताकद आहे. ही माणूस म्हणून आपली मोठी ताकद आहे असं भारतातल्या प्रत्येक नागरिकाला वाटलं पाहिजे! जरा शेजारी, आमच्या देशात पाहा! अफगाणी धर्माध कडवट विचारांना आमच्या देशाची दारं खुली करून आम्ही इतिहासातीलच नाही, मानवी जगण्यातली सगळ्यात भयानक घोडचूक करून ठेवली! त्यानंतर आमच्या देशातला माहौल ज्या वेगानं बदलला ते महाभयाण आहे. सारा देश कडव्या विचारात वाहवत गेला. तसं बाकी देशांइतकं कडवं जहर आमच्या सिंध प्रांतात कधी नव्हतं. पण आता इथंही तीच कडवी भाषा, तोच विखार बोलला जातोय! ज्या प्रकारची सनातनी विचारसरणी, जी धर्माध लाट देशात आली त्यामुळे मुस्लीम बहुसंख्य देश असूनही कोण सच्च मुसलमान असे प्रश्न आता उपस्थित होऊ लागले आहेत. शिया मुस्लीम मुस्लीमच नाहीत असं म्हणण्याइतपत कहर या देशात सर्रास सुरू झाला. शिया मुस्लीम ‘मुस्लीम’ नाहीत अशी कल्पनाही आम्ही कुणी एरवी केली नसती, पण आता त्यांच्या मुस्लीम असण्यावर राजरोस सवाल उपस्थित करून, आम्ही म्हणू तोच मुसलमान असं म्हणण्यार्पयतचं बळ या देशातल्या कडव्या गटांकडे आलं आहे! 

..जिसे चाहे ये लोग नॉनमुस्लीम करार दे सकते है; सोचीए की क्या ये आप के देश में होना मुमकीन भी है?

जो हिंदू है वो हिंदू ही रहेगा ना? उसे जादा या कम हिंदू तो नहीं बना सकते? और बनाके भी क्या बनाओगे?  हिंदू म्हणून जगण्याचंही जिथं स्वातंत्र्य आहे, कुणी शैव आहेत, कुणी वैष्णव. त्यांना हिंदू म्हणून एकाच पद्धतीची उपासना करायला भाग पाडली जातेय अशी कल्पना तरी तुमच्या देशात कुणी करू शकतं का? पण आमच्याकडे धर्माचरणाचीही सक्ती आहे. आम्ही म्हणू तोच धर्म, आम्ही म्हणू तोच मुसलमान असा माहौल कडवे धर्माध तयार करताहेत. ये खतरनाक रास्ता है. और आगे जाके जहन्नूम में ही पहुंचाता है. हम उसी ओर जा नहीं रहे, बल्की जहन्नूम में पड चुके है.!

मेरी गुजारीश है, आप संभालिए!!

तुमच्या देशात तर एकेका धर्माची किती मोठी लोकसंख्या आहे. जर टोकाचं विष रुजलं, फोफावलं तर एकत्र जगणं किती मुश्कील होईल या कल्पनेचंही माङयासारख्या माणसांना इथं राहून भय वाटतं; कारण त्या वाटेवरच्या विखारी जगात जगतोय आम्ही! इथल्या घुसमटीची तुम्ही कल्पनाही करू शकत नाही. तरीही आम्ही बोलतो आहोत, भांडतो आहोत. लेखक म्हणून इथं बोलण्यालिहिण्यावर किती पाबंदी तरी झगडतो आहोत आणि त्याची भलीभक्कम किंमतही मोजतो आहोत.  लेखकानं आपल्या शब्दाची किंमत मोजायचीच असते, त्यात मोठं असं काय आहे? ती किंमत मोजली तरच तुमच्या शब्दाला वजन येतं. तर जनतेला वाटतं की, हा माणूस नुस्ता बोलत नाही, तर व्यक्तिगत जीवनातही त्यासाठी बरंच मोल चुकवतोय! - अवाम आपके लफ्जोंपे तब यकीन करती है, तब साथ चलती है जब आप के काम उन्हे मिसाल लगते है! एक उदाहरण सांगते, आमच्या सिंध प्रांताची अधिकृत भाषा म्हणून सिंधीच्या स्वीकाराला विरोध होता. इस्लामचे दाखले देत देत इतर भाषा आमच्यावर लादल्या जात होत्या. राजकीय इच्छाशक्तीचं समर्थन अर्थातच नव्हतं. त्यावेळी सिंधी साहित्यिक-पत्रकारांनीच एक चळवळ चालवली. मोर्चे काढले, ते दडपले गेले. लेख दडपले गेले. पण लोक ठाम राहिले. त्यांनी सरकारी पुरस्कार नाकारले, परत केले. सगळ्या सरकारी सोयीही नाकारल्या. आणि कुठलंही राजकीय पाठबळ नसताना सिंधी भाषेला अधिकृत भाषेची मान्यता सरकारला द्यावी लागली. कारण सिंधी लोक या सा:या चळवळीच्या, बुद्धिवाद्यांच्या मागे उभे राहिले! बुद्धिवाद्यांच्या भूमिकेला लोकांचा पाठिंबा मिळणं अवघड असतंच, पण का? तर कथनी आणि करणीत अनेकदा लोकांना अंतर दिसतं! ते अंतर दिसलं की लोकही बुद्धिवाद्यांना अंतर देतात. तसं होऊ नये!

सध्या मी ऐकतेय की, हिंदुस्थानात लेखक-बुद्धिवादी पुरस्कार परत करताहेत. अभिनंदनीय गोष्ट आहे. काहीतरी भूमिका घेताहेत. सरकारला सांगताहेत की, ज्या पद्धतीचं वातावरण देशात तयार होतंय, ते नाही चालणार! पण पुरस्कार परत करणं केवळ प्रतीकात्मक आहे, हे लक्षात घ्या. ही पहिली पायरी झाली. नुस्ते पुरस्कार परत केले म्हणजे आपण भूमिका घेतली असं होत नाही, त्यापुढे जाऊन पाऊल उचलावं लागेल. शब्दांतूनच नाही, तर तुमच्या वागण्या-बोलण्यातून लोकांना तुमची कळकळ जाणवायला हवी. विखारानं विखाराचं उच्चाटन नाही होत. समंजसपणा आणि शांतता-सौहार्दाची भाषाच या कल्लोळातून बाहेर काढेल! आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे, तुमच्या शब्दासाठी तुम्ही काय किंमत मोजली, हे लोकांना  दिसलं पाहिजे! नाहीतर लेखकांच्या नुस्त्या प्रतीकात्मक कृतीवर लोक तरी का विश्वास ठेवतील?  त्यामुळे लेखक-विचारवंतांची जबाबदारी जास्त वाढली आहे. कारण माहौल खराब होतो आहे. लेखक-विचारवंतांचे खून पडताहेत, कुणा लेखकाला कराचीला जाण्याची तिकिटं पाठवली जाताहेत, लिहिण्या-बोलण्यावर पाबंदी येते आहे, हा धोक्याचा इशारा ओळखा! हा असा माहौल घातक आहे. जिसकी शुरुआत आपके मुल्ख में हो रही है, उसका अंजाम हम भुगत रहे है. पाकिस्तानची निर्मिती झाली तेव्हा जिनासाहेबांनी एका सेक्युलर डेमोक्रसीचं स्वप्न  पाहिलं होतं. त्यांचं ते भाषण फार महत्त्वाचं आहे, सगळ्यांना माहितीही आहे. त्या भाषणात त्यांनी म्हटलं होतं की, देशासाठी सगळे नागरिक एकसमान असतील. जात-धर्म यावरून नागरिकांमधे कुठलाही भेद केला जाणार नाही. ते भाषण आणि ते तत्त्व कित्येक वर्षापूर्वीच आमची सरकारं विसरली. आता अलीकडेच आमच्या सरकारनं पार्लमेण्टमधे  ते भाषण सरकारचं अधिकृत धोरण म्हणून स्वीकारलं. इस बात पर अभी भी हमें यकीन नहीं है. हम हैरान हुए है की यह समझदारी सरकार को सुझी कैसे? याचा अर्थ एवढाच की, देश ज्या गर्तेत जाऊन पडलाय त्यातून बाहेर पडायला हवं. यापुढे अधिक नरकयातनात खितपत जगण्यात काही हाशील नाही इतपत समज तरी या देशात जन्माला येते आहे.  हिंदुस्थानात तर हा सलोख्याचा, सांझी जिंदगीचा माहौल किती वर्षे जुना आहे. नुस्ती संस्कृती नाही, तर  ती ताकद आहे हिंदुस्थानाची! म्हणून हिंदुस्थानाकडे मोठय़ा आशेनं पाहणा:या माङयासारख्यांना वाटतं की, हा सुजाण-सुसंस्कृत-बहुविध जगण्याचा वारसा जपायला हवा. जो जिंदगी सुकून की है. वो और खुशहाल बने! पडोस में रह कर यही मेरी आस है!!

  कोण आहेत फहमिदा रियाज?

या पाकिस्तानातल्या ज्येष्ठ कवी, लेखक आणि कार्यकत्र्या आहेत. त्यांचा जन्म फाळणीपूर्व भारतातल्या उत्तर प्रदेशात मेरठमधे 1946 मधे झाला. त्यांचे वडील शिक्षणतज्ज्ञ होते. सिंध प्रांतातल्या शिक्षणव्यवस्थेसंदर्भात काम करण्यासाठी त्यांचे वडील सिंध प्रांतात गेले आणि मग कुटुंब तिकडेच हैदराबादमधे स्थायिक झाले. त्या जेमतेम चार वर्षाच्या असताना  त्यांच्या अब्बूंचे निधन झाले. मात्र आईनं कष्ट  करत जिद्दीनं मुलीला शिकवलं. कॉलेजात असल्यापासून फहमिदा कविता करत.  त्यानंतर त्यांनी रेडिओ पाकिस्तानवर निवेदिका म्हणूनही काम केलं. पुढे लगA करून त्या काही वर्षे इंग्लंडला गेल्या. तिथंही त्यांनी बीबीसी उर्दूसाठी काम केलं. 

मात्र पुढे घटस्फोटानंतर त्या कराचीत आल्या. आणि एका जाहिरात एजन्सीबरोबर काम करू लागल्या. डाव्या विचारांचे कार्यकर्ते असलेल्या जफर अली उजन यांच्याशी विवाहानंतर त्या दोघांनी ‘आवाज’ नावाचं मासिक सुरू केलं. मात्र सरकारच्या विरोधात बोलणा:या या मासिकातील त्यांच्या लेखांमुळे त्यांच्यावर अनेक खटले घातले गेले. अनेक दिवस तुरुंगात गेल्यावर त्यांच्या एका चाहत्यानं त्यांना जामीन मिळवून दिला आणि एका मुशाय:याचं आमंत्रण आल्याचा बहाणा करून त्या दोन्ही लहान मुलं आणि बहिणीसह दिल्लीत दाखल झाल्या. त्यांचे पती काही महिन्यांनी भारतात आले. 1981 ते 1987 या काळात सुमारे सहा वर्षे त्या भारतात विजनवासात राहत होत्या. जनरल झिया  उल हक यांचं सरकार गेलं आणि बेनझीर भुत्ताे सत्तेत आल्या त्यानंतरच त्यांना पाकिस्तानात परतता आलं. आपल्या लेखनस्वातंत्र्यासाठी आणि विचारांसाठी फहमिदा यांनी आपल्या लहानग्या लेकरांसह अनेक वर्षे परवड सहन केली. बेनझीर भुत्ताेंच्या काळात नॅशनल बुक फाउंडेशनच्या त्या महाव्यस्थापक होत्या. काम जोरात सुरू होतं. पण पुढे नवाज शरीफ सरकार आल्यावर त्यांच्यावर भारताच्या एजण्ट असल्याचे आरोप झाले आणि कित्येक दिवस त्या बेरोजगार होत्या. छोटीमोठी कामं करत आपल्या मुलांचा सांभाळ करत त्यांनी रोजीरोटीचा बंदोबस्त केला. अशा अनेक चढउतारांना तोंड देतही फहमिदा आपल्या विचारांना, लेखनस्वातंत्र्याला बांधील राहिल्या. वैयक्तिक आयुष्यात अनेक दु:खं वाटय़ाला आली. वयात आलेला मुलगा पिकनिकला गेलेला असताना पाण्यात बुडून गेला. दुर्दैव छळत होतंच, पण तरीही फहमिदा लढत राहिल्या.  ही सध्या गाजत असलेली कविता वरकरणी भारताविषयी आहे असं वाटत असलं, तरी ती आहे पाकिस्तानातल्या धार्मिक उन्मादाविषयी, एकारलेपणाविषयी! धर्म या भावनेनं पछाडलेला देश कसा वागतो, कसं माणसांना बांधतो, आणि अर्धशतकी वाटचालीत माणसांचं जगणं कसं नरक करून टाकतो याचं ते वर्णन आहे.  पाकिस्तानात राहून हे सारं इतकं उघड बोलायला-लिहायला हिंमत लागते. ती हिंमत त्यांनी या कवितेतून 1996 मधे केली होती. मार्च 2014 मधे झालेल्या एका मुशाय:यात त्यांनी ही कविता सादर केली, आणि यूटय़ूबच्या माध्यमातून जगासमोर आली! त्यांच्या स्त्रीवादी कविता, बंडखोर लेख, कादंब:या हे सारंच पाकिस्तानात नाही तर जगभर गाजलेलं आहे.  आणि आजही त्या परखड बोलण्यासाठी-लिहिण्यासाठी प्रसिद्ध आहेत.

 

तुम बिल्कुल हम जैसे निकले.

 

तुम बिल्कुल हम जैसे निकले

अब तक कहां छुपे थे भाई?

वह मूरखता, वह घामड़पन

जिसमें हमने सदी गंवाई

आखिर पहुंची द्वार तुम्हारे

अरे बधाई, बहुत बधाई

 

भूत धरम का नाच रहा है

कायम हिन्दू राज करोगे?

सारे उल्टे काज करोगे?

अपना चमन नाराज करोगे?

तुम भी बैठे करोगे सोचा,

पूरी है वैसी तैयारी,

 

कौन है हिन्दू कौन नहीं है

तुम भी करोगे फतवे जारी

वहां भी मुश्किल होगा जीना

दांतो आ जाएगा पसीना

 

जैसे-तैसे कटा करेगी

वहां भी सबकी सांस घुटेगी

माथे पर सिंदूर की रेखा

कुछ भी नहीं पड़ोस से सीखा!

क्या हमने दुर्दशा बनायी

कुछ भी तुमको नज़र न आयी?

 

भाड़ में जाये शिक्षा-विक्षा,

अब जाहिलपन के गुन गाना,

आगे गड्ढा है यह मत देखो

वापस लाओ गया जमाना

 

हम जिन पर रोया करते थे

तुम ने भी वह बात अब की है

बहुत मलाल है हमको, लेकिन

हा हा हा हा हो हो ही ही

 

कल दुख से सोचा करती थी

सोच के बहुत हँसी आज आयी

 

तुम बिल्कुल हम जैसे निकले

हम दो कौम नहीं थे भाई

मश्क करो तुम, आ जाएगा

उल्टे पांवों चलते जाना,

दूजा ध्यान न मन में आए

बस पीछे ही नज़र जमाना

 

एक जाप-सा करते जाओ,

बारम्बार यह ही दोहराओ

कितना वीर महान था भारत!

कैसा आलिशान था भारत!

 

फिर तुम लोग पहुंच जाओगे

बस परलोक पहुंच जाओगे!

हम तो हैं पहले से वहां पर,

तुम भी समय निकालते रहना,

अब जिस नरक में जाओ, वहां से

चिट्ठी-विट्ठी डालते रहना.

meghana.dhoke@lokmat.com

(पूर्व  प्रसिद्धी  लोकमत  मंथन १७ ऑक्टोबर २०१५)

Web Title: Pakistani writer Fahmida Riyaz was telling, I'm guessing, you handle!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.