‘पहिल्या धारेची’..

By admin | Published: June 27, 2015 06:49 PM2015-06-27T18:49:07+5:302015-06-27T18:49:07+5:30

आयुष्य संपवणारी, हजारो कुटुंबं देशोधडीला लावणारी, ‘राजरोस’ तयार होऊनही कधीच, कुणालाच ‘न दिसणारी’

'First Dharechi' .. | ‘पहिल्या धारेची’..

‘पहिल्या धारेची’..

Next
>- रवींद्र राऊळ
 
‘कडक’ मालासाठी पॉलिशपासून स्पिरिटर्पयत. देशभरात गावठी दारूचे थोडथोडके नाहीत तर सुमारे तीनशे वेगवेगळे प्रकार आहेत. गावठी दारूच्या विक्रीतून अधिकाधिक नफा कमावण्याची कमालीची स्पर्धाच दारूविक्रेत्यांमध्ये असते. ज्याचा माल अधिक ‘कडक’ त्याच्या गुत्त्यावर गर्दी अधिक आणि गुत्तेदाराची कमाईही अधिक. मग माल कडक करण्यासाठी अनेक मार्ग अवलंबिले जातात. फ्रेंच पॉलिश, चुनखडी, चपला, स्पिरिटपासून बॅटरीतील कार्बनरॉडर्पयत वाट्टेल ते दारूत मिसळलं जातं. अशी विषारी दारू कधी ‘खोपडी’ म्हणून, कधी ‘कोंबडी’ म्हणून, कधी ‘ठर्रा’ म्हणून, तर कधी ‘केवट’ म्हणून विकली जात शेकडोंचे बळी घेते..
 
 
 
सर्वसामान्यांचे, गरिबांचे बळी घेणारी हातभट्टीची  दारू : विषय तसा पांढरपेशा जगात वर्ज्य असला, तरी त्याबद्दल उत्सुकता असतेच असते. हातभट्टीच्या या जगात प्रवेश केला आणि तिथल्या साम्राज्यावर नुसती नजर टाकली तरी आपली मती गुंग होते.
महानगरांपासून ते गावागावातील गल्लीबोळात अबाधीत गावठी दारूपुरवठा करणा:या हातभट्टय़ा चालवणा-यांचं एक वेगळंच जग आहे. सर्वसामान्यांच्या नजरेआड ते अहोरात्र सुरू असतं. एखाद्या कारखान्यात असावीत तशी हातभट्टीत काम करणा:यांची ‘बॉयलर’, ‘हेल्पर’, ‘बेचिनवाला’. अशी वेगवेगळी पदंही इथे असतात. हयातभर ते हीच कामं करत असतात. 
या सा:यांना हाताशी धरून नफ्यासाठी दारूत बेसुमार मिथेनॉल मिसळून मृत्यूचे सौदागर ठरणारे हातभट्टीमालक आणि सप्लायर येथे बेगुमान वावरत असतात. 
मोठी हातभट्टी लावायची तर त्याची सुरुवात होते ती ‘मसाल्या’चे डबे जमिनीत गाडण्यापासून!
विशेषत: वीस लिटर तेलाचे पत्र्याचे रिकामे डबे यासाठी वापरले जातात. फारच मोठा भट्टीमालक असेल तर तो लाकडी अथवा प्लॅस्टिकचे ड्रम वापरतो. एकदा भट्टी लावण्यासाठी सहा डबे पुरेसे असतात. 
या प्रत्येक डब्याला एका बाजूने गोलाकार झाकण लावलं जातं. झाकण काढलं की त्यातून कोपरार्पयत हात डब्यात जावा अशी सोय असते. या डब्यात दारूचा ‘मसाला’ भरला जातो. मसाला म्हणजे एकत्रित केलेला काळा गूळ, पाव किलो नवसागर आणि कुजलेली फळं आणि पाणी. हे डबे निर्जन ठिकाणी पुरले जातात. वास्तविक डबे न पुरताही मसाला लावता येतो. पण पुरतात अशासाठी की त्यावर पोलिसांची नजर पडू नये अथवा ते चोरीस जाऊ नयेत यासाठीच. 
पुरलेल्या डब्यावर चार बोटं माती पसरवून ते कुणाला दिसणार नाहीत, याची दक्षता घेतली जाते. एकदा डबे गाडले की त्यावर दररोज हात मारावा लागतो. ‘हात मारणं’ म्हणजे पुरलेल्या प्रत्येक डब्यावरील माती बाजूला करायची, झाकण काढून त्यात कोपरार्पयत हात आत घालायचा आणि ‘मसाला’ व्यवस्थित ढवळायचा. ढवळून झाल्यावर पुन्हा झाकण लावून त्यावर माती लोटायची. 
‘हात मारायचं’ हे काम करावं लागतं ते सलग चार-पाच दिवस, म्हणजे ‘शिट्टी’ वाजेर्पयत. पीठ आंबवल्यानंतर ते जसं फुगतं तसं चार-पाच दिवसांनी रासायनिक प्रक्रिया होऊन हा मसाला फसफसून वर येतो. मसाला फसफसला म्हणजे डब्याचं झाकण उघडताच सूùùù असा आवाज येऊ लागतो. मग समजायचं, झाला एकदाचा मसाला भट्टीत टाकण्यासाठी तयार! ‘शिट्टी’ वाजू लागली की हे मसाल्याचे डबे जमिनीतून बाहेर काढायचे, मोठय़ा पिंपात रिकामे करायचे, की झाली भट्टी लावायच्या कामाला सुरुवात.. 
अर्थातच पिंप मोठं असतं. सहा डब्यांचा ‘मसाला’ राहील इतकं. पिंपात तारेने एक अधांतरी मोठी थाळी बांधली जाते. या थाळीला आतील तयार दारू बाहेर यावी म्हणून पितळी नळी बसवलेली असते. या नळीला मीटरभर लांबीची रबरी नळी जोडून तिचं दुसरे टोक पिंपाबाहेरच्या बाटलीत सोडतात. त्याचवेळी घमेलं पिंपावर ठेवून त्यावर पाणी ओतलं जातं. घमेल्याभोवती चिकणमाती थापून किंवा फडकी बांधून त्यातील वाफ बाहेर जाऊ नये याची काळजी घेतली जाते. आता पिंपाखाली लाकडं सारून ती पेटवायची. त्यामुळे आतील ‘मसाल्या’च्या पाण्याचं बाष्पीभवन होऊन ते पाणी अधांतरी पसरट थाळीवर पडतं. तेच पाणी थाळीला बसवलेल्या नळीतून रबरी नळीत आणि मग बाटलीत येतं. याला म्हणतात पहिल्या धारेची दारू! प्रत्येक डब्यातून चार-पाच बाटल्या दारू सहज निघते. सहा बाटल्या दारूने एक गॅलन भरतं. भट्टी पेटवणा:याला येथे ‘बॉयलर’ म्हणून संबोधलं जातं. त्यातल्या त्यात ‘बॉयलर’ हा कसबी समजला जातो. कारण भट्टी अधिक प्रमाणात पेटून उकळी जाऊ देऊ नये, याचं कसब त्याच्याकडे असावं लागतं. उकळी गेली तर मालाची नासाडी होऊन भट्टीमालकाचं नुकसान होतं. ‘मसाला’ ढवळणारा ‘हेल्पर’ म्हणून ओळखला जातो.
हातभट्टीच्या दारूची ही प्रक्रिया.
अगदी गावागावात आणि शहरात गावठी दारूचा मोठा ग्राहकवर्ग आहे. ही मागणी लक्षात घेऊन आपलं उखळ पांढरं करून घेण्यासाठी गावठी दारू तयार करणारे आणि ते विकणारे यांचं जाळं अगदी पद्धतशीरपणो राज्यभर पसरलेलं आहे. एकवेळ दूधविक्रेत्यांचा संप झाल्यास शहराचा दूधपुरवठा बंद पडेल, पण गावठी दारूचा प्रवाह मात्र बारमाही आणि तिन्हीत्रिकाळ सुरू असतो. अगदी सरकारने ड्राय डे घोषित केलेला असतो तेव्हाही नशेबाजांच्या दिमतीला हातभट्टीची दारू मौजूद असते. किंबहुना अशा काळात तिला जास्तच मागणी असते.
1972 साली रायगड जिल्ह्यातील खोपोलीत विषारी गावठी दारूने शंभर जणांचे बळी घेतले होते. त्या घटनेची दखल घेत सरकारने देशी दारूनिर्मितीला परवानगी देण्याचा निर्णय घेतला होता. कायद्यानुसार गावठी दारू तयार करण्यास आणि विक्रीस बंदी आहे. अशा धंद्यांविरुद्ध कारवाई करण्याची जबाबदारी राज्य उत्पादन शुल्क विभाग आणि पोलीस खात्यावर आहे. त्यासाठी या दोन्ही खात्यांवर सरकार भरमसाठ खर्च करते. तरीही दर दोन -चार वर्षानी दारूचे बळी जातातच. सरकार अधिका:यांवर कारवाई करते आणि काही दिवसांनी पुन्हा गावठी दारूचे गुत्ते गजबजू लागतात.
मुंबई-पुण्यासारख्या शहरात एकही झोपडपट्टी अशी नाही की जेथे गावठी दारू वाहत नाही. वर्षानुवर्षाची गावठी दारू वितरणाची व्यवस्था येथे आजही तयार आहे. या ना त्यामार्गे दारूचे फुगे, गॅलन बिनदिक्कत गुत्त्यावर पोहोचतात. कोणतीही यंत्रणा हा दारूपुरवठा तोडू शकत नाही. धारावीची झोपडपट्टी असो की मानखुर्द, खारदांडा, मालाडचा मढ परिसर, गोरेगावचं आरेचं जंगल, गोराई खाडी, उरण, ठाण्यातील दिवा किंवा भिवंडी तालुक्यातील लहान लहान गावं. या ठिकाणी अहोरात्र धडाडून पेटणा:या हातभट्टय़ा मुंबईकरांचा दारूपुरवठा अबाधित ठेवतात.
विषबाधा होऊन मोठय़ा प्रमाणावर मृत्यू झाले तर ते प्रकार उघडकीस येतात, पण कमी प्रमाणात मिथेनॉल शरीरात जाऊन स्लो पॉयझनिंगमुळे मद्यपींचे मृत्यू होतात ते कधीच कशामुळे झाले हे उघडकीस येत नाही.
दररोज अशी दारू पिणा:याला अनेक व्याधी ग्रासतात. खंगत जाऊन, वेगवेगळे विकार होऊन कालांतराने त्याचा मृत्यू होतो. मात्र एकेकटय़ाचे मृत्यू कधीच जमेत धरले जात नाहीत. त्या मद्यपीलाच सारे दोष देतात आणि त्याला विषारी दारू पाजत कमाई करणारे हातभट्टीचालक, दारूविक्रेते, त्यांना मुभा देणारे पोलीस, उत्पादन शुल्क अधिकारी आणि राजकारणी असे सारेजण मात्र नामानिराळे राहतात.
 
 
कशी तयार होते दारू?
4हातभट्टी लावायची सुरुवात होते ती ‘मसाल्या’चे डबे जमिनीत गाडण्यापासून!
4डब्यात दारूचा ‘मसाला’ टाकला जातो. हा मसाला म्हणजे काळा गूळ, नवसागर, कुजलेली फळं, चपला, स्पिरीट, फ्रेंच पॉलिशपासून तर बॅटरीच्या सेलर्पयत काहीही.
4एकदा डबे गाडले की त्यावर दररोज हात मारायचा. म्हणजे पुरलेला डबा उकरायचा, झाकण काढून कोपरार्पयत हात आत घालायचा आणि ‘मसाला’ व्यवस्थित ढवळायचा.
4सलग चार-पाच दिवस, ‘शिट्टी’ वाजेर्पयत हात मारायचा. डब्याचं झाकण उघडताच सूùùù असा आवाज आला की समजायचं, झाला ‘मसाला’ तयार! 
4हे मसाल्याचे डबे मोठय़ा पिंपात रिकामे करायचे, की झाली भट्टी लावायच्या कामाला सुरुवात..
4पिंपात तारेने एक अधांतरी थाळी बांधली जाते. त्यावर पितळी नळी आणि तिला जोडलेली रबरी नळी.
4पिंपाखाली लाकडं सारून ती पेटवायची. ‘मसाल्या’च्या पाण्याचं बाष्पीभवन होऊन ते पाणी थाळीवर पडतं आणि मग बाटलीत! झाली तयार पहिल्या धारेची दारू!
 
हातभट्टीतला नफा पाचशे टक्के !
हातभट्टीच्या म्हणजे गावठी दारूच्या धंद्याचं मूळ कारण दडलंय ते या दारूला असलेल्या मोठय़ा मागणीत आणि भरघोस नफ्यात. सुमारे तीनशे ते पाचशे टक्क्यांर्पयत नफा या धंद्यात होतो. हातभट्टीमालक, सप्लायर, गुत्तामालक अशा वेगवेगळ्या टप्प्यात नफ्यासाठी घातक रसायनं दारूत मिसळली जातात. 
देशी दारू आणि भारतीय बनावटीचं विदेशी मद्य न परवडणारा मोठा वर्ग गावठी दारूच्या आहारी जातो. साफसफाई, शारीरिक श्रमाची कामं करणारा मजूरवर्ग आपले श्रम आणि ताणतणाव विसरण्यासाठी हातभट्टीची दारू झोकतो. नवटाक - छटाक दारूसाठी दिवसभराची कमाई खर्ची घालतो. त्याचबरोबर ब:यापैकी मिळकत असलेलेही स्वस्तात तलफ भागवण्यासाठी हातभट्टीची म्हणजे गावठी दारूची बाटली कवटाळतात आणि स्वत:सह कुटुंबाचाही सर्वनाश करून घेतात. बियरपासून मद्यपानाला सुरुवात करणारे सधन लोकही अधिक नशेसाठी विदेशी दारूवरून टप्प्याटप्प्याने गावठी दारूवर येऊन ठेपतात.
 
का मरतात माणसं?
हातभट्टीच्या दारूची नशा अधिक प्रमाणात यावी यासाठी त्यात मिथील अल्कोहोल (मिथेनॉल) किंवा एथील अल्कोहोल मिसळलं जातं. बहुतेकदा सगळी गडबड होते ती याच मिथेनॉलमुळे. या दोन्ही रसायनांची केमिकल प्रॉपर्टी जवळजवळ सारखीच. अगदी दोन्हींचा वासही सारखाच. एथील अल्कोहोल हे उसापासून तयार होतं, तर मिथील अल्कोहोल हे पेट्रोलियम प्रॉडक्ट. मिथील अल्कोहोल अधिक प्रमाणात शरीरात गेलं तर ते प्राणावर बेततं. सुमारे 30 मिलि मिथील अल्कोहोल रक्तात मिसळलं की रक्ताभिसरणाचं प्रमाण वाढतं. रक्तात गुठळ्या तयार होतात आणि आंधळेपणा येऊ शकतो. तेच प्रमाण दुप्पट झालं तर मद्यपी थेट मृत्यूलाच कवटाळतो. वैद्यकीय उपचार करण्याचीही संधी मिळत नाही. हा धोका ठाऊक असूनही भरमसाठ नफ्याच्या मोहापायी हातभट्टीवाले मिथेनॉलचा वापर करतातच. त्यातूनच मालवणीसारखं दारूकांड होतं. विशेष म्हणजे, या घातक रसायनांच्या खरेदी-विक्रीवर कोणतेही र्निबध नाहीत. मिथील अल्कोहोलची पिंपेच्या पिंपे खरेदी करून हातभट्टीवाले त्याचा सर्रास वापर करतात.
 
कशी होते विक्री? 
ती ‘दिसत’ कशी नाही?
गावठी दारूची वाहतूक हाही अफलातून प्रकार आहे. दारूचे फुगे म्हणजे टायरच्या टय़ूबमध्ये भरलेली दारू गुत्त्यागुत्त्यात वितरित होताना पोलिसांना ती कधीच ‘दिसत’ नाही. मोठे दारूविक्रेते जुन्या, खटारा कार विकत घेऊन दारूची वाहतूक करतात. मालाड, अंधेरी, अॅन्टॉप हिलमधील दारू वितरक तर प्रत्येकी तीस ते पस्तीस जुन्या कारचा वापर दारू वाहतुकीसाठी करतात. या गाडय़ा चोवीस तास दारूची ने-आण करण्यासाठी धावत असतात. कधी पोलिसांनी गाडी जप्त केलीच तर जास्तीचं आर्थिक नुकसान होऊ नये यासाठी जुन्याच कार घेतल्या जातात. कुठल्या भागातल्या हातभट्टय़ांवर पोलिसांचे छापे पडलेच तर तत्काळ दुस:या कुठल्या हातभट्टीवरून दारू आणायची 
हेही ठरलेलं असतं. 
 
 
 
दारूच्या धंद्यातूनच तर
तयार झाले ‘माफिया डॉन’!
ज्या पोलीस ठाण्याच्या हद्दीत या अड्डय़ांची संख्या जास्त तेथे पोस्टिंग मिळवण्यासाठी पोलीस 
आणि उत्पादन शुल्क अधिका:यांमध्ये 
कमालीची स्पर्धा असते. बदली झाल्यावर पोलीस ठाण्याची सूत्रं सोडताना अधिकारी नव्या अधिका:याला आपल्या हद्दीतील अशा धंद्यांची यादी आणि हप्त्याची रक्कम किती याची यादीच ब:याचदा सुपूर्द करतो. परिणामी हे धंदे अव्याहतपणो सुरूच राहतात. मुंबई-पुण्यात दादा लोकांची जमात याच धंद्याच्या आश्रयाने वाढली. वरदराजन मुदलीयारसारखे माफिया डॉन तयार झाले ते चोरटय़ा दारूच्याच धंद्यातून. वरदाची दारूधंद्यातील मक्तेदारी मोडून काढताना मुंबई पोलीस मेटाकुटीला आले होते.
 
(लेखक ‘लोकमत’च्या मुंबई आवृत्तीत
मुख्य उपसंपादक आहेत.)

Web Title: 'First Dharechi' ..

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.