यंदा मान्सून ९५ टक्के बरसणार- स्कायमेटचा अंदाज

By Admin | Published: March 27, 2017 10:29 PM2017-03-27T22:29:50+5:302017-03-27T22:29:50+5:30

मान्सूनच्या काळात देशभरात सरासरीच्या ९५ टक्के पाऊस पडण्याची शक्यता असल्याचा अंदाज स्कायमेट या संस्थेने व्यक्त केला

This year will be 95 percent of the monsoon - SkyMate estimates | यंदा मान्सून ९५ टक्के बरसणार- स्कायमेटचा अंदाज

यंदा मान्सून ९५ टक्के बरसणार- स्कायमेटचा अंदाज

googlenewsNext

ऑनलाइन लोकमत
पुणे, दि. 27 - जून ते सप्टेंबर या मान्सूनच्या काळात देशभरात सरासरीच्या ९५ टक्के पाऊस पडण्याची शक्यता असल्याचा अंदाज स्कायमेट या संस्थेने व्यक्त केला आहे. त्यात ५ टक्के कमी अधिक फरक पडू शकतो़ देशभरात ८८७ मिमी पाऊस पडण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे़ एलनिनोचा प्रत्यक्ष प्रभाव जुलैनंतर जाणवणार असल्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे़
भारताची ६० टक्के लोकसंख्या ही मान्सूनच्या पावसावर अवलंबून आहे़ त्यामुळे मान्सून कसा असणार याविषयी सर्वांनाच सर्वाधिक उत्सुकता असते़ नैऋत्य मोसमी पावसावर पॅसिफिक महासागर उद्भवणाऱ्या एल निनोचा प्रभाव पडत असतो़ यंदा पॅसिफिक महासागरातील पाण्याच्या तापमानात वाढ होत असल्याचे दिसून आले आहे़ त्यामुळे एल निनोचा प्रभाव वाढण्याची शक्यता असून त्याचा परिणाम आपल्याकडील मान्सूनवर जुलैनंतर पडण्याची शक्यता असल्याचे स्कायमेटने म्हटले आहे़
स्कायमेटच्या अंदाजानुसार जुनमध्ये १०२ टक्के पाऊस होऊ शकतो़ जूनमध्ये सर्वसाधारण पावसाची ७० टक्के शक्यता, २० टक्के सरासरीपेक्षा जास्त आणि १० टक्के सरासरीच्या कमी पाऊस होण्याची शक्यता आहे़ जुलैमध्ये ९४ टक्के पाऊस होण्याची शक्यता असून त्यात सर्वसाधारण पावसाची ६० टक्के शक्यता, सरासरीपेक्षा जास्त पावसाची १० टक्के शक्यता, कमी पावसाची ३० टक्के शक्यता आहे.
आॅगस्टमध्ये ९३ टक्के पाऊस होण्याची शक्यता असून त्यात समाधानकारक पावसाची ६० टक्के शक्यता, जादा पावसाची १० टक्के शक्यता आणि कमी पावसाची ३० टक्के शक्यता आहे. सप्टेंबरमध्ये ९६ टक्के पाऊस होणार असून त्यात सर्वसाधारण पावसाची ५० टक्के शक्यता, जादा पावसाची २० टक्के आणि ३० टक्के कमी पावसाची शक्यता आहे. स्कायमेटचे कार्यकारी अधिकारी जतीन सिंग यांनी सांगितले की, पॅसिफिक महासागरातील पाण्याच्या तापमान वाढत असल्याचे जाणवले असून त्यातून एल निनो इफेक्ट दिसून येऊ शकतो़ त्यामुळे भारतात सरासरीपेक्षा पाऊसमान कमी होण्याची २५ टक्के शक्यता असून दुष्काळ पडण्याची शक्यता १५ टक्के शक्यता आहे.

स्कायमेटचा अंदाज
महिना टक्केवारी एकूण पाऊस
जून १०२ १६४
जुलै ९४ २८९
आॅगस्ट९३ २६१
सप्टेंबर९६ १७३

सलग चौथ्या वर्षी कमी पावसाची शक्यता
एल निनोचा प्रभाव २०१४ आणि २०१५ या वर्षात मोठ्या प्रमाणावर जाणविल्याने त्यांचा परिणाम मान्सूनच्या पावसावर झाला होता़ सलग गेल्या ४ वर्षात सरासरीपेक्षा कमी पाऊस होण्याचा अंदाज आहे.
भारताचे सरासरी पाऊसमान ८८७़५ मिमी आहे़ २०१४ मध्ये ७८१ मिमी पाऊस झाला होता़ तो सरासरीपेक्षा १२ टक्के कमी होता़ २०१५ मध्ये ७६०़६ मिमी पावसाची नोंद झाली होती़ तो सरासरीपेक्षा १४ टक्के कमी होता़ गेल्या वर्षी सर्वदूर चांगला पाऊस झाला असला तरी तो ८६२़२ इतका झाला होता़ तो सरासरीपेक्षा ३ टक्के कमी होता.

Web Title: This year will be 95 percent of the monsoon - SkyMate estimates

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.