यवतमाळमध्ये एकाच कुटुंबातील चौघे जण वाहून गेले

By admin | Published: August 6, 2015 10:41 AM2015-08-06T10:41:04+5:302015-08-06T12:24:35+5:30

यवतमाळमधील आजणकर कुटुंबासाठी पाऊस जीवघेणा ठरला असून पुराच्या पाण्यात कुटुंबातील चौघे जण वाहून गेले आहेत.

Yavatmal was divided into four families of the same family | यवतमाळमध्ये एकाच कुटुंबातील चौघे जण वाहून गेले

यवतमाळमध्ये एकाच कुटुंबातील चौघे जण वाहून गेले

Next

ऑनलाइन लोकमत

यवतमाळ, दि. ६ -  राज्यात कृत्रिम पावसाचे प्रयत्न सुरु असतानाच विदर्भाला पावसाने अक्षरशः झोडपले आहे. यवतमाळमधील बिल्दोरी पुलावर ऑल्टो कारमधून प्रवास करणारे एकाच कुटुंबातील चौघे जण कारसहीत वाहून गेल्याची घटना बुधवारी रात्री घडली.

मुसळधार पावसामुळे यवतमाळमधील नद्या दुथडी भरुन वाहत आहे. यवतमाळ जिल्ह्यातील अर्वी - यवतमाळ रोडवर बिल्दोरी पुलावरुन नदीचे पाणी  वाहत होते.  बुधवारी रात्री उशीरा यवतमाळमधील आजणकर कुटुंब त्यांच्या ऑल्टो कारमधून बिल्दोरी पुलावर आले. मात्र पाण्याच्या जोरदार प्रवाहामुळे ऑल्टो कार वाहून गेली. या सर्व गोंधळात आजणकर कुटुंब गाडीतून बाहेर पडू शकले नाहीत व संपूर्ण कुटुंबच पाण्यात वाहून गेले. गजानन, संजय, गायत्री व सात्वी अशी या चौघांची नावे आहेत.  

 

Web Title: Yavatmal was divided into four families of the same family

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.