15 दिवसाच्या आत एमएमआरडीएच्या अर्थसंकल्पात मीरा-भाईंदर मेट्रोसाठी तरतूद केली नाही तर जनआंदोलन - काँग्रेस

By ऑनलाइन लोकमत | Published: March 28, 2018 02:51 PM2018-03-28T14:51:34+5:302018-03-28T14:51:34+5:30

मुख्यमंत्र्यांनी मीरा भाईंदरच्या जनतेला दिलेल्या अनेक आश्वासनांपैकी मेट्रोचे आश्वासनदेखील खोटेच ठरले आहे.

Within 15 days provide MMRDA budget for Mira-Bhayander Metro - Congress | 15 दिवसाच्या आत एमएमआरडीएच्या अर्थसंकल्पात मीरा-भाईंदर मेट्रोसाठी तरतूद केली नाही तर जनआंदोलन - काँग्रेस

15 दिवसाच्या आत एमएमआरडीएच्या अर्थसंकल्पात मीरा-भाईंदर मेट्रोसाठी तरतूद केली नाही तर जनआंदोलन - काँग्रेस

googlenewsNext

मीरारोड - मुख्यमंत्र्यांनी मीरा भाईंदरच्या जनतेला दिलेल्या अनेक आश्वासनांपैकी मेट्रोचे आश्वासनदेखील खोटेच ठरले आहे. मुख्यमंत्री अध्यक्ष असताना एमएमआरडीएच्या अर्थसंकल्पात मेट्रोसाठी आर्थिक तरतूद न करून जनतेच्या तोंडाला पाने पुसली आहेत. 15 दिवसात मेट्रोसाठी आर्थिक तरतूद अर्थसंकल्पात केली नाही तर जनआंदोलन उभारू असा इशारा काँग्रेसने दिलाय . 

काँग्रेस जिल्हाध्यक्ष तथा नगरसेवक अनिल सावंत यांनी म्हटले आहे की, पालिका निवडणूक व त्या आधीपासून शहरात सतत येत असलेल्या मुख्यमंत्र्यांनी अनेक आश्वासनांपैकी एक मेट्रोचे लॉलीपॉप दिले होते. भोळी जनतासुद्धा त्यात रममाण झाली. स्थानिक आमदारांनी जनतेकडून मेट्रोच्या प्रतिकृती स्वीकारल्या, सुखकर रेल्वे प्रवासाची स्वप्ने जनतेला दाखवलीय मेट्रो स्टेशनची नावं देखील नक्की केली. 2019 मध्ये जनतेने मेट्रोत बसायचे इतकी जुमलेबाजी करून भूरळ घातली होती . 

वास्तविक मीरा भाईंदर व पुढे वसई विरार हे मेट्रोने जोडावे अशी मागणी त्यावेळी माजी आमदार मुझफ्फर हुसेन यांनी चालवली होती . तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यानी देखील मीरा-भाईंदर शहराचा मेट्रोमध्ये समावेश केला होता. पण याच भाजपा सरकारने मेट्रो रद्द केली असा आरोप सावंत यांनी केला. 

मेट्रोच्या मागणी साठी काँग्रेस पक्षाने नागरिकांसह शहरात आंदोलन केले. स्वाक्षरी मोहीम राबवली. भाजपा मुख्यमंत्र्यांना मीरा भाईंदरचा मेट्रोमध्ये समावेश करण्यास भाग पाडले. परंतु आता एमएमआरडीएच्या अर्थसंकल्पात तरतूद न करून शहरातील जनतेच्या जखमेवर मुख्यमंत्री व स्थानिक नेत्याने मीठच चोळले आहे. मात्र आता जनता गप्पा बसणार नाही आणि काँग्रेस पक्ष जनते सोबत असेल. अशक्यमय रेल्वे प्रवास, होणारे अपघात, महिला व विद्यार्थ्यांची होणारी ससेहोलपट, शहरातील वाढते प्रवासी, इतर वाहतुकीची अपुरी साधने यांचा विचार करून 15 दिवसाच्या आत एमएमआरडीएच्या अर्थसंकल्पात मीरा-भाईंदर मेट्रो साठी भरीव तरतूद केली नाही तर रस्त्यावर उतरून कॉंग्रेस पक्ष याचा विरोध करेल असा इशारा अनिल सावंत यांनी दिलाय . 

एमएमआरडीच्या अर्थसंकल्पात मीरा भाईंदर मेट्रो साठी आर्थिक तरतूदच केली नसल्याचे वृत्त लोकमतने दिल्या नंतर शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी सेना आमदारां सह विधान भवनच्या आवारात आंदोलन केले होते . तर मनसे , नागरिक अधिकार मंच सह काँग्रेसने देखील आंदोलनाचा इशारा दिलाय. मेट्रो वरून सोशल मीडियावर देखील खडाजंगी सुरु आहे . 

Web Title: Within 15 days provide MMRDA budget for Mira-Bhayander Metro - Congress

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.