Belgaum Municipal Corporation Election Results: बेळगावात भाजपाचं 'कमळ' कशामुळे फुललं?... 'हे' आहेत १० ठळक मुद्दे

By ऑनलाइन लोकमत | Published: September 6, 2021 02:54 PM2021-09-06T14:54:28+5:302021-09-06T14:55:05+5:30

why Maharashtra ekikaran samiti Lost Belgaum Election? बेळगाव महापालिकेची स्थापना झाल्यापासून या महापालिकेवर महाराष्ट्र एकीकरण समितीचे वर्चस्व होते पण हेच निर्विवाद वर्चस्व भाजपने उलथवून टाकले आहे. हा पराभव मराठी अस्मितेच्या जिव्हारी लागणारा आहे.

Why BJP won in Belgaum Municipal corporation election 2021? these are the 10 reasons | Belgaum Municipal Corporation Election Results: बेळगावात भाजपाचं 'कमळ' कशामुळे फुललं?... 'हे' आहेत १० ठळक मुद्दे

Belgaum Municipal Corporation Election Results: बेळगावात भाजपाचं 'कमळ' कशामुळे फुललं?... 'हे' आहेत १० ठळक मुद्दे

googlenewsNext

बेळगाव महापालिका निवडणुकीतील पराभव मराठी अस्मितेच्या जिव्हारी लागणारा आहे. बेळगाव महानगरपालिका ही महाराष्ट्र एकीकरण समितीच्या ताब्यातून गेली असून आता या महापालिकेवर भाजपची सत्ता असणार आहे. परंतू असे का झाले? एवढी वर्षे ताब्यात असलेली महापालिका कशी गेली? अंतर्गत वाद की आणखी काही, याची कारणे आता शोधावी लागणार आहेत. (Why BJP won in Belgaum Municipal corporation election? see 10 reasons.)

Hubli-Dharwad Election Result: हुबळी-धारवाडमध्ये भाजपाची हॅट्ट्रिक; तिसरी महापालिका काँग्रेसला तारणार?

 बेळगाव महानगरपालिकेची निवडणूक आठ वर्षानंतर झाली. यापूर्वी 2013 साठी निवडणूक झाली होती. मात्र, 2018 ला मुदत संपल्यानंतर चुकीच्या पद्धतीने वॉर्ड रचना केल्यामुळे याबाबतचा वाद न्यायालयात होता आणि हा वाद सुरू असतानाच घाईघाईने कर्नाटक राज्य सरकारने ही निवडणूक जाहीर केली. बेळगाव महापालिकेची स्थापना झाल्यापासून या महापालिकेवर महाराष्ट्र एकीकरण समितीचे वर्चस्व होते पण हेच निर्विवाद वर्चस्व भाजपने उलथवून टाकले आहे. 

Belgaum Municipal Corporation Election Results: संजय राऊतांचा स्वप्नभंग; ३० जागा जिंकण्याचा होता निर्धार, पण दोनच जागांवर 'महाराष्ट्र एकीकरण'ला आधार

बेळगावात भाजप का जिंकला
१.महाराष्ट्र एकीकरण समिती मधील अंतर्गत मतभेद 
२. इच्छुक वाढल्याने मूळ मराठी मतांत मोठ्याप्रमाणात विभागणी 
३.भाजपचे विकास आणि हिंदुत्व हे मुद्दे जनतेला भावले
४.भाजप काँग्रेस आप आणि एमआयएम या मोठ्या राजकीय पक्षांकडून जोरदार प्रचार 
५. प्रभागांची पुनर्रचना झाल्यामुळे  मराठी उमेदवारांना फटका 
६. कर्नाटक राज्यात भाजपची सत्ता. बेळगावमधील आमदार, खासदार भाजपचे; त्यामुळे भाजपने ताकद लावली
७. महाराष्ट्र एकीकरण समितीकडून उमेदवारांची यादी जाहीर करण्यास विलंब
८. समितीचे 58 पैकी फक्त 21 जागांवर अधिकृत उमेदवार. त्यामुळेच मर्यादित यश.
९. महाराष्ट्र एकीकरण समितीला महाराष्ट्रातल्या सगळ्याच राजकीय पक्षांनी वेळोवेळी पाठिंबा दर्शवला आहे. पण यावेळी या निवडणुकीसाठी महाराष्ट्रकडून पुरवली जाणारी रसद पडली कमी.
१०. महाराष्ट्रातील नेत्यांनी एकीकरण समितीमधील नेत्यांमध्ये जर एकसंधपणा आणायचा प्रयत्न केला असता तर हा पराभव टाळता आला असता. ज्येष्ठ नेते प्रा. एन डी पाटील आजारी असल्याने सर्व नेत्यांना एकत्र करण्यात समितीला अपयश.

Web Title: Why BJP won in Belgaum Municipal corporation election 2021? these are the 10 reasons

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.