गोवंडीत वाहतुकीचे नियोजन करत असताना वाहतूक पोलिसावर हल्ला, सुरक्षारक्षकाला मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2017 02:30 AM2017-09-22T02:30:44+5:302017-09-22T02:30:46+5:30

गोवंडीत वाहतुकीचे नियोजन करत असताना दोन वाहनचालकांनी वाहतूक पोलिसाला शिवीगाळ करत मारहाण केल्याची घटना बुधवारी घडली. या प्रकरणी देवनार पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

While planning a transport in Goa, the traffic police attacked, security forces beat up | गोवंडीत वाहतुकीचे नियोजन करत असताना वाहतूक पोलिसावर हल्ला, सुरक्षारक्षकाला मारहाण

गोवंडीत वाहतुकीचे नियोजन करत असताना वाहतूक पोलिसावर हल्ला, सुरक्षारक्षकाला मारहाण

Next

मुंबई : गोवंडीत वाहतुकीचे नियोजन करत असताना दोन वाहनचालकांनी वाहतूक पोलिसाला शिवीगाळ करत मारहाण केल्याची घटना बुधवारी घडली. या प्रकरणी देवनार पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
देवनार पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विक्रोळीचे रहिवासी असलेले वाहतूक पोलीस संजय राणे (४४) हे बुधवारी दुपारी १२च्या सुमारास गोवंडीच्या बैंगनवाडी परिसरात घाटकोपर-मानखुर्द लिंक रोडवर वाहतुकीचे नियोजन करत होते. या वेळी दोन वाहनचालकांनी त्यांच्याशी हुज्जत घातली. राणेंनी याबाबत जाब विचारला असता, आरोपी चालकांनी त्यांना शिवीगाळ करत मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यानंतर त्यांना धमकावत पळ काढला. अन्य कर्मचाºयांच्या मदतीने राणे यांना जवळच्या रुग्णालयात दाखल केले. तेथे त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
चेंबूरमध्ये रिक्षा पार्किंगच्या वादातून सुरक्षारक्षकाला बुधवारी मारहाण करण्यात आली. अटईराम राजदेव यादव (४८) असे जखमी सुरक्षारक्षकाचे नाव असून, त्यांच्यावर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणी आर.सी.एफ. पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: While planning a transport in Goa, the traffic police attacked, security forces beat up

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.