सरकारी कर्मचाऱ्यांना ५ दिवसांचा आठवडा मिळेल, पण...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 20, 2018 06:28 AM2018-10-20T06:28:20+5:302018-10-20T06:30:08+5:30

मुंबई : सहा दिवसांऐवजी पाच दिवसांचा आठवडा केला तर दररोज पाऊणतास जादा काम करण्याची तयारी राजपत्रित अधिकारी महासंघाने सरकारला ...

Week of 5 days; but 45 minit daily work more | सरकारी कर्मचाऱ्यांना ५ दिवसांचा आठवडा मिळेल, पण...

सरकारी कर्मचाऱ्यांना ५ दिवसांचा आठवडा मिळेल, पण...

Next

मुंबई : सहा दिवसांऐवजी पाच दिवसांचा आठवडा केला तर दररोज पाऊणतास जादा काम करण्याची तयारी राजपत्रित अधिकारी महासंघाने सरकारला दिलेल्या प्रस्तावात दर्शविली आहे.


सध्याची कार्यालयीन वेळ ही सकाळी ९.४५ ते सायंकाळी ५.३० अशी आहे. त्याऐवजी सकाळी ९.४५ ते सायंकाळी ६.१५ अशी कार्यालयीन वेळ असावी, असे महासंघाने मुख्यमंत्री देवेंद फडणवीस यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. तसे केल्यास अधिकारी, कर्मचारी दररोज ८ तास म्हणजे ४८० मिनिटे काम काम करतील.


आठवड्याचे १७६ तास काम होईल आणि वर्षभरातील कामाचे तास २११२ असतील. सध्या सहा दिवसांचा आठवडा असूनही २०८८ तास कामकाजाचे असतात. सध्या दरदिवशी ७ तास १५ मिनिटे कामकाज होते, याकडे महासंघाने लक्ष वेधले आहे.

वर्षाकाठी वाढतील २४ तास
पाच दिवसांचा आठवडा केल्यास दोन दिवस व वर्षभरातील २४ दिवस कमी होतील, पण दररोज कामाचा ४५ मिनिटांनी वाढल्याने एका महिन्यात कामाचे दोन तास व वर्षाकाठी २४ तास वाढतील, असे महासंघाने म्हटले आहे.

Web Title: Week of 5 days; but 45 minit daily work more

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Governmentसरकार