विधानसभा निवडणुकीबद्दल प्रकाश आंबेडकरांची मोठी घोषणा; म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Published: June 22, 2019 02:38 AM2019-06-22T02:38:53+5:302019-06-22T06:38:27+5:30

उमेदवारांची पहिली यादी ३० जुलैला जाहीर करण्यात येईल; प्रकाश आंबेडकरांची माहिती

Vidhan Sabha on itself - Prakash Ambedkar | विधानसभा निवडणुकीबद्दल प्रकाश आंबेडकरांची मोठी घोषणा; म्हणाले...

विधानसभा निवडणुकीबद्दल प्रकाश आंबेडकरांची मोठी घोषणा; म्हणाले...

googlenewsNext

मुंबई : विधानसभेसाठी काँग्रेससह कोणत्याच पक्षाशी आमची बोलणी झाली नाहीत. त्यामुळे विधानसभा निवडणुकासुद्धा वंचित बहुजन आघाडी स्वबळावर लढवेल. सर्व २८८ विधानसभा मतदारसंघात लढण्याची आमची तयारी आहे. आमच्या उमेदवारांची पहिली यादी ३० जुलैला जाहीर करण्यात येईल, अशी माहिती आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिली.

लोकसभेत वंचित आघाडीला भाजपने नव्हे, तर ईव्हीएमने पराभूत केले आहे. बऱ्याच मतदारसंघात मतदानाची आकडेवारी आणि प्रत्यक्ष मतमोजणी यातील आकड्यात फरक आहे, असा दावाही त्यांनी केला. वंचित आघाडीला भाजपची ‘बी’ टीम म्हणणाऱ्या काँग्रेसने पुरावे द्यावेत, अन्यथा आमच्या उमेदवारांना राज्यभरात ४० लाख मते देणाऱ्या मतदारांची माफी मागावी, अशी मागणी आंबेडकर यांनी केली.

Web Title: Vidhan Sabha on itself - Prakash Ambedkar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.