VIDEO : लोणारमधील हजारो वर्षांपासूनची धार आटली

By Admin | Published: April 7, 2017 08:01 PM2017-04-07T20:01:14+5:302017-04-07T20:25:07+5:30

ऑनलाइऩ लोकमत/ किशोर मापारी   लोणार, दि. 07 - जागतिक पर्यटन स्थळ लोणार सरोवरातील हजारो वर्षापासून अखंड वाहत असलेला स्वच्छ ...

VIDEO: There has been a trend of thousands of years in the Lonar | VIDEO : लोणारमधील हजारो वर्षांपासूनची धार आटली

VIDEO : लोणारमधील हजारो वर्षांपासूनची धार आटली

Next
ऑनलाइऩ लोकमत/ किशोर मापारी
 
लोणार, दि. 07 - जागतिक पर्यटन स्थळ लोणार सरोवरातील हजारो वर्षापासून अखंड वाहत असलेला स्वच्छ व शुद्ध गोड पाण्याचा रामगया पाण्याचा झरा गेल्या आटला असून त्या पाठोपाठ अखंड वाहत असलेला पापहरेश्वर तीर्थ पाण्याची धारही आटली आहे. शासनाचे दुर्लक्ष व परिसरात खोदण्यात येत असलेल्या विंधन विहिरींमुळेच झरे आटले असून पर्यावरणप्रेमींनी चिंता व्यक्त केली आहे. 
शासकीय विश्राम गृहापासून सरोवरात पायऱ्यांनी खाली उतरल्यानंतर सुरुवातीलाच हेमाडपंथी पश्चिम मुखी रामगया मंदिर दिसते. तीनद्वार असलेल्या ह्या मंदिरात रामाची मूर्ती असून बाजूलाच श्रीरामेश्वर मंदिर आहे. ह्या मंदिराच्या समोरच रामकुंड बुजलेल्या स्थितीत दिसून येतो. थोडे खाली उतरले की सात वर्षापूर्वी अखंड वाहणारा स्वच्छ व शुद्ध पाण्याचा रामगया नावाने प्रसिद्ध असलेला झरा आटलेला स्थितीत दिसून येतो. जागतिक पर्यटन स्थळ लोणार सरोवर पाहण्यासाठी येणारे  देश-विदेशातील पर्यटक तसेच अनेक शैक्षणिक सहली निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी आल्यानंतर ह्याच मार्गाने सरोवर पाहण्यासाठी उतरत होते . एकेकाळी हजारो पर्यटकांची तहान भागवणारा रामगया झरा आज मात्र स्वत:च पाण्याच्या प्रतीक्षेत व्याकुळलेला दिसून येत आहे . निसर्गाचा आनंद घेण्यासाठी येणारे हजारो पर्यटक रामगया मंदिर परिसरात थांबत होते . झ-यातील पाणी गोड असल्याने ह्याच ठिकाणी पर्यटक मेजवानी करत आणि विसावा घेत .विद्याथी ही ह्याचा झ-यातील पाण्याचा स्वाद घेऊन तहान भागवत सहलीचा आनंद घेत.परंतु अनेकांची तहान भागवणारा रामगया झराच आटला आहे. रामगया झ-याच्या पाठोपाठ गेल्या पापहरेश्वर धारही आटलेली आहे. देशभरातून  अनेक भाविक अस्थी विसर्जन करण्यासाठी येत होते.
त्यानंतर ह्याच ठिकाणी अनेक धार्मिक विधी केल्या जात होते .ह्या धारेचेही पाणी गोड होते. अखंड वाहणारे पापहरेश्वर धार तीर्थ हि गेल्या दोन वर्षापासून आटलेले आहे. पण याबाबतीत प्रशासन मात्र उदासीन भूमिका घेत असून आज पर्यंत पाण्याचे झरे सुरु कसे होतील यावर ठोस निर्णय घेतलेले दिसून येत नाहीत .
 
- जागतिक पर्यटन स्थळ लोणार सरोवर परिसरात बांधकामे तसेच उत्खनन करण्यास बंदी असतानाही अनेक वर्षापासून बांधकामे सुरूच असून सरोवर परिसरात किमान ५०० ते ७०० फुट बोअर घेतले असून दररोज किमान एकतरी ५०० ते ७०० फुट बोअर सरोवर परिसरात घेतला जातो.
 
https://www.dailymotion.com/video/x844v50

Web Title: VIDEO: There has been a trend of thousands of years in the Lonar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.