VIDEO - ख्रिश्चन दफनभूमीची अज्ञातांकडून तोडफोड

By Admin | Published: March 24, 2017 12:14 PM2017-03-24T12:14:27+5:302017-03-24T12:18:54+5:30

 ऑनलाइन लोकमत  ठाणे, दि. 24 - पनवेल महानगर पालिकेतील खांदावसाहतीतील ख्रिश्चन दफनभूमीची अज्ञात व्यक्तींनी तोडफोड केल्याची घटना समोर आली ...

VIDEO - Disagreements with Christian cemetery | VIDEO - ख्रिश्चन दफनभूमीची अज्ञातांकडून तोडफोड

VIDEO - ख्रिश्चन दफनभूमीची अज्ञातांकडून तोडफोड

Next

 ऑनलाइन लोकमत 

ठाणे, दि. 24 - पनवेल महानगर पालिकेतील खांदावसाहतीतील ख्रिश्चन दफनभूमीची अज्ञात व्यक्तींनी तोडफोड केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी येथील ट्रस्टने खांदावसाहत पोलिस स्थानकात तक्रार दाखल केली आहे. ट्रस्टने दफनभूमी शेजारी रहाणा-या अशोक कृष्णाजी पाटील आणि मनिष सुरेश पारकर यांच्यावर तोडफोडीचा आरोप केला आहे. 
 
जेसीबीच्या सहाय्याने थडग्यावरील धार्मिक चिन्ह (क्रॉस) उखडून फेकलेले आढळले. दफनभूमीच्या जागेमध्ये अतिक्रमण केल्याचा आरोप ट्रस्टने केला आहे. अशा कृतीमधून दोन समाजांमध्ये अशांतता आणि तणाव निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात आला. त्यामुळे समाजकंटकांवर तात्काळ कारवाई करावी असे ट्रस्टने पोलिसांना दिलेल्या पत्रात म्हटले आहे. 
https://www.dailymotion.com/video/x844ukd

Web Title: VIDEO - Disagreements with Christian cemetery

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.