कांदा व्यापाºयांच्या अघोषित संपामुळे तीन दिवसांत सव्वाशे कोटींची उलाढाल ठप्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2017 08:16 PM2017-09-16T20:16:33+5:302017-09-16T20:25:54+5:30

कांद्याचा सरासरी ९०० ते १५०० रूपये प्रति क्विंटल भाव पाहता हे नुकसान सुमारे सव्वाशे कोटींच्या घरात असल्याचे सांगण्यात आले.

 For the untimely strike of onion business, the turnover of 300 crores in three days has been postponed | कांदा व्यापाºयांच्या अघोषित संपामुळे तीन दिवसांत सव्वाशे कोटींची उलाढाल ठप्प

कांदा व्यापाºयांच्या अघोषित संपामुळे तीन दिवसांत सव्वाशे कोटींची उलाढाल ठप्प

Next
ठळक मुद्देरब्बी आणि उन्हाळ कांद्याची बाजारातील आवक सामान्यपणे फेब्रुवारी ते एप्रिल दरम्यान होतेसरकारच्या नवीन धोरणामुळे कांदा साठवणुकीवर मर्यादा आली केंद्र सरकारने जिल्हाधिकारी कार्यालयाकडून कांद्याचे भाव व अहवाल मागविला . कांद्याचा सरासरी ९०० ते १५०० रूपये प्रति क्विंटल भाव

नाशिक : आयकर विभागाच्या छाप्यामुळे बाजार समित्यांमधील कांदा व्यापाºयांनी पुकारलेल्या अघोषित संपामुळे तीन दिवसांत सव्वाशे कोटींचे नुकसान झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. नाशिकच्या १४ कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये दिवसाला सरासरी दीडशे ते दोनशे क्ंिवटल कांद्याची आवक होते. कांद्याचा सरासरी ९०० ते १५०० रूपये प्रति क्विंटल भाव पाहता हे नुकसान सुमारे सव्वाशे कोटींच्या घरात असल्याचे सांगण्यात आले.
आवक वाढल्याने आधीच कांद्याचे भाव एका महिन्यात तेराशे रुपयांनी घसरल्याचे चित्र होते. त्यात आता दोन दिवसांपासून संप सुरू असल्याने कांद्याचे भाव आणखी गडगडले आहेत. केंद्र सरकारने जिल्हाधिकारी कार्यालयाकडून कांद्याचे भाव व अहवाल मागविला आहे. मागील महिन्यात २८०० रुपयांपर्यंत क्विंटलला गेलेला भाव एका महिन्याभरातच आवक वाढल्याने चक्क १५०० रुपयापर्यंत गडगडला आहे. मागील महिन्यात कांद्याचे वाढलेले भाव हे कृत्रिम असल्याचा दावा आता करण्यात येत आहे. इजिप्तच्या कांदा निर्यातीची भीती दाखवून कांदा उत्पादकांना एकाच वेळी कांदा बाजारात आणण्यास लावून कांद्याच्या भावात घसरण करण्याचे धोरण काही यंत्रणांकडून केले जात असल्याचा आरोप होतो आहे. त्यात धाडसत्रामुळे व्यापाºयांनी बाजार समित्यांना पत्र देऊन काही दिवसांसाठी लिलावात सहभागी होता येणार नाही, असे कारण दिले आहे. सरकारच्या नवीन धोरणामुळे कांदा साठवणुकीवर मर्यादा आली आहे. या मर्यादेमुळेच आता कांदा व्यापारी कांदा साठवणुकीस तयार नसून, त्यामुळे कांदा खरेदीही करण्यास नाखूश असल्याचे बाजार समितीच्या सूत्रांचे म्हणणे आहे.
रब्बी आणि उन्हाळ कांद्याची बाजारातील आवक सामान्यपणे फेब्रुवारी ते एप्रिल दरम्यान होत असते आणि त्याची साठवणूक केली जाते. साठा केलेला हाच कांदा दिवाळीपर्यंत बाजाराची गरज भागवीत असतो. हे गणित जेव्हा चुकते, तेव्हा ग्राहकपेठेत आगडोंब उसळतो. ग्राहकांना आणि खरे तर मतदारांना चढ्या भावात कांदा खरेदी करणे भाग पडू नये कारण तसे झाले तर ते आपल्या विरोधात जाऊ शकते, यासाठी केंद्राची सारी धडपड असली तरी त्याला भाव पातळी स्थिर राहण्याचे कारण दिले जाते आहे. आता दोन दिवसांपासून बाजार समित्यांमध्ये व्यापाºयांनी पुकारलेल्या अघोषित संपामुळे कांदा उत्पादक वेठीस धरला जात आहे. कांदा उत्पादकांच्या अडवणुकीचे धोरण सरकारच्या धाडसत्राकडे अंगुलीनिर्देश दाखवून व्यापारी यंत्रणा काम करीत असल्याची चर्चा शेतकºयांमध्ये आहे.

Web Title:  For the untimely strike of onion business, the turnover of 300 crores in three days has been postponed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.