विद्यापीठ, महाविद्यालय आणि सीईटी परिक्षांचे वेळापत्रक दोन दिवसांत : उदय सामंत

By ऑनलाइन लोकमत | Published: May 5, 2020 05:15 PM2020-05-05T17:15:45+5:302020-05-05T17:19:13+5:30

एकाही विद्यार्थ्याचे शैक्षणिक नुकसान होणार नसल्याची ग्वाही शिक्षणमंत्र्यांकडून देण्यात आली आहे.

University, college and CET Exam schedule in two days: Uday Samant hrb | विद्यापीठ, महाविद्यालय आणि सीईटी परिक्षांचे वेळापत्रक दोन दिवसांत : उदय सामंत

विद्यापीठ, महाविद्यालय आणि सीईटी परिक्षांचे वेळापत्रक दोन दिवसांत : उदय सामंत

googlenewsNext

मुंबई : विद्यापीठ अनुदान आयोगाच्या मार्गदर्शक सूचनानुसार राज्यातील विद्यापीठ, महाविद्यालय आणि सीईटी परीक्षेचे वेळापत्रक दोन दिवसात जाहीर करण्यात येईल.  एकाही विद्यार्थ्याचे शैक्षणिक नुकसान होणार नाही असे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी सांगितले. 

राज्यातील सर्व कुलगुरूंशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे परीक्षेसंदर्भात नियुक्त केलेल्या  समितीच्या अहवालावर  सविस्तर चर्चा करण्यात आली. सामंत म्हणाले, या समितीचा अहवाल लवकरच राज्य  शासनाला सादर केला जाईल. त्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याशी चर्चा करून अंतिम निर्णय घेण्यात येईल.

बैठकीत पदवी आणि पदवीत्तर शेवटच्या वर्षाच्या परीक्षा दि.१ जुलै ते १५ जुलै राज्य सामाईक प्रवेश परीक्षा CET दिनांक  २० ते ३० जुलै 2020 दरम्यान घेण्यात येतील का आणि या परीक्षांचा निकाल १५ ऑगस्टपर्यंत जाहीर करून दिनांक १ सप्टेंबर २०२० पासून नवीन शैक्षणिक वर्षाची सुरूवात करण्यात येईल का?तसेच लॉकडाऊनचा कालावधी विद्यार्थ्यांसाठी मानवी हजार दिवस  (deemed to be attended) म्हणून ग्राह्य धरण्यात यावा, यावर चर्चा झाली. 
कॅरी फॉरवर्ड योजना लागू करून पुढील वर्गात प्रवेश देण्यात येईल आणि शेवटच्या वर्षाची परीक्षा घेण्यात यावी. एम.फिल व पी.एचडी चा मौखिकी(vivo) व्हिडीओ कॉन्फरन्सिंग च्या माध्यमातून घेण्यात येऊन या विद्यार्थ्यांचा लघुशोधप्रबंध आणि प्रबंध सादर करावयाची मुदत निघून गेली असल्यास त्यांना मुदतवाढ देण्यात येईल का? यावर सविस्तर चर्चा करण्यात आली. परंतु राज्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेऊन यावर अंतिम निर्णय घेण्यात येईल. असेही सामंत यांनी संगितले.

विद्यार्थ्यांसाठी प्रत्येक जिल्ह्यांमध्ये समुपदेशन केंद्राची निर्मिती
राज्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव पाहता प्रत्येक विद्यार्थ्यांसाठी प्रत्येक  जिल्ह्यांमध्ये एक आणि मोठ्या जिल्ह्यांमध्ये दोन समुपदेशन केंद्राची निर्मिती करण्यात यावी. समुपदेशन केंद्राच्या मदतीने संबंधित जिल्ह्यातील पालक आणि विद्यार्थ्यांच्या सर्व अडचणींचे समाधान करण्यात येईल. अशा सूचना सामंत यांनी यावेळी दिल्या. 

सीईटी परीक्षेसंदर्भात समिती गठीत
बारावीनंतर अभियांत्रिकी आणि इतर अभ्यासक्रमांसाठी महाराष्ट्र राज्य सामाईक प्रवेश परीक्षा (CET) घेण्याबाबत  महाराष्ट्र राज्य सामाईक प्रवेश परीक्षा आयुक्त यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करण्यात आली आहे. बारावी नंतर आणि पदव्युत्तर साठी घेण्यात येणाऱ्या सीईटी परीक्षेचे नियोजन संदर्भात सविस्तर चर्चा करण्यात आली. या समितीने सर्व उपाययोजना करून आपले वेळापत्रक तयार करावे.असेही सामंत यांनी संगितले.
 या व्हिडिओ कॉन्फरन्सला उच्च व तंत्र शिक्षण राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे, विभागाचे सचिव सौरभ विजय, संचालक धनराज  माने, तंत्रशिक्षण संचालनालय महाराष्ट्र राज्य संचालक डॉ. अभय वाघ तसेच सर्व विद्यापीठांचे  कुलगुरू सहभागी झाले होते.

महत्वाच्या बातम्या...

दारु विक्रीतून राज्यांना उत्पन्न किती? आकडा पाहूनच 'झिंगाट' व्हाल

चिंता वाढली! आज देशात सर्वाधिक कोरोनाग्रस्तांचा मृत्यू; २४ तासांत ३९०० नवे रुग्ण

 

Web Title: University, college and CET Exam schedule in two days: Uday Samant hrb

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.