कल्याण-शीळ रस्त्यावरील वाहतूक कोंडीवर अंडरपासचा उतारा

By admin | Published: September 27, 2016 07:51 PM2016-09-27T19:51:08+5:302016-09-27T19:51:08+5:30

मएसआरडीसीच्या माध्यमातून अंडरपास करण्याची सूचना कल्याणचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी केली

Underneath the traffic congestion on the Kalyan-Sheel road | कल्याण-शीळ रस्त्यावरील वाहतूक कोंडीवर अंडरपासचा उतारा

कल्याण-शीळ रस्त्यावरील वाहतूक कोंडीवर अंडरपासचा उतारा

Next

ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 27 - कल्याण-शीळ मार्गावर काटई नाक्याजवळ लोढा पलावा येथे क्रॉसिंगमुळे होणाऱ्या वाहतूक कोंडीवर तोडगा म्हणून या ठिकाणी एमएसआरडीसीच्या माध्यमातून अंडरपास करण्याची सूचना कल्याणचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी केली असून सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक वाहतूक) मंत्री आणि ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी तिला तत्वतः मंजुरी देत याबाबतचा प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश एमएसआरडीसीला दिले आहेत.

कल्याण लोकसभा मतदारसंघातील विविध पायाभूत सुविधा प्रकल्पांच्या संदर्भात खा. डॉ. शिंदे यांच्या पुढाकाराने मंगळवारी पालकमंत्री श्री शिंदे यांच्या मंत्रालयातील दालनात एका बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीला कल्याण जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे, आमदार डॉ. बालाजी किणीकर, कल्याण-डोंबिवलीचे महापौर राजेंद्र देवळेकर, उल्हासनगरचे आयुक्त राजेंद्र निंबाळकर, अंबरनाथ नगर परिषद, एम आय डी सी आणि अन्य वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
विविध प्रकल्पांसंदर्भात याप्रसंगी चर्चा झाली.

तसेच कमी खर्चात आणि जलद वेळेत हे प्रकल्प होण्यासाठी शीट पायलिंग पद्धतीचा वापर करण्याबाबत एक सादरीकरण या प्रसंगी करण्यात आले. उल्हासनगरमधील खेमाणी नाल्याचे नदीत मिसळणाऱ्या पाण्यावर प्रक्रिया करण्यासाठी उभारण्यात येणाऱ्या एसटीपी मधील पाणी नंतर नदीत सोडण्यासाठी शीट पायलिंग पद्धतीचा वापर करण्याबाबत, तसेच उल्हास नगर मधील डम्पिंग ग्राऊंडची क्षमता संपल्यामुळे कचऱ्याचे ढीग कधीही कोसळून दुर्घटना घडण्याची शक्यता लक्षात घेऊन शीट पायलिंग पद्धतीने या ढिगाऱ्याभोवती संरक्षक भिंत बंधण्याबाबत चर्चा करण्यात आली. कल्याण-डोंबिवली महापालिका हद्दीतील नाल्यांचे मजबुतीकरण देखील याच पद्धतीने करण्याची सूचना याप्रसंगी खा. डॉ. शिंदे यांनी केली.

शिळ-कल्याण रस्त्यावर एम एस आर डी सी च्या माध्यमातून उन्नत मार्ग बांधला जाणार असाल तरी तोपर्यंत या रस्त्याचे रुंदीकरण करण्यात यावे, अशी मागणी खा. डॉ. शिंदे यांनी यावेळी केली. तसेच, काटई नाक्याजवळ लोढा येथे क्रॉसिंगमुळे होणारी वाहतूककोंडी लक्षात घेऊन तिथे अंडरपास करण्याची मागणीही त्यांनी केली. शीट पायलिंग पद्धतीने हे काम कमी खर्चात आणि वर्षभरात होणार असल्यामुळे याबाबतचा प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश पालकमंत्री श्री शिंदे यांनी दिले. कल्याण येथील खाडी किनाऱ्याच्या सौंदर्यीकरणाबाबतही चर्चा झाली. कल्याणला लाभलेल्या विस्तीर्ण खाडी किनाऱ्याचा विकास करण्यासंदर्भात सविस्तर अहवाल सादर करण्याचे निर्देश पालकमंत्री शिंदे यांनी महापालिकेला दिले.

Web Title: Underneath the traffic congestion on the Kalyan-Sheel road

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.