‘एटीएम’च्या भरणामध्ये दोन कोटींचा अपहार

By admin | Published: July 30, 2015 12:08 AM2015-07-30T00:08:39+5:302015-07-30T00:08:39+5:30

संशयित फरार : रॅकेट शक्य; चार कोटींचा गोलमाल?

Two crore apiece in payment of ATM | ‘एटीएम’च्या भरणामध्ये दोन कोटींचा अपहार

‘एटीएम’च्या भरणामध्ये दोन कोटींचा अपहार

Next

सातारा : एटीएम यंत्रात पैसे भरण्याचे कंत्राट घेतलेल्याच्या कर्मचाऱ्याने तब्बल १ कोटी ९१ लाख ५१ हजार ९०० रुपयांचा अपहार केल्याची खळबळजनक घटना साताऱ्यात घडली असून, संशयित कर्मचारी फरार झाला आहे. दरम्यान, एटीएममध्ये भरणा करताना पैसे ढापणाऱ्यांचे रॅकेटच कार्यरत असून, या टोळक्याने चार कोटींहून अधिक रकमेचा गोलमाल केल्याची चर्चा बँकिंग वर्तुळात रंगली आहे.यासंदर्भात वैभव राजेंद्र साळुंखे (रा. बोरगाव, ता. सातारा) याच्यावर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात
आला असून, त्याला याची कुणकुण लागल्यापासून साळुंखे फरार झाला आहे. त्याचे काही अन्य साथीदार असावेत आणि त्यांनी याच पद्धतीने मोठ-मोठ्या रकमा परस्पर पळविल्या असाव्यात, असा पोलिसांचा कयास आहे. त्यामुळे हा गोलमाल किती दिवसांपासून चालला आहे, यावर या प्रकरणाची व्याप्ती ठरणार आहे. एटीएममध्ये नोटांचा भरणा करण्याचे कंत्राट अजय दिलीप हगवणे (वय २६, रा. पांडेवाडी, ता. वाई) यांना मिळाले आहे. दोन प्रमुख राष्ट्रीयीकृत बँकांच्या
एटीएममध्ये भरणा करताना त्याचा कर्मचारी
असलेल्या वैभव साळुंखेने ‘हाथ की सफाई’ केल्याचे
आढळून आल्यानंतर हगवणे यांनीच त्याच्याविरुद्ध फिर्याद दाखल केली आहे.
या प्रकरणात जितकी रक्कम एटीएममध्ये भरणा करायची आहे तेवढी न करता कमी रक्कम भरणा केल्याचे आढळून आले असून, काहीवेळा रक्कम अजिबातच जमा न केल्याचे निदर्शनास आले आहे. ही गोष्ट बँकांच्या लक्षात आल्यानंतर या प्रकरणास वाचा फुटली.
साळुंखे याने पासवर्डमध्ये फेरफार करून हा सगळा गोलमाल केला असावा, असा पोलिसांना संशय आहे. एटीएममध्ये पैसे भरणाऱ्या कर्मचाऱ्यानेच एवढा मोठा अपहार केल्याने बँकिंग क्षेत्रात प्रचंड खळबळ उडाली आहे. (प्रतिनिधी)

शोधासाठी पथक तैनात
वैभव साळुंखे याच्या शोधासाठी शहर पोलिसांनी दोन पथके तयार केली असून, ही पथके ठिकठिकाणी पाठविण्यात आली असल्याची माहिती पोलिसांनी दिली. साळुंखेला पकडल्यानंतरच या प्रकरणातील बरीच काही माहिती मिळू शकेल, असे पोलिसांचे म्हणणे आहे.

Web Title: Two crore apiece in payment of ATM

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.