मालेगाव-मनमाड रस्त्यावर आगपेटी भरलेल्या ट्रकला आग

By ऑनलाइन लोकमत | Published: December 17, 2017 11:57 AM2017-12-17T11:57:43+5:302017-12-17T11:59:27+5:30

मालेगाव-मनमाड रस्त्यावर  जळगाव चोंडी दरम्यान सकाळी साडेसहा वाजता आगपेटी भरलेल्या ट्रकला अचानक आग लागल्याने जळून खाक झाली. मनपाच्या चार बंबाच्या सहाय्याने आग आटोक्यात आणली. सुदैवाने कुठलीही जीवीत हानी झाली नाही. 

Truck fire filled with matchboxes on Malegaon-Manmad road | मालेगाव-मनमाड रस्त्यावर आगपेटी भरलेल्या ट्रकला आग

मालेगाव-मनमाड रस्त्यावर आगपेटी भरलेल्या ट्रकला आग

googlenewsNext

 नाशिक - मालेगाव-मनमाड रस्त्यावर  जळगाव चोंडी दरम्यान सकाळी साडेसहा वाजता आगपेटी भरलेल्या ट्रकला अचानक आग लागल्याने जळून खाक झाली. मनपाच्या चार बंबाच्या सहाय्याने आग आटोक्यात आणली. सुदैवाने कुठलीही जीवीत हानी झाली नाही. 
ट्रक क्रमांक टि. एन. 34 डब्ल्यू 4786 हा तामिळनाडू येथुन जयपुर येथे आगपेटी भरुन जात असतांना सकाळी साडेसहा वाजता मालेगाव तालुक्यातील जळगाव चोंडी दरम्यान अचानक आग लागली. याची माहिती जवळील पेट्रोल पंप चालकास कळताच त्यांनी तालुका पोलीसांना दिली. तालुका पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक सतिश गावित सदर माहिती मनपाच्या अग्निशमन दलास देत घटनास्थळी धाव घेतली. मनपाच्या चार बंबाच्या सहाय्याने आग आटोक्यात आणली. परंतु मालेगाव पासुन घटनास्थळ लांब असल्याने बंबांना वेळ लागल्याने व गाडीत आगपेटी असल्याने आगीने अवघ्या काही वेळातच रौद्ररूप धारण करून ट्रक आपल्या कवेत घेतला. त्यामुळे ट्रक पुर्णपणे जळुन खाक झाला आहे. सुदैवाने ट्रक चालकाने प्रसंगावधान राखून सहकाऱ्यांसह पळ काढल्याने जीवीत हानी टळली. उपविभागीय पोलीस अधिकारी शशिकांत शिंदे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.

Web Title: Truck fire filled with matchboxes on Malegaon-Manmad road

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.