शस्त्रक्रियेविनाही गर्भाशयाच्या कर्करोगावर उपचार शक्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 12, 2018 05:28 AM2018-03-12T05:28:51+5:302018-03-12T05:28:51+5:30

गर्भाशयाच्या कर्करोगावरील उपचारांबाबत टाटा मेमेरिअल रुग्णालयाने महत्त्वाचे संशोधन केले आहे. त्यानुसार, या उपचारांकरिता अपवादात्मक प्रकरणांमध्ये शस्त्रक्रियेची गरज नसल्याचे तज्ज्ञांनी म्हटले आहे.

 Treatment of uterine cancer without surgery possible | शस्त्रक्रियेविनाही गर्भाशयाच्या कर्करोगावर उपचार शक्य

शस्त्रक्रियेविनाही गर्भाशयाच्या कर्करोगावर उपचार शक्य

Next

मुंबई  - गर्भाशयाच्या कर्करोगावरील उपचारांबाबत टाटा मेमेरिअल रुग्णालयाने महत्त्वाचे संशोधन केले आहे. त्यानुसार, या उपचारांकरिता अपवादात्मक प्रकरणांमध्ये शस्त्रक्रियेची गरज नसल्याचे तज्ज्ञांनी म्हटले आहे. या संशोधनाविषयी नुकताच एक अहवाल तज्ज्ञांनी सादर केला आहे.
टाटा रुग्णालयातील तज्ज्ञांनी उपचारांकरिता रुग्णालयात दाखल होणाºया महिला रुग्णांच्या केसस्टडीचा अभ्यास केला. त्यात असे दिसले की, स्टेज-२ पर्यंतच्या कर्करोगांच्या प्रकरणांत केमोथेरपी आणि नंतर त्याचसोबत रेडिएशन या पद्धतीचा वापर करून रुग्णावर चांगल्या पद्धतीने उपचार केले जातात. पहिल्यांदाच डॉक्टरांनी संशोधनासाठी या दोन वेगवेगळ्या उपचार पद्धतींचा एकत्रित अभ्यास केला. डॉ. श्याम श्रीवास्तव आणि डॉ. उमेश महानशेट्टी यांनीदेखील जामा आॅन्कोलॉजी या जर्नलमध्ये आपल्या संशोधनाबाबत माहिती दिली आहे.
संशोधनाविषयी टाटा रुग्णालयाच्या डॉ. सुदीप गुप्ता यांनी सांगितले की, गर्भाशयाच्या कर्करोगावर कोणत्या पद्धतीने उपचार करावेत, याबाबत डॉक्टरांमध्ये मत-मतांतरे आहेत. काही डॉक्टर केमोथेरपी आणि रेडिएशन पद्धतीवर भर देतात, तर काही डॉक्टर केमोथेरपी आणि शस्त्रक्रिया या पद्धतीवर विश्वास ठेवतात. पण कोणत्या पद्धतीमुळे रुग्णांना सर्वात जास्त लाभ मिळेल. याबाबत काहीच निश्चित नाही.

Web Title:  Treatment of uterine cancer without surgery possible

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.