मुंबई-पुणे महामार्गावर ट्रॅफिक ब्लॉक, आज दुपारी दोन तास वाहतूक बंद राहणार 

By ऑनलाइन लोकमत | Published: July 24, 2023 10:34 AM2023-07-24T10:34:00+5:302023-07-24T10:44:55+5:30

Mumbai-Pune Expressway: मुंबई-पुणे महामार्गावर आडोशी येथे बोगद्याजवळ दरड कोसळ्याने चिखल आणि माती ही महामार्गावरील मुंबईकडे जाणाऱ्या लेनवर आही होती

Traffic block on Mumbai-Pune Expressway, traffic will be closed for two hours today afternoon | मुंबई-पुणे महामार्गावर ट्रॅफिक ब्लॉक, आज दुपारी दोन तास वाहतूक बंद राहणार 

मुंबई-पुणे महामार्गावर ट्रॅफिक ब्लॉक, आज दुपारी दोन तास वाहतूक बंद राहणार 

googlenewsNext

मुंबई-पुणे महामार्गावरील मुंबईकडे येणारी वाहतूक आज दुपारी दोन तासांसाठी बंद ठेवण्यात येणार आहे. मुंबई-पुणे महामार्गावर आडोशी येथे बोगद्याजवळ दरड कोसळ्याने चिखल आणि माती ही महामार्गावरील मुंबईकडे जाणाऱ्या लेनवर आही होती. त्यामुळे या मार्गावरून मुंबईकडे येणारी वाहतूक बंद ठेवण्यात आली होती. दरम्यान, ही दगड आणि माती हटवण्यासाठी आज दुपारी १२ ते २ या वेळेत मुंबई पुणे महामार्गावर दोन तासांचा ट्रॅफिक ब्लॉक घेण्यात येणार आहे.

मुंबई पुणे  महामार्गावर घेण्यात येणाऱ्या या ट्रॅफिक ब्लॉकच्या काळात दुपारी १२ ते २ या वेळेत पुण्याहून मुंबईकडे येणारी वाहतूक ही बंद ठेवण्यात येणार आहे. तसेच या काळात पर्यायी वाहतूक ही जुन्या मुंबई-पुणे महामार्गावरून वळवण्यात येणार आहे.

दरम्यान, काल रात्री मुंबई-पुणे महामार्गावरील आडोशी बोगद्याजवळ दरड कोसळली होती. त्यामुळे मुंबईकडे जाणाऱ्या तिन्ही लेनवरील वाहतूक बंद करण्यात आली होती. सुदैवाने दरड कोसळली तेव्हा तिथून कुठलेही वाहन जात नव्हते, त्यामुळे मोठी दुर्घटना टळली. 

Web Title: Traffic block on Mumbai-Pune Expressway, traffic will be closed for two hours today afternoon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.