एसटी भरतीसाठी अर्ज करण्याचा आज शेवटचा दिवस

By ऑनलाइन लोकमत | Published: February 15, 2019 02:14 AM2019-02-15T02:14:53+5:302019-02-15T02:15:30+5:30

एसटी महामंडळाने सुरू केलेल्या चालक व वाहक पदाच्या भरतीमधील ८ हजार ०२२ जागांसाठी अर्ज करण्याची मुदत शुक्रवारी संपणार आहे. महामंडळाने दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी सायंकाळपर्यंत एकूण ३६,६८९ अर्ज दाखल झाले होते.

 Today is the last day to apply for ST recruitment | एसटी भरतीसाठी अर्ज करण्याचा आज शेवटचा दिवस

एसटी भरतीसाठी अर्ज करण्याचा आज शेवटचा दिवस

मुंबई : एसटी महामंडळाने सुरू केलेल्या चालक व वाहक पदाच्या भरतीमधील ८ हजार ०२२ जागांसाठी अर्ज करण्याची मुदत शुक्रवारी संपणार आहे. महामंडळाने दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी सायंकाळपर्यंत एकूण ३६,६८९ अर्ज दाखल झाले होते. दरम्यान, महिलांसाठी राखीव २,४०६ जागांसाठी केवळ ५९७ अर्ज आल्याची माहिती आहे.
पुरुष उमेदवारांसाठी अवजड वाहन चालविण्याच्या अनुभवाची अट ३ वर्षांऐवजी १ वर्षापर्यंत शिथिल करण्यात आली आहे. अवजड वाहन चालविण्याचा ३ वर्षांचा अनुभव असलेले पुरेसे उमेदवार मिळत नसल्याचे मागील भरती प्रक्रियेत दिसून आले होते. त्यामुळे ही अट शिथिल केल्याचे महामंडळाने स्पष्ट केले. त्याला चांगला प्रतिसाद मिळत असून अनुसूचित जमातीच्या ६८५ जागांसाठी गुरुवारपर्यंत १,७७२ अर्ज आले आहेत.

Web Title:  Today is the last day to apply for ST recruitment

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.