देशद्रोहींना अभय देणाऱ्यांना सत्तेतून खेचा- अशोक चव्हाण

By ऑनलाइन लोकमत | Published: January 27, 2019 04:49 AM2019-01-27T04:49:51+5:302019-01-27T04:50:17+5:30

युती सरकारवर टीका, ठाण्यासह कल्याणातही जाहीर सभा

Throwing Abhahans from the Power to the Deshars - Ashok Chavan | देशद्रोहींना अभय देणाऱ्यांना सत्तेतून खेचा- अशोक चव्हाण

देशद्रोहींना अभय देणाऱ्यांना सत्तेतून खेचा- अशोक चव्हाण

Next

कल्याण : शिवसेना-भाजपाचा कारभार म्हणजे आतून कीर्तन आणि बाहेरून तमाशा असा सुरू आहे. त्यामुळे सामान्य माणूस त्रस्त झाला आहे. एकीकडे बॉम्ब बनविणारे पकडले जातात तर दुसरीकडे सनातन संस्थेची पाठराखण करण्याचे काम सरकार करीत आहे. अशा देशद्रोहींना अभय देणाऱ्या सरकारला सत्तेवरून खाली खेचा, असे आवाहन माजी मुख्यमंत्री, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी गुरुवारी केले.

काँग्रेसच्या जनसंघर्ष यात्रेच्या कल्याण येथील सभेत चव्हाण यांनी बोलत होते. यावेळी विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, प्रदेश प्रवक्ते सचिन सावंत, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सचिन पोटे आदी उपस्थित होते. कल्याण-डोंबिवलीतही गुंडगिरी वाढली आहे. धनंजय कुलकर्णीकडे मोठा शस्त्रसाठा सापडला. समाजात तेढ निर्माण करण्याचे काम सरकारकडून सुरू असल्याचा आरोप यावेळी विखे पाटील यांनी केला.
तत्पूर्वी प्रमुख वक्ते सभेच्या ठिकाणी यायच्या आधी व्यासपीठावर लावलेल्या बॅनरवरून झालेल्या वादात प्रकाश मुथा आणि संजय दत्त गट आमनेसामने आले.

‘छत्रपतींची उंची गाठण्यासाठी सात जन्म घ्यावे लागतील’
ठाणे: पाच वर्षांत काहीच न केलेल्या सरकारने फक्त पेपरमध्ये मोठ-मोठ्या जाहिराती केल्या. ‘लेकर छत्रपती शिवाजी का नाम, चले चलो मोदी के साथ’ या जाहिरातीतून मोदी छत्रपती शिवाजी महाराजांशी स्व:तशी तुलना क रतात, हे चुकीचे आहे. भाजपाला विनाश काले विपरीत बुध्दी सुचली आहे. ते आता शिवाजी महाराज आणि मोदींची तुलना करण्याचे काम करीत आहेत. पण, शिवाजी महाराजांची उंची गाठण्यासाठी मोदींना अजून सात जन्म घ्यावे लागतील, अशा शब्दात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष व खासदार अशोक चव्हाण यांनी जनसंघर्ष यात्रेनिमित्त शुक्रवारी ठाण्यात झालेल्या जाहीर सभेत टीका केली.

ठाणे जिल्हा शहर कॉँग्रेस कमिटीच्या वतीने राबोडीत जनसंघर्ष यात्रा व जाहिर सभा आयोजित करण्यात आली होती. यावेळी चव्हाण यांनी भाजपा आणि शिवसेनेवर जोरदार टिका केली. काँग्रेस कार्यकर्त्यांना लोकांपर्यंत पोहोचण्याचे आवाहन त्यांनी केले. याप्रसंगी काँग्रेसचे कोकण प्रभारी बी.एस. संदीप, खासदार हुसने दलवाई, प्रवक्ते सचिन सावंत, माजी आमदार मुझफ्फर हुसेन, शहराध्यक्ष मनोज शिंदे,आयोजक रविंद्र आंग्रे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

दरम्यान, कल्याण येथे पार पडलेल्या काँग्रेसच्या सभेमध्ये कल्याण ग्रामीण मतदारसंघाचे माजी आमदार रमेश पाटील यांनी पुन्हा काँग्रेसमध्ये प्रवेश केला. ते २00९ च्या निवडणुकीवेळी मनसेत, तर त्यानंतर भाजपामध्येही प्रवेश केला होता.

Web Title: Throwing Abhahans from the Power to the Deshars - Ashok Chavan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.