हवे साडेपाच हजार कोटी !

By admin | Published: November 27, 2014 01:52 AM2014-11-27T01:52:05+5:302014-11-27T01:52:05+5:30

निसर्ग कोपल्याने मराठवाडय़ातील तब्बल 48 लाख हेक्टर क्षेत्रवरील खरिपाचे पीक हातून गेले. लागवडही निघाली नाही. पाऊसच न झाल्याने रबी घेण्याचीही सोय राहिली नाही.

Thousands of thousands of crores! | हवे साडेपाच हजार कोटी !

हवे साडेपाच हजार कोटी !

Next
मराठवाडय़ातील दुष्काळ निवारण : 48 लाख हेक्टरवरील खरिपाचे नुकसान
सुनील कच्छवे - औरंगाबाद
निसर्ग कोपल्याने मराठवाडय़ातील तब्बल 48 लाख हेक्टर क्षेत्रवरील खरिपाचे पीक हातून गेले. लागवडही निघाली नाही. पाऊसच न झाल्याने रबी घेण्याचीही सोय राहिली नाही.  मराठवाडय़ाला या दुष्काळातून बाहेर काढण्यासाठी साडेपाच हजार कोटी रुपयांची गरज आहे. 
 महसूल खात्याने नुकतीच विभागातील 8139 गावांची खरीप हंगामाची सुधारित पैसेवारी जाहीर केली. यातील 8क्क्4 गावांची पैसेवारी पन्नासपेक्षा कमी आली आहे. या आकडेवारीने मराठवाडय़ाच्या दुष्काळावर शिक्कामोर्तब केले आहे. मराठवाडय़ात वार्षिक सरासरीच्या 53 टक्केच पाऊस झाला. त्यामुळे कापूस, सोयाबीन, मका पिकाचे उत्पादन 7क् टक्क्यांनी घटले. विभागात यावर्षी 5क् लाख हेक्टरवर खरिपाची पेरणी झाली.  त्यापैकी 48 लाख हेक्टरवरील पीक हातचे गेले. जमिनीत ओल नसल्यामुळे रबीचाही पेरा होऊ शकलेला नाही. खरीप आणि रबी अशी दोन्ही पिके गेल्यामुळे शेतक:याच्या हातात काहीच राहिले नाही. भूजल पातळीत मोठी घट झाल्याने शेकडो गावांमध्ये आतापासून तीव्र पाणीटंचाई जाणवू लागली आहे.  महसूल विभागाच्या टंचाई निवारण कृती आराखडय़ानुसार मार्चअखेर्पयत सव्वा दोनशे कोटी लागणार असल्याचा अंदाज आहे. मार्चनंतर टंचाई परिस्थिती अधिकच गंभीर होणार आहे. त्यामुळे एप्रिल आणि मे महिन्यातही सुमारे अडीचशे कोटी रुपयांचा खर्च होण्याचा अंदाज आहे.
गारपीटग्रस्तांप्रमाणो निधी दिल्यास ़़़
यावर्षी झालेल्या गारपिटीमुळे 8 लाख 31 हजार हेक्टर क्षेत्रचे नुकसान झाले होत़े तेव्हा राज्य सरकारने 934 कोटी रुपयांची मदत दिली होती़ तर सध्या मराठवाडय़ात 48 लाख हेक्टरवरील खरिपाचे पीक हातचे गेले आह़े गारपीटग्रस्तांना मदत केली त्याप्रमाणो आर्थिक निकष ग्रा धरल्यास मराठवाडय़ाला दुष्काळ निवारणार्थ साडे पाच हजार कोटी रुपयांची गरज आह़े 
जनावरांचेही हाल
खरिपाचे नुकसान आणि रबीचा अत्यल्प पेरा यामुळे विभागात चारा टंचाईचे संकट घोंघावत आहे. मराठवाडय़ात एकूण 39 लाख 12 हजार मोठी आणि 12 लाख 51 हजार छोटी अशी जनावरे आहेत. या जनावरांना दरमहा 11.5 लाख मेट्रिक टन चारा लागतो. सध्याचा उपलब्ध चारा फेब्रुवारीर्पयतच पुरणार आहे. 
 
आघाडीकडून अडीच हजार कोटींची मदत
सातत्याने नैसर्गिक संकटात सापडलेल्या मराठवाडय़ातील शेतक:यांना गेल्या दोन वर्षात आघाडी सरकारकडून अडीच हजार कोटी रुपयांची मदत देण्यात आली. 2क्11 ला कापूस, सोयाबीन आणि धान पिकाचे नुकसान झाल्यामुळे 843 कोटी, 2क्13 मध्ये खरीप पिकाच्या नुकसानीपोटी 556 कोटी, त्यानंतर अतिवृष्टीमुळे 1क्1 कोटी आणि चालू वर्षी फेब्रुवारी- मार्च महिन्यांत झालेल्या गारपिटीचे नुकसानभरपाई म्हणून 934 कोटींची मदत देण्यात आली.  
 
मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत आज बैठक
विभागीय आयुक्त कार्यालयात गुरुवारी दुपारी 3 वाजता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत होणार आहे.  या वेळी महसूलमंत्री एकनाथ खडसे, जलसंधारणमंत्री पंकजा मुंडे तसेच राज्याचे मुख्य सचिव, तसेच कृषी, महसूल, पाणीपुरवठा आणि मदत व पुनर्वसन या विभागांचे प्रधान सचिव तसेच मराठवाडय़ातील विविध खात्यांचे प्रमुख अधिकारी उपस्थित राहणार आहेत. या बैठकीनंतर दुपारी 4 वाजता मुख्यमंत्री विभागातील आमदारांशी चर्चा करणार आहेत.

 

Web Title: Thousands of thousands of crores!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.