‘विधि’चे हजारो विद्यार्थी नापास, अजूनही ७ निकाल बाकीच! : पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या प्रवेशाची चिंता वाढली  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 14, 2017 05:07 AM2017-09-14T05:07:28+5:302017-09-14T05:07:57+5:30

सप्टेंबर महिना उजाडूनही, मुंबई विद्यापीठाकडून उत्तरपत्रिका तपासणी सुरू असून, अजूनही ७ निकाल जाहीर झालेले नाहीत. उत्तरपत्रिका एका गठ्ठ्यातून दुस-या गठ्ठ्यात गेल्याने, पुढचे निकाल लावण्यास विद्यापीठाला विलंब होत आहे, तर दुसरीकडे निकाल लागलेल्या विद्यार्थ्यांचेही हाल सुरू आहेत. कारण विधि अभ्यासक्रमाचे निकाल जाहीर झाले असले, तरी हजारो विद्यार्थी ‘पुराव्याचा कायदा’ या विषयात नापास झाल्याने, पदव्युत्तर अभ्यासक्रम प्रवेशाचा प्रश्न उद्भवला आहे.

 Thousands of 'law' students disapproved, still 7 out of them! : Anxiety worried for admission to the post graduate course | ‘विधि’चे हजारो विद्यार्थी नापास, अजूनही ७ निकाल बाकीच! : पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या प्रवेशाची चिंता वाढली  

‘विधि’चे हजारो विद्यार्थी नापास, अजूनही ७ निकाल बाकीच! : पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या प्रवेशाची चिंता वाढली  

Next

 मुंबई : सप्टेंबर महिना उजाडूनही, मुंबई विद्यापीठाकडून उत्तरपत्रिका तपासणी सुरू असून, अजूनही ७ निकाल जाहीर झालेले नाहीत. उत्तरपत्रिका एका गठ्ठ्यातून दुसºया गठ्ठ्यात गेल्याने, पुढचे निकाल लावण्यास विद्यापीठाला विलंब होत आहे, तर दुसरीकडे निकाल लागलेल्या विद्यार्थ्यांचेही हाल सुरू आहेत. कारण विधि अभ्यासक्रमाचे निकाल जाहीर झाले असले, तरी हजारो विद्यार्थी ‘पुराव्याचा कायदा’ या विषयात नापास झाल्याने, पदव्युत्तर अभ्यासक्रम प्रवेशाचा प्रश्न उद्भवला आहे.
विधि अभ्यासक्रमाच्या तीन व पाच वर्षे अभ्यासक्रमांतील ‘पुराव्याचा कायदा’ या विषयात हजारो विद्यार्थी नापास झाले आहेत. विशेष म्हणजे, इतर विषयांत विद्यार्थ्यांना ५० ते ६० गुण मिळाले असताना, एकाच विषयात १०, १५ ते २५, ३० असे गुण देण्यात आले आहेत. यामध्ये गेल्या परीक्षेतील टॉपर्स असलेले विद्याथीर्ही नापास झाले आहेत. त्यामुळे हा प्रकार संशयास्पद असल्याचे मत, स्टुडंट लॉ कौन्सिचे अध्यक्ष सचिन पवार यांनी व्यक्त केले.
विधि अभ्यासक्रमाचे निकाल लागल्यापासून गोंधळ सुरूच आहे. विधि अभ्यासक्रमाच्या पदव्युत्तर अभ्यासक्रमाला प्रवेश घेण्याची मुदत १६ सप्टेंबरला संपत आहे, पण एकाच विषयात विद्यार्थी नापास झाल्यामुळे, आता या विद्यार्थ्यांना प्रवेश मिळणार की नाही, असा प्रश्न निर्माण झाला आहे. विद्यार्थ्यांना प्रवेश मिळावा, यासाठी फेरतपासणी व्हावी, या मागणीने आता जोर धरला आहे. त्यातच अजूनही ७ निकाल लागणे बाकी असून, आता उत्तरपत्रिका तपासणीचा वेगही मंदावला आहे. त्यामुळे आता निकाल लागणार कधी, पुढील प्रवेशाचे काय, अशी चिंता विद्यार्थ्यांना सतावत आहे.

प्राचार्यांचे परीक्षा नियंत्रकांना पत्र
आॅनलाइन उत्तरपत्रिका तपासणीचा फटका सर्वच अभ्यासक्रमांना बसला आहे. त्यातही विधि अभ्यासक्रमाचे घाईघाईत लावलेल्या निकाचा फटका शासकीय विधि महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनाही बसला आहे. शासकीय महाविद्यालयातील ४५० पैकी तब्बल १११ विद्यार्थी हे संबंधित एकाच विषयात नापास झाले आहेत. त्यामुळे प्राचार्यांनी विद्यापीठाच्या परीक्षा नियंत्रकांना पत्र लिहून ही बाब लक्षात आणून दिली आहे. याबाबत विद्यार्थ्यांच्या हिताचा निर्णय घेण्याची मागणी त्यांनी केली आहे.

आॅनलाइन उत्तरपत्रिका तपासणीमुळे विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. एलएलएम अभ्यासक्रमाला प्रवेश मिळविण्यासाठी अनिवार्य असलेल्या सीईटीत विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत, पण विधिच्या पदवी अभ्यासक्रमात नापास झाले आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी उत्तरपत्रिकांची फेरतपासणी करावी. ही प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत विद्यार्थ्यांना एलएलएम अभ्यासक्रमासाठी तात्पुरता प्रवेश द्यावा. या संदर्भात प्रभारी कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांनी पत्र दिले आहे.
- सचिन पवार, अध्यक्ष स्टुडंट लॉ कौन्सिल

Web Title:  Thousands of 'law' students disapproved, still 7 out of them! : Anxiety worried for admission to the post graduate course

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.