"निजामशाही आणि इंग्रजांनी केली नसेल इतकी दडपशाही गरिब मराठ्यांवर हे सरकार करतंय"

By ऑनलाइन लोकमत | Published: March 5, 2024 12:50 PM2024-03-05T12:50:57+5:302024-03-05T12:51:25+5:30

गोरगरिब मराठ्याने पोस्ट टाकली, गुन्हे दाखल करायचे. दबाव, दडपशाही कितीही टाकली तरी एक इंचही मराठे मागे हटत नाहीत असं मनोज जरांगे म्हणाले.

"This government is oppressing the poor Maratha more than the Nizamshahi and the British did" - Manoj Jarange Patil | "निजामशाही आणि इंग्रजांनी केली नसेल इतकी दडपशाही गरिब मराठ्यांवर हे सरकार करतंय"

"निजामशाही आणि इंग्रजांनी केली नसेल इतकी दडपशाही गरिब मराठ्यांवर हे सरकार करतंय"

बीड - Manoj Jarange Patil on Government ( Marathi News ) ओबीसीतून आरक्षण आणि सगेसोयरे या अधिसूचनेची अंमलबजावणी यासाठी गेल्या ६ महिन्यापासून संघर्ष सुरू आहे. आतापर्यंत सरकारने त्या मागण्या पूर्ण केल्या नाहीत. सत्तेचा गैरवापर करून मराठ्यांवर दडपशाही सुरू आहे. सरकार जाणुनबुजून जे निजामशाही, इंग्रजांनीही केली नव्हती त्यापेक्षा जास्त सत्तेचा गैरवापर गोरगरिब मराठ्यांवर करायला लागलेत. मराठे मागे हटणार नाही अशी घणाघाती टीका मनोज जरांगे पाटील यांनी सरकारवर केली. 

बीड येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत मनोज जरांगे पाटील म्हणाले की, जसजसं मराठ्यांवर दडपशाही, दहशत निर्माण होत आहे. त्यामुळे पूर्वीपेक्षाही ताकदीने लोक यायला लागलेत. माझ्या फक्त बैठकीला ४०-५० हजारापेक्षा कमी लोक नाहीत. सरकारनं दिवसाढवळ्या फसवणूक आणि धुळफेक केली. त्यामुळे मराठा समाज ताकदीने पेटून उठला आहे.  आम्ही आणखी काही दिवस किती अन्याय करतायेत हे बघतोय. चौकशी सुरू आहे की नाही याची माहिती नाही. माझ्याकडे कुणी आले नाही. मी बाहेर आलोय, कदाचित चौकशी अहवाल तयार झाला असेल. मला अटक करणार हे एकाने सांगितले. मराठा आणि सत्तेच्या मधला मी काटा आहे त्यामुळे हा काटा काढल्याशिवाय पर्याय नाही असं सरकारला वाटते असा आरोप त्यांनी केला. 

तसेच माझ्याविरोधात अहवाल तयार झाला आहे. आम्ही न टिकणारे १० टक्के आरक्षण घेत नाही म्हणून गुन्हा नोंदवले जातायेत. सरकारने दिलेले आरक्षण टिकणार नाही. ओबीसीतून आरक्षण घेतल्याशिवाय मागे हटणार नाही. तुम्हाला मराठा काय आहे हे थोडं थांबा, दिसेल. माझा मालक समाज आहे. मुलगा म्हणून मी काम करतोय. सगळे बरबटलेले आहेत, त्यामुळे मातब्बर कोण आहे? मराठा समाज हजारोने उमेदवारी अर्ज भरणार आहे. शेवटी मराठ्यांनी डाव टाकलाच असं सांगत जरांगेंनी लोकसभा मतदारसंघात शेकडो उमेदवारी अर्ज दाखल करण्याबाबत भाष्य केले आहे. 

दरम्यान, माझा अधिकार हिसकावून घ्यायला लागलेत. ज्यावेळी माणूस धुंदीत असतो तेव्हा काय करतो हे लक्षात येत नाही. गोरगरिब मराठ्याने पोस्ट टाकली, गुन्हे दाखल करायचे. दबाव, दडपशाही कितीही टाकली तरी एक इंचही मराठे मागे हटत नाहीत. राज्यभरात बैठक घेतोय. पण बैठकीला हजारो, लाखो मराठे येतायेत. आमच्यावर खोटे गुन्हे दाखल करतायेत. मराठ्यांच्या लेकरांसाठी ते घ्यायला तयार आहे. मी समाजासाठी जीवाची बाजी लावतोय. आम्ही रुपयाही देऊ शकलो नाही तरीही लोकांच्या मनात खोलवर रुजलोय असंही जरांगे पाटील म्हणाले. 

Web Title: "This government is oppressing the poor Maratha more than the Nizamshahi and the British did" - Manoj Jarange Patil

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.