शनिचौथरा प्रवेशावर तोडगा नाहीच

By admin | Published: February 8, 2016 04:38 AM2016-02-08T04:38:55+5:302016-02-08T04:38:55+5:30

शनिशिंगणापूर येथील मंदिरातील महिला प्रवेशाच्या वादावर पुण्यातील रविवारच्या बैठकीतही तोडगा निघू शकला नाही. देवस्थान, ग्रामस्थ, भूमाता मंच त्यांच्या भूमिकांवर ठाम राहिल्याने

There is no settlement at Saturn | शनिचौथरा प्रवेशावर तोडगा नाहीच

शनिचौथरा प्रवेशावर तोडगा नाहीच

Next

पिंपरी : शनिशिंगणापूर येथील मंदिरातील महिला प्रवेशाच्या वादावर पुण्यातील रविवारच्या बैठकीतही तोडगा निघू शकला नाही. देवस्थान, ग्रामस्थ, भूमाता मंच त्यांच्या भूमिकांवर ठाम राहिल्याने आर्ट आॅफ लिव्हिंगचे प्रणेते श्री श्री रविशंकर यांची शिष्टाई असफल ठरली.
गैरसमजामुळे वाद वाढला. देवदर्शनात स्त्री-पुरुष समानता असायलाच हवी. तिरूपती येथील बालाजी आणि जगन्नाथ मंदिराप्रमाणे महिला आणि पुरुषांना ३ फुटांवरून दर्शन द्यावे, असा पर्याय रविशंकर यांनी सुचविला. तो देवस्थान आणि ग्रामस्थांनी मान्य केला, मात्र भूमाता ब्रिगेडने तो अमान्य केला. पुण्यात बालेवाडीत झालेल्या बैठकीस श्री श्री रविशंकर, देवगड देवस्थानाचे प्रमुख भास्करगिरी महाराज, शनी देवस्थानच्या अध्यक्षा अनिता शेटे, सरपंच बाळासाहेब बानकर, शनिदेव बचाव कृती समितीचे अध्यक्ष संभाजी दहातोंडे, साईराम बानकर, भूमाता ब्रिगेडच्या प्रमुख तृप्ती देसाई आदी उपस्थित होते. श्री श्री रविशंकर यांची भावना चांगली आहे. मात्र, पर्याय काढायचाच असेल तर एकदा मुख्यमंत्री, रविशंकर महाराज, महिलांच्या हस्ते पूजा करावी. त्यानंतर पर्यायाची अंमलबजावणी करावी, असे भूमाता ब्रिगेडच्या देसाई यांनी सांगितले. रूढी परंपरा खंडित करणे खपवून घेतले जाणार नाही. चौथऱ्यावर महिलांना प्रवेश देण्यास विरोधच आहे. मुख्यमंत्र्यांनीही तोडगा न काढल्यास न्यायालयीन लढा देण्यात येईल, असा इशारा शनिदेव बचाव कृती समितीचे अध्यक्ष संभाजी दहातोंडे यांनी दिला. (प्रतिनिधी)मंदिरांमध्ये देवदर्शनासाठी भेदभाव नसावा, या मताचा मी आहे. भविष्यात महिला पुजारी उपलब्ध झाल्यास त्यांच्या हातून पूजा करण्यासही कोणाचा विरोध नसावा. मात्र शनिदेवाचा चौथरा छोटा असल्याने तीन फुटांवरून दर्शन घ्यावे.- श्री श्री रविशंकर, आध्यात्मिक गुरू

Web Title: There is no settlement at Saturn

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.