मुंबईतून एकही हिरे उद्योग सुरतला नाही; फडणवीस यांचे विधानसभेत विरोधकांच्या आरोपांना उत्तर

By ऑनलाइन लोकमत | Published: December 21, 2023 06:40 AM2023-12-21T06:40:30+5:302023-12-21T06:40:40+5:30

मुंबईतील हिरे व्यापार गुजरातला पळवल्याचा आरोप विरोधकांनी केला होता.

There is no diamond industry from Mumbai to Surat; Fadnavis's reply to the opposition's allegations in the Assembly | मुंबईतून एकही हिरे उद्योग सुरतला नाही; फडणवीस यांचे विधानसभेत विरोधकांच्या आरोपांना उत्तर

मुंबईतून एकही हिरे उद्योग सुरतला नाही; फडणवीस यांचे विधानसभेत विरोधकांच्या आरोपांना उत्तर

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : सुरतमधील हिरे बाजार शिवाजी महाराजांच्या काळापासून आहे. सुरत येथील डायमंड बोर्स २०१३ साली सुरू झाले. त्याच्या इमारतीचे नुकतेच उद्घाटन झाले. सुरतमध्ये हिऱ्यांची निर्मिती होते, तर आपल्याकडे निर्मिती आणि निर्यात होते. मुंबई हे हिरे निर्यातीचे हब आहे. सुरतला जरी नवीन बोर्स चालू केले असले, तरी आपल्याकडून एकही हिरे उद्योग सुरतला गेलेला नाही, असा दावा उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत केला. विरोधी पक्षांनी उपस्थित केलेल्या अंतिम आठवडा प्रस्तावाला ते उत्तर देत होते.

मुंबईतील हिरे व्यापार गुजरातला पळवल्याचा आरोप विरोधकांनी केला होता. त्यावर फडणवीस यांनी मुंबईतील हिरे व्यापाराचे महत्त्व आजही कायम असल्याचे सांगितले. भारत बोर्सने तसेच मुंबईतील हिरे व्यापाऱ्यांनी आपण सुरतला जाणार नाही, असे सांगितले. उलट आपल्याकडे हा उद्योग वाढत आहे, याकडे त्यांनी लक्ष वेधले.

महिला-मुलींसाठी महाराष्ट्र सुरक्षित
महाराष्ट्र हे तुलनेत सुरक्षित राज्य आहे. महाराष्ट्रात २०२० साली तीन लाख ९४ हजार १७ गुन्हे घडले होते. २०२२ साली त्यात घट झाली असून ते तीन लाख ७४ हजार ३८ इतके होते. दिल्ली, मुंबईची तुलना केली तर दिल्लीत रात्री १२ वाजता मुलीला फिरायला सुरक्षित वाटत नाही. मात्र, मुंबईत मुलींना सुरक्षित वाटते, असे फडणवीस यांनी यावेळी सांगितले. 

Web Title: There is no diamond industry from Mumbai to Surat; Fadnavis's reply to the opposition's allegations in the Assembly

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.