३,२०० कोटींचा टीडीएस घोटाळा, ४४७ कंपन्यांचा सहभाग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 6, 2018 06:21 AM2018-03-06T06:21:42+5:302018-03-06T06:21:42+5:30

४४७ कंपन्यांचा सहभाग असलेला ३,२०० कोटी रुपयांचा टीडीएस घोटाळा प्राप्तिकर विभागाने उघडकीस आणला आहे. घोटाळेखोर कंपन्यांनी कर्मचा-यांच्या वेतनातून कर कापून तर घेतला. मात्र, तो सरकारकडे जमाच केला नाही. त्याऐवजी त्यांनी हा पैसा आपल्या व्यवसायाकडे वळविला.

 TDS scam of 3,200 crore, 447 companies' participation | ३,२०० कोटींचा टीडीएस घोटाळा, ४४७ कंपन्यांचा सहभाग

३,२०० कोटींचा टीडीएस घोटाळा, ४४७ कंपन्यांचा सहभाग

googlenewsNext

मुंबई  -  ४४७ कंपन्यांचा सहभाग असलेला ३,२०० कोटी रुपयांचा टीडीएस घोटाळा प्राप्तिकर विभागाने उघडकीस आणला आहे. घोटाळेखोर कंपन्यांनी कर्मचा-यांच्या वेतनातून कर कापून तर घेतला. मात्र, तो सरकारकडे जमाच केला नाही. त्याऐवजी त्यांनी हा पैसा आपल्या व्यवसायाकडे वळविला. हा प्रकार गेल्या एका वर्षात घडला आहे. प्राप्तिकर विभागाच्या टीडीएस शाखेने या कंपन्यांविरुद्ध खटल्याची प्रक्रिया सुरू केली आहे. काही प्रकरणांत वॉरंटही जारी करण्यात आले. या गुन्ह्यासाठी प्राप्तिकर कायद्यात किमान तीन महिन्यांची सक्तमजुरी, तसेच जास्तीतजास्त ७ वर्षांच्या तुरुंगवासासह दंडाची तरतूद आहे.
आरोपींमध्ये बिल्डरांचा प्रामुख्याने समावेश आहे. यापैकी एका बिल्डराचे राजकीय लागेबांधे असून, कर्मचाºयांच्या वेतनातून करापोटी त्याने कापलेल्या १०० कोटींचा अपहार केला आहे. इतर आरोपींत चित्रपटनिर्मिती संस्था, पायाभूत सेवा क्षेत्रातील कंपन्या, स्टार्ट अप कंपन्या, फ्लाय बाय नाइट आॅपरेटर यांचा समावेश आहे.
एका बंदराचा विकास करणाºया पायाभूत क्षेत्रातील कंपनीने १४ कोटी
रुपये परस्पर वळविले आहेत.
आयटी सोल्युशन प्रोव्हायडर एका ‘एमएनएस’ने ११ कोटी रुपयांचा कर सरकारकडे जमा केलेला नाही.
अधिकाºयाने सांगितले की, हा घोटाळा एप्रिल २०१७ पासूनच्या आहे. काही आरोपींना अटक करण्याची आमची तयारी आहे. कर्मचाºयांच्या वेतनातून टीडीएस कापून ठरावीक मुदतीत तो सरकारकडे जमा करण्याची जबाबदारी कंपन्यांवर आयकर
कायद्यानुसार आहे.

पैसे भरण्यास नकार

अनेक कंपन्यांनी हा पैसा खेळते भांडवल म्हणून वापरला. काही कंपन्यांनी ५० टक्के रक्कम वापरून घेतली. यातील काही कंपन्यांनी दिलगिरी व्यक्त करून पैसे भरण्याची तयारी दर्शविली आहे. काही कंपन्यांनी मात्र आर्थिक अडचणीचे कारण देऊन पैसे भरण्यास नकार दिला आहे.

Web Title:  TDS scam of 3,200 crore, 447 companies' participation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.