राष्ट्रवादी पक्ष काँग्रेसमध्ये विलीन करण्यासंदर्भात सुप्रिया सुळे म्हणतात...

By ऑनलाइन लोकमत | Published: May 31, 2019 03:23 PM2019-05-31T15:23:18+5:302019-05-31T15:35:34+5:30

राष्ट्रवादी काँग्रेसपक्ष काँग्रेसमध्ये विलीन होणार असे वृत्त गुरुवारी आले होते. या बाबत शरद पवार यांनी आपली भूमिका स्पष्ट करताना पक्ष विलीन करण्यासंदर्भात कोणतीही चर्चा झाली नसल्याचे म्हटले होते.

supriya sule reaction on rahul gandhi and sharad pawar meeting | राष्ट्रवादी पक्ष काँग्रेसमध्ये विलीन करण्यासंदर्भात सुप्रिया सुळे म्हणतात...

राष्ट्रवादी पक्ष काँग्रेसमध्ये विलीन करण्यासंदर्भात सुप्रिया सुळे म्हणतात...

Next

मुंबई - लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर काँग्रेसमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे. त्यातच काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी पराभवाची जबाबदारी घेत अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. पक्षाकडून राहुल यांचा राजीनामा एकमुखाने नाकारण्यात आला. मात्र राहुल राजीनाम्यावर ठाम असल्याच्या चर्चा असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार आणि राहुल गांधी यांची भेट चर्चेत आली आहे. या भेटीनंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले.

राष्ट्रवादी काँग्रेसपक्ष काँग्रेसमध्ये विलीन होणार असे वृत्त गुरुवारी आले होते. या बाबत शरद पवार यांनी आपली भूमिका स्पष्ट करताना पक्ष विलीन करण्यासंदर्भात कोणतीही चर्चा झाली नसल्याचे म्हटले होते. त्यानंतर आता पक्ष विलीन करण्यासंदर्भात खासदार सुप्रिया सुळे यांची प्रतिक्रीया आली आहे. 'राष्ट्रवादीचं काँग्रेसमध्ये विलीनीकरण या अफवा आहेत. आमची अशी कोणतीही चर्चा झाली नाही. ही चर्चा फक्त मीडियामध्ये आहे,' असं म्हणत सुप्रिया सुळे यांनी विलीनीकरणाबाबतच्या सर्व चर्चा फेटाळून लावल्या आहेत.

लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचा दारूण पराभव झाला असून विरोधी पक्षनेतेपदासाठी आवश्यक संख्याबळापर्यंत पोहचण्यात काँग्रेसला दुसऱ्यांदा अपयश आले आहे. विरोधी पक्षनेतेपदासाठी ५५ जागा जिंकणे आवश्यक आहे. तर काँग्रेसला केवळ ५२ जागांवर विजय मिळाला आहे. त्यामुळे काँग्रेसला विरोधीपक्ष नेतेपद मिळणे अशक्य आहे. अशा स्थितीत राष्ट्रवादीला काँग्रेसमध्ये विलीन केल्यास विरोधी पक्षनेतेपद मिळवण्याएवढ्या जागा होऊ शकतील.

या पार्श्वभूमीवर काँग्रेसकडून राष्ट्रवादीला विलीनीकरणाचा प्रस्ताव दिला गेल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्या होत्या. मात्र सुप्रिया सुळे यांनी या चर्चा फेटाळल्यामुळे विलीनीकरणाच्या मुद्दाला पुर्णविराम मिळाला आहे.

Web Title: supriya sule reaction on rahul gandhi and sharad pawar meeting

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.