state ministry expansion cabinet list ready by devendra fadanvis | भाजपाच्या 2 ते 3 मंत्र्यांना डच्चू मिळणार ?, लवकरच फडणवीसांच्या मंत्रिमंडळाचा विस्तार
भाजपाच्या 2 ते 3 मंत्र्यांना डच्चू मिळणार ?, लवकरच फडणवीसांच्या मंत्रिमंडळाचा विस्तार

मुंबई- गेल्या काही दिवसांपासून फडणवीस मंत्रिमंडळाच्या विस्ताराच्या रंगत असलेल्या चर्चांना पुन्हा उधाण आलं आहे. दस-यानंतर मंत्रिमंडळ विस्तार होणार असल्याची माहिती एबीपी माझा वृत्तवाहिनीनं सूत्रांच्या हवाल्यानं दिली आहे. विशेष म्हणजे या मंत्रिमंडळ विस्तारात भाजपाच्या अकार्यक्षम मंत्र्यांना बाहेरचा रस्ता दाखवण्यात येणार आहे.

तर शिवसेनेला दोन ते तीन अतिरिक्त मंत्रिपदाची लॉटरी लागण्याची शक्यता आहे. भाजपाच्या 2 ते 3 मंत्र्यांना डच्चू मिळणार असल्याची शक्यता आता वर्तवली जात आहे. भाजपाच्या बाहेरचा रस्ता दाखवण्यात येणा-या मंत्र्यांमध्ये कॅबिनेट आणि राज्यमंत्र्यांचा समावेश आहे. तर लोकसभेच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेला बरोबर घेण्यासाठी भाजपा सेनेला 2 ते 3 अतिरिक्त मंत्रिपदे देण्याची शक्यता आहे. मंत्रिमंडळ विस्तारात जिथे ताकद कमी तिथल्या आमदारांना मंत्रिपद भाजपा मंत्रिपद देण्याची चर्चा आहे. 


Web Title: state ministry expansion cabinet list ready by devendra fadanvis
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.