तुम्ही माझ्या मागे उभे राहा, मी तुम्हाला पैसे देईन, रावसाहेब दानवेंचे वादग्रस्त वक्तव्य

By ऑनलाइन लोकमत | Published: March 2, 2019 11:34 AM2019-03-02T11:34:59+5:302019-03-02T12:32:11+5:30

सतत वादात सापडणारे भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य केले आहे.

Stand behind me, I will give you money, Raosaheb Danve's controversial statement | तुम्ही माझ्या मागे उभे राहा, मी तुम्हाला पैसे देईन, रावसाहेब दानवेंचे वादग्रस्त वक्तव्य

तुम्ही माझ्या मागे उभे राहा, मी तुम्हाला पैसे देईन, रावसाहेब दानवेंचे वादग्रस्त वक्तव्य

Next
ठळक मुद्दे''तुम्ही मला विजयी करण्यासाठी माझ्या मागे उभे राहा. मी, तुम्हाला पैसे देईन,'' असे वक्तव्य दानवे यांनी केले 'पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पराभूत करण्यासाठी देशभरातील विरोधक एकत्र झाले आहेतमला पराभूत करण्यासाठी जालन्यामधील विरोधक एकत्र झाले आहेत

जालना - सतत वादात सापडणारे भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य केले आहे. जालना येथे एका सभेला संबोधित करताना ''तुम्ही मला विजयी करण्यासाठी माझ्या मागे उभे राहा. मी, तुम्हाला पैसे देईन,'' असे वक्तव्य दानवे यांनी केले असून, त्यामुळे एका नव्या वादाला तोंड फुटले आहे.

आपल्या मतदारसंघाच्या दौऱ्यावर असलेल्या दानवे यांनी जालना येथे विकासकामांचा आढावा घेतला. त्यानंतर उपस्थितांना संबोधित करताना ते म्हणाले, ''पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पराभूत करण्यासाठी देशभरातील विरोधक एकत्र झाले आहेत आणि मला पराभूत करण्यासाठी जालन्यामधील विरोधक एकत्र झाले आहेत. आता तुम्ही मला विजयी करण्यासाठी माझ्या मागे उभे राहा. मी, तुम्हाला पैसे देईन.'' असे वक्तव्य दानवे यांनी केले. 



दरम्यान, रावसाहेब दानवे यांनी याआधीही अशी वादग्रस्त वक्तव्ये केली आहेत. दोन वर्षांपूर्वी तूरखरेदीवरून शेतकऱ्यांना ''साले''संबोधल्याने दानवे वादात सापडले होते. ''एक लाख टन तूर खरेदी केली, तरी रडतात साले, असे वादग्रस्त आणि शेतकऱ्यांची अवहेलना करणारे वक्तव्य दानवेंनी केले होते. त्यानंतर त्यांच्यावर चौफैर टीका झाली होती.

जालना येथे पालकमंत्री बबनराव लोणीकर यांच्या संपर्क कार्यालयाच्या उद्घाटन कार्यक्रमात  बोलतान दानवेंनी हे वक्तव्य केले होते. त्यांचे भाषण सुरू असतानाच भाजपाच्या एका कार्यकर्त्याने, तूर खरेदीबाबत आम्ही लोकांना काय उत्तर द्यायचे, असा सवाल केला. या अनपेक्षित प्रश्नाने दानवेंचा पारा चढला होता. ''एक लाख टन तूर खरेदी केली, तरी रडतात साले. कापसाला भाव नाही, तुरीला भाव नाही, असली रडगाणी आता बंद करा,'' अशी मुक्ताफळे दानवे यांनी उधळली होती. 

Web Title: Stand behind me, I will give you money, Raosaheb Danve's controversial statement

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.