पानसरे हत्येप्रकरणी आणखी काहींचा सहभाग, एसआयटीने हायकोर्टाला दिली माहिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 16, 2018 02:17 AM2018-02-16T02:17:10+5:302018-02-16T02:17:24+5:30

कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या हत्येमध्ये आणखी काही जणांचा सहभाग असल्याची माहिती विशेष तपास पथकाने (एसआयटी) उच्च न्यायालयाला गुरुवारी दिली.

Some other participants in the murder of Pansare murder, SIT gave to the court | पानसरे हत्येप्रकरणी आणखी काहींचा सहभाग, एसआयटीने हायकोर्टाला दिली माहिती

पानसरे हत्येप्रकरणी आणखी काहींचा सहभाग, एसआयटीने हायकोर्टाला दिली माहिती

googlenewsNext

मुंबई : कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या हत्येमध्ये आणखी काही जणांचा सहभाग असल्याची माहिती विशेष तपास पथकाने (एसआयटी) उच्च न्यायालयाला गुरुवारी दिली. मात्र, आतापर्यंत या आरोपींना पकडण्यात यश आले नसल्याचेही एसआयटीने उच्च न्यायालयाला सांगितले. त्यावर न्यायालयाने सर्व फारार आरोपींना सहकार्य करणाºयांना आॅनलाइनद्वारे ट्रोल करण्याची सूचना केली.
डॉ. नरेंद्र दाभोलकर व कॉ. गोविंद पानसरे यांच्या हत्येत सहभागी असलेल्या आरोपींना शिक्षा झाली नाही, तर अन्य गुन्हेगारांना प्रोत्साहन मिळेल. त्यामुळे तपासयंत्रणेला आरोपींपेक्षा अधिक चलाख बनावे लागेल, असे मत न्या. एस. सी. धर्माधिकारी व न्या. भारती डांग्रे यांच्या खंडपीठाने व्यक्त केले.
दाभोलकर व पानसरे यांच्या हत्याप्रकरणाचा तपास न्यायालयाच्या देखरेखीखाली सुरू राहावा, यासाठी दोन्ही कुटुंबीयांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केल्या आहेत. गुरुवारी त्यावरील सुनावणीत एसआयटीतर्फे ज्येष्ठ वकील अशोक मुंदर्गी यांनी पानसरे यांच्या हत्येमध्ये आणखी काहींचा सहभाग असल्याचे सांगितले. ‘तपासयंत्रणेने त्यांना आरोपी केले आहे. मात्र, अद्याप त्यांना पकडण्यात यश आले नाही. जे फरार आहेत त्यांनी निवासी पत्ता, मोबाइल नंबर व ओळख बदलली आहे. त्यामुळे त्यांना पकडण्यात अडचणी येत आहेत,’ असे मुंदर्गी यांनी सांगितले.
एसआयटीच्या या म्हणण्याला सीबीआयनेही दुजोरा दिला. अ‍ॅडिशनल सॉलिसीटर जनरल अनिल सिंग यांनी दाभोलकर यांच्या हत्येमधील आरोपींनीही त्यांची ओळख बदलून ते नव्या ठिकाणी राहात असल्याचे सांगितले. मोबाइलद्वारे होणाºया संवादाद्वारे या आरोपींचा ठावठिकाणा शोधण्याचा प्रयत्न तपासयंत्रणा करत असल्याचेही सिंग म्हणाले. तर ‘फरार आरोपींचा ठिकाणा शोधण्यासाठी त्यांच्या संपर्कातील लोकांना आॅनलाइन ट्रोल करा. ट्रोल करणे कायदेशीर आहे,’ असे न्यायालयाने म्हटले.

अहवाल सादर करा
सीबीआय व एसआयटीने
गुरुवारी न्यायालयात तपास अहवाल सादर केला. आता न्यायालयाने पुढील तपास अहवाल १ मार्च रोजी सादर करण्याचे निर्देश तपास यंत्रणांना दिले आहेत.

Web Title: Some other participants in the murder of Pansare murder, SIT gave to the court

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.