आरोग्य विभागात साडे सहा हजार कोटींचा घोटाळा, तानाजी सावंत यांनी राजीनामा द्यावा - रोहित पवार

By ऑनलाइन लोकमत | Published: April 1, 2024 03:03 PM2024-04-01T15:03:32+5:302024-04-01T15:08:40+5:30

आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी हा घोटाळा केला असून राज्याला भिखारी केले आहे. सरकारने त्यांची सखोल चौकशी केली करावी, सावंत यांनी राजीनामा दिला पाहिजे, असे रोहित पवार म्हणाले.

Six and a half crore scam in health department, Tanaji Sawant should resign - Rohit Pawar | आरोग्य विभागात साडे सहा हजार कोटींचा घोटाळा, तानाजी सावंत यांनी राजीनामा द्यावा - रोहित पवार

आरोग्य विभागात साडे सहा हजार कोटींचा घोटाळा, तानाजी सावंत यांनी राजीनामा द्यावा - रोहित पवार

पुणे : आरोग्य विभागात साडेसहा हजार कोटींचा घोटाळा झाला, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवारांनी केला. आरोग्य विभागाने रुग्णवाहिका पुरवठा करणाऱ्या सुमित व बीव्हीजी या कंपनीला नियमबाह्य पद्धतीने टेंडर देण्यात आले. त्याद्वारे आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी साडे सहा हजार कोटी रुपयांचा घोटाळा केला आहे, असा आरोप आमदार रोहित पवार यांनी सोमवारी केला. 

निवडणुकीला फंड देण्यासाठी  बीव्हीजी आणि सुमित कंपनी यांच्यावर मेहरबानी दाखवली जात आहे. हा लढा सामान्य व्यक्तीचा असून नियम कसे वळविण्यात आले, टेंडर डिझाईन करून वळवले गेले. या भ्रष्टाचाराबाबत आमच्याकडे सर्व पुरावे आहेत. त्यामध्ये आरोग्य विभागातील मोठ्या लोकांनी साडे सहा हजार कोटीचा घोटाळा केला आहे. या पैशाचा वापर निवडणुकीसाठी करण्याचा प्रयत्न आहे. आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी हा घोटाळा केला असून राज्याला भिखारी केले आहे. सरकारने त्यांची सखोल चौकशी करावी आणि सावंत यांनी राजीनामा दिला पाहिजे, असे रोहित पवार म्हणाले.

सुमित फॅसिलिटी ही पिंपरी चिंचवडची कंपनी होती. या कंपनीला अॅंब्यूलन्स चालविण्याचा अनुभव नव्हता.  मात्र तरीही मुख्यमंत्री दावोसला गेल्यावर एका स्पॅनिश कंपनीसोबत या सुमेत कंपनीचा करार करण्यात आला. मात्र त्यानंतर बीव्हीजी या कंपनीने हे कंत्राट त्यांना मिळावे म्हणून प्रयत्न सुरु केले. त्यानंतर  बीव्हीजीचा देखील समावेश या कंत्राटात करण्यात आला. एका बाजुला बीव्हीजी बाबत अनेक तक्रारी आहेत. अनेक राज्यांत बीव्हीजी ब्लॅक लिस्ट कंपनी आहे.  मात्र तरीही या कंपनीला कंत्राट देण्यात आले, असेही रोहित पवार यांनी सांगितले.

पिंपरी चिंचवडमधील अमित साळुंखे नावाच्या व्यक्तीची सुमित कंपनी आहे. या प्रकरणात साडे सहा हजार कोटी रुपयांचा घोटाळा करण्यात आला. हाच पैसा निवडणूक निधी म्हणून देण्यात आला आहे. सावंत यांना मी पाच दिवसाचा वेळ देतो त्यांनी आपली बाजू मांडावी. आरोग्य विभाग हा खेकडा पोकरत असून पारदर्शक प्रक्रिया राबवावी असा टोला रोहित पवार यांनी लगावला.

Web Title: Six and a half crore scam in health department, Tanaji Sawant should resign - Rohit Pawar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.