‘समृद्धी महामार्गात जमिनी घेणाऱ्यांची नावे जाहीर करणार’

By ऑनलाइन लोकमत | Published: June 21, 2019 02:22 AM2019-06-21T02:22:01+5:302019-06-21T07:02:24+5:30

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची विधानसभेत माहिती

'Shruthidhi to declare names of land holders on the highway' | ‘समृद्धी महामार्गात जमिनी घेणाऱ्यांची नावे जाहीर करणार’

‘समृद्धी महामार्गात जमिनी घेणाऱ्यांची नावे जाहीर करणार’

Next

मुंबई : राज्यातील महत्वाकांक्षी समृद्धी महामार्गाचे काम पूर्ण होत आले आहे. त्यासाठी जमिनी घेतल्या त्यांची नावे, किती जमीन घेतली व त्यांना किती मोबदला मिळाला याची सगळी माहिती अधिवेशन संपण्याच्या आत वेबसाईटवर टाकण्यात येईल, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत केली.

मुंबई-गोवा महामागार्साठी ३७८ किमीचे काम करण्यात येणार असून ११० किमीच्या कामाच्या तांत्रिक बाबी पूर्ण झाल्या आहेत. हे काम डिसेंबर २०२० पर्यंत पूर्ण केले जाईल, असेही ते म्हणाले. राज्यातील १७,५०० किमीचे रस्ते हे राष्ट्रीय महामार्ग नव्याने घोषित करण्यात आले असून त्यावर कुठेही टोल लावलेले नाहीत. हे सर्व काँक्रिटचे रा. महामार्ग आहेत. त्यातील ७ हजार किमीचे रस्ते पूर्णत्वास गेले आहेत. सा. बां. ने १० हजार किमीचे हायब्रीड अ‍ॅन्युईटीचे काम सुरु केले आहे, असेही त्यांनी सांगितले.

Web Title: 'Shruthidhi to declare names of land holders on the highway'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.