श्रीगोंद्यातून भरदिवसा पार्श्वनाथ मूर्तीची चोरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 13, 2017 12:40 AM2017-08-13T00:40:34+5:302017-08-13T00:40:34+5:30

Shrigodhya's theft of idol of Lord Swaminarayan | श्रीगोंद्यातून भरदिवसा पार्श्वनाथ मूर्तीची चोरी

श्रीगोंद्यातून भरदिवसा पार्श्वनाथ मूर्तीची चोरी

Next

श्रीगोंदा(अहमदनगर) : येथील नवीपेठ भागातील उत्तरमुखी जैन मंदिरातून जैन चोवीस तीर्थंकर पार्श्वनाथ दिगंबर भगवान यांची २५० वर्षापूर्वीची पंचधातूची मूर्ती भरदिवसा चोरीस गेली. मूर्तीचोर सीसीव्हीटीत कैद झाला आहे.
श्रीगोंदा शहरात जैन समाजाची दोन मंदिरे आहेत. नवी पेठेतील पुरातन जैन मंदिरात पार्श्वनाथाची एक फूट उंच पंचधातूची ही मूर्ती होती. डॉ. प्रदीपकुमार बडजाते शनिवारी सकाळी दर्शनासाठी गेले होते. त्यानंतर एक चोरटा ही पार्श्वनाथ मूर्ती पिशवीत घालून पसार झाला. डॉ. बडजाते यांच्या पत्नी दर्शनासाठी गेल्यानंतर मंदिरात मूर्ती नसल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. मंदिरात पाच लहान, मोठ्या मूर्ती आहेत. त्यापैकी मौल्यवान मूर्ती चोरीस गेली आहे. ही मूर्ती मंदिरात येणाºया भामट्याने चोरली असावी, असा पोलिसांचा संशय आहे.

हिंगोलीत मंदिरातील सहा मूर्ती चोरीस
वसमत (जि. हिंगोली) : आसेगाव येथील पुरातन चिंतामणी पार्श्वनाथ दिगंबर जैन मंदिरातील सहा पितळी मूर्ती शनिवारी सकाळी चोरीला गेल्या. मुख्य मूर्ती अतिशय पुरातन व पाषाणाची आहे. कपाटात पार्श्वनाथ भगवान यांची पाच किलो वजनाची पितळी मूर्ती होती. तर भगवान मल्लीनाथ व इतरही पितळी मूर्ती होत्या. मंदिरातील गेटच्या ग्रील तोडून चोरट्यांनी मंदिरात प्रवेश केला. मंदिराचे पुजारी कुलभूषण मिरकुटे यांच्या खोलीची कडी चोरट्यांनी बाहेरून लावली होती.

Web Title: Shrigodhya's theft of idol of Lord Swaminarayan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.